शक्तिशाली होण्याचे ७ नियम समजून घ्या या लेखात “द 48 लॉज ऑफ पॉवर – भाग १”

आयुष्यात तुमचं यश हे शरीराच्या शक्तिशाली असण्यावर नाही, तर मन आणि बुद्धीच्या शक्तिशाली असण्यावर अवलंबून आहे. जगातले हुशार आणि प्रभावशाली लोक आपली रणनीती कशी ठरवतात, याचा अभ्यास केला तर यशाची नवनवीन शिखरं गाठणं तुम्हाला सहज शक्य होईल.

आज मी तुमच्यासोबत रॉबर्ट ग्रीन यांच्या ‘द 48 लॉज ऑफ पॉवर’ या पुस्तकाचा सारांश शेअर करणार आहे. या लेखात शक्तिशाली, चलाख बनण्यासाठी ७ नियम सांगितलेले आहे. विविध भागांमध्ये हे ४८ नियम आम्ही तुम्हाला मनाचेTalks वर सांगू.

पण हे नियम वापरून इतरांचे नुकसान करण्यासाठी चलाखी वापरण्याचा प्रयत्न करावा असे मात्र मला सुचवायचे नाही😅

मित्रांनो, मला खात्री आहे की, हे पुस्तक वाचून तुमच्यात सशक्त विचार निर्माण होतील, पुस्तक समजून घेऊन तुम्हाला अशा युक्त्या कळतील ज्याद्वारे तुम्ही स्वतःला शक्तिशाली बनवू शकाल.

मित्रांनो, या लेखात मी लेखक रॉबर्ट ग्रीन यांनी सशक्त व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी सांगितलेल्या ७ नियमांचा उलगडा करून सांगणार आहे.

पुढच्या काही लेखात या पुस्तकात संगीतलेल्या इतर नियमांबद्दल आपण बोलू.

1)  तुमच्या वरिष्ठांना तुमची प्रतिभा आणि स्मार्टनेस दाखवताना काळजी घ्या

या जगात कोणीही सर्वोच्च प्रतिभासंपन्न किंवा शक्तिशाली नाही. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात त्याच्यापेक्षा वरचढ किंवा वरिष्ठ व्यक्ती ही असतेच.

मित्रांनो, कधीही तुमच्या वरिष्ठांना हीच जाणीव करून द्या की, ते तुमच्यापेक्षा ‘सुपेरियर’ आहेत अशीच तुमची धारणा आहे. त्यांना खूश करण्यासाठी किंवा प्रभावित करण्यासाठी तुमची कौशल्ये जास्त दाखवू नका, कारण असे केल्याने ‘इगो’ दुखावला जाऊन त्यांच्यापासून तुमचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

तुमची कौशल्ये आणि क्षमता त्यांच्यात भीती आणि असुरक्षितता निर्माण करू शकते. तुमच्या वरिष्ठांना नेहमी असे वाटू द्या, की ते तुमच्यापेक्षा चांगले आणि प्रतिभावान आहेत, अशा प्रकारे तुम्ही यशाची शिखरे गाठण्यात यशस्वी व्हाल.

इतरांना मोठेपणा देऊन समाधानी करणारा माणूस कधीही झपाट्याने पुढे जाण्यात जातो.

2) आपले हेतू सहज सर्वांना समजू देऊ नका

तुम्हाला काय हवे आहे आणि तुम्ही काय करणार आहात, हे कोणालाही समजू देऊ नका. झाकली मूठ सव्वालाखाची!!

अशा वेळी बरेचदा जिभेवर नियंत्रण ठेवणं तुम्हाला कठीण जाईल, पण सरावाने हे जमवून घेणे अवघड नक्कीच नाही.

मित्रांनो, म्हणूनच तुम्ही तुमचे शब्द जपून वापरणे फार महत्वाचे आहे. तुम्ही काय करणार आहात हे जेव्हा लोकांना कळत नाही, तेव्हा ते तुमच्याविरुद्ध रणनीती बनवू शकत नाहीत.

अशा वेळी जोपर्यंत इतरांना तुमचे हेतू समजतील तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

3) किमान बोलण्याचा प्रयत्न करा

नेहमी शक्य तितके कमी बोलण्याचा प्रयत्न करा, कारण कमी बोलल्याने तुमच्या बोलण्याला किंमत निर्माण होईल. याचा परिणाम म्हणून लोक तुमचे जास्त ऐकतील आणि तुमच्याबद्दल जास्त सांगतील.

जास्त बोलून इतरांचा वेळ जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या शब्दांची किंमत खचितच कमी होईल. कुठलीही गोष्ट कमी बोलून मोजक्या शब्दांत जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुमच्या विषयातले रहस्य वाढत जाईल. कमी बोलल्याने विषयावर तुमचे नियंत्रण राहील आणि चुकीच्या गोष्टी तुमच्या बोलण्यात येणार नाहीत. यशस्वी शक्तिशाली लोक नेहमी कमी बोलतात हे ध्यानात ठेवा.

4) तुमच्या वादाने नव्हे तर तुमच्या कामाने इतरांना जिंका

विनाकारण वाद घालण्याने कधीही काही साध्य होत नाही. बरेचदा वाद घालणाऱ्या लोकांना समोरील व्यक्तीने प्रतिवाद केला नाही तर, आपण या वादात जिंकलो आहोत असा समज होतो.

पण जेव्हा समोरील व्यक्ती हेकेखोरपणे दोन अधिक दोन पाच म्हणते तेव्हा, “ok, all right” असं म्हणण्यातच शहाणपण असतं!!

इतरांशी वाद घालण्याने तुम्ही तुमची किंमत कमी करून घेता, हे नेहमी लक्षात असू द्या!!

5) लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवायला शिका

लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवा, यामुळे त्यांच्या नजरेत तुमचे महत्त्व राहील. जगातील प्रत्येक व्यक्ती गरजेनुसार काम करते आणि ज्यांना त्याची गरज असते त्यांच्याशीच संपर्क साधतो.

लोक ज्याच्यावर अवलंबून असतात त्या व्यक्तीला महत्त्व देतात. शक्तिशाली होण्यासाठी, तुम्ही लोकांचे तुमच्यावरील अवलंबित्व वाढवायला शिकले पाहिजे.

6) तुमच्या प्रामाणिकपणाने आणि औदार्याने इतरांवर नियंत्रण ठेवा

मित्रांनो, रॉबर्ट ग्रीन म्हणतात की तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणाने आणि उदारतेने कोणत्याही व्यक्तीवर नियंत्रण ठेवू शकता.

जेव्हा तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा आणि औदार्य लोकांसमोर दाखवाल, तेव्हा असे लोकही तुमच्यावर विश्वास ठेवत जे कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. अर्थातच नंतर त्या विश्वासालाही तुमच्याकडून तडा दिला जाणार नाही याची काळजी घ्या

7) जेव्हा तुम्ही एखाद्याला मदतीसाठी विचारता तेव्हा मोबदल्यात त्यांनाही तुमच्याकडून काही मिळेल यासाठी आशवस्त करा.

जर तुम्ही कोणाची मदत घेतली आणि त्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही त्यांच्यासाठी आतापर्यंत काय-काय केले आहे, तर ते मदत करण्याऐवजी तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात.

जर तुम्ही त्यांना आत्ता आवश्यक असलेली एखादी गोष्ट ऑफर केली तर ते नक्कीच तुम्हाला मदत करण्यास तयार असतील.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “शक्तिशाली होण्याचे ७ नियम समजून घ्या या लेखात “द 48 लॉज ऑफ पॉवर – भाग १””

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।