जसं समजायला लागतं तसं निरोप आपल्या आयुष्याचा भाग बनुन जाताे…. प्रत्येक वळणावर भेटणारा…. कधी त्या निराेपाला वियाेगाबरोबर भविष्यातल्या सुखाची सोनेरी किनार असते, तर कधी ताे सोबत आणतो काटेरी दु:ख…. आयुष्यभर बोचत राहणारं..
आई वडिलांच बोट धरून घराच्या छोटयाशा विश्वाचा निरोप घेऊन शाळेच्या नव्या जगात आपण पहिलं पाऊल टाकतो, पाहता पाहता त्या लहानशा विश्वात मिञमैञिणी शिक्षक प्रवेश करतात… पहिला श्रीकार गिरवत असतानाच नवं आयुष्य समोर येतं अन् त्याच वळणावर पहिला निरोप भेटतो… मिञमैञिणी आणि शिक्षकांबरोबरच शाळेच्या प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तुंबरोबर आपले भावबंध जुळले गेले आहेत हे मग त्याच वेळी समजतं..
शाळा, ती ईमारत, शाळेतले वर्ग, बाक, भिंती,प्र त्येक तास संपल्याची आठवण करुन देणारी घंटा, शाळेच्या आवारातल चिंचेचं झाड सारं काही…. हळवेपणानी घेतलेला तो निरोप एक सुंदरस चिञ बनून मनात कोरला जातो. नंतर रंगीबेरंगी काॅलेजचे दिवस संपल्यावरही असाच हळवा निरोप भेटतो..
कधी शिक्षणासाठी म्हणून, तर कधी नोकरीसाठी घर सोडतानाचा निरोप, आयुष्यात असे किती तरी निरोप मनात घर करून असतात. मूलींसाठी सर्वात हळवा निरोप हा लग्न करुन सासरी जातानाचा…. आणि त्या नंतर प्रत्येक वेळी माहेरून निघतानाचा असतो…. रंगीबेरंगी उमलत्या वयायतला निरोप तसाच असतो… वियाेगाबरोबर नव्या जगाची स्वप्न घेउन येणारा तर जीवनाच्या सरत्या काळात भेटणारा निरोप गंभीर असतो…. उतरत्या काळाचे गहिरे रंग त्याचावर पसरलेले असतात. संपलेली वाट मागे पडलेली असते… निरोप घेणे हे काम तसे अवघडच, तो प्रसंगच तसा असतो…. हुरहुर लावणारा,एकमेकांपासून दूर करणारा, जरी नकोसा वाटला तरी अटळ आणि अपरिहार्य… पण ज्या निरोपातून परमभेटीची फूलं उमलतात तो निरोप केव्हाही सुरेखच…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.