रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे

आपले व्यक्तिमत्व म्हणजे काय याचा आपण कधी विचार केला आहे का?

आपले दिसणे, चालणे, बोलणे म्हणजे नजरेला दिसणाऱ्या गोष्टी म्हणजेच आपले व्यक्तिमत्व समजण्याची चूक आपण करतो. व्यक्तिमत्वात अजून बऱ्याच गोष्टी येतात जसे की आपण विचार कसा आणि काय करतो, आपण संकटांचा सामना कसा करतो, आपल्यात कोणत्या चांगल्या आणि कोणत्या वाईट सवयी आहेत, वाईट किंवा नकारात्मक विचारांपासून आपण आपले मन कसे वळवतो, इत्यादी.

हल्ली बऱ्याच ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाची शिबिरे घेतली जातात. आणि शाळांना सुट्टी लागली की पालक सुद्धा आपल्या मुलांना अशा शिबिरांत भरती करतात.

इथे चालणे, बोलणे, उभे राहणे असल्या गोष्टींवर काम केले जाते. या शिबिरांमध्ये व्यक्तिमत्व विकसित तर होते पण व्यक्तिमत्व विकासाचे जे अनेक कंगोरे आहेत ते अशा शिबिरांमध्ये साध्य होत नाहीत.

व्यक्तिमत्व विकास म्हणजे नोकरीसाठीच्या मुलाखतीत यश कसे प्राप्त करायचे, आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या बोलण्या किंवा वागण्यातून समोरच्या माणसावर प्रभाव कसा पाडायचा या गोष्टी प्रामुख्याने शिकवल्या जातात.

पण यातून पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ बाह्यविकास नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

आपल्या रोजच्या जगण्यातल्या लहान-सहान सवयी बदलून आपल्याला आपल्या व्यक्तीमत्वात अनेक बदल घडवून आणणे शक्य होते.

सवयी आपल्या आयुष्यात फार महत्वाच्या असतात हे आधी लक्षात घेतले पाहिजे. माणसाचे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये सवयींचा फार महत्वाचा वाटा असतो.

स्टीव जॉब्स, मार्क झुकरबर्ग, रतन टाटा, धीरूभाई अंबानी या आपापल्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी व्यक्ती जन्माला येतानाच काही यश आपल्यासोबत घेऊन आल्या नव्हत्या, परंतु जिद्द, चिकाटी, मेहनत करायची तयारी, अपयशाने खचून न जाता प्रगतीच्या मार्गावर सात्यत्याने आगेकूच करत राहणे या त्यांनी अंगी बाळगलेल्या सवयींमुळेच ते पुढे गेले.

यावरून आपल्या सवयी बदलायला हव्यात हे आपल्या लक्षात येते पण आपल्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या सवयी बदलायच्या आणि कशा?

आपण जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांचा नीट सामना करू शकत नाही किंवा आपला दृष्टीकोन नकारात्मक असतो ज्यामुळे आपल्याला संकटांतून मार्ग काढता येत नाही.

अशावेळी कुणीतरी आपला समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर त्याच समस्या आपल्याला नवीन संधी वाटू शकतात आणि आपण त्यातून मार्ग काढू शकतो.

बरेचजण आयुष्यात खूप कष्ट करत असतात पण त्यांना यश मिळत नसते याचे कारण म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत चुकीची असते किंवा कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा असतो.

अनेक यशस्वी व्यक्तीमत्वांचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे अशा प्रसिध्द लोकांनी सुद्धा फार काही वेगळ्या गोष्टी केलेल्या नसतात फक्त त्यांचा कामाकडे किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो किंवा काम करण्याची पद्धत वेगळी असते.

परत तीच उदाहरणे घ्यायची तर धीरूभाई अंबानी, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स ह्या सगळ्यांचे चरित्र बघितले तर आपल्याला दिसेल की त्यांनी शून्यातून पूर्ण विश्व निर्माण केले. ते एवढे यशस्वी झाले ते त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे, त्यांच्या कामातल्या चिकाटीमुळे आणि व्यवस्थित काम करण्याच्या सवयींमुळे.

यश म्हणजे इथे आपल्याला मोठे नेत्रदीपक यश एवढेच अपेक्षित नाही.

आयुष्य सुख, समृद्धी, समाधानाने जगता येईल या पट्टीवर जर आपण यशाचे मोजमाप केले तर ते मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे सांगणारे, व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे ‘रहस्य जगण्याचे’ या PDF स्वरूपातील पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळणार आहेत.

मनाचेTalks वर फेसबुक आणि वेबसाईट च्या माध्यमातून तुम्ही नेहमी वेगवेगळ्या विषयांचे लेख वाचतात. ते वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध तर आहेतच. परंतु बऱ्याच वाचकांची हे लेख इ-बुक च्या माध्यमातून उपलब्ध करून द्या अशीही मागणी नेहेमी असते. जेणेकरून काही निवडक लेख एका ठिकाणी, जाहिरातींशिवाय वाचता येतील.

हे इ – बुक ऍमेझॉन किंडलवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

या इ-बुक चे अल्प असे मूल्य म्हणजे रु. ९९/- ऑनलाईन भरावे लागेल. मनाचेTalks चा व्हाट्स ऍप नम्बर ८३०८२४७४८० किंवा team@sh051.global.temp.domains या इमेल आय. डी वर मेसेज केल्यास रु ९९/- भरण्यासाठी UPI ID दिला जाईल. पेमेंट करून त्याची ऑनलाईन रिसीट पाठवल्यानंतर ई-बुक ची कॉपी तुम्ही दिली जाईल. 

रहस्य जगण्याचे

यात आम्हाला वाचकांचे आभार खरंतर यासाठीही मानावेसे वाटतात कारण, हि जगणं शिकवणारी, मनाला भिडणारी माहिती विनामूल्य दिली जाते म्हणून काही वाचक स्वखुशीने मनाचेTalks ला देणगी सुद्धा देतात. याशिवाय वाचकांचा प्रतिसाद हि सुद्धा आमच्यासाठी अमूल्य देणगीच आहे.

आणि याच सर्व गोष्टी आहेत ज्या आमच्या टीमला मोटिव्हेट करतात, नवनवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी!!

‘रहस्य जगण्याचे’ हे पुस्तक वाचून आपल्या कुठल्या सवयी बदलल्या, विचार बदलले, भावनांना योग्य दिशा दिली तर आयुष्यात जादू घडवता येऊ शकते हे समजेल. समजेल म्हणण्यापेक्षा पटेल.

खरंतर यात थोडं लॉजिक म्हणजे तर्क, थोडं मानसशास्त्र, थोडी समज एवढं साधं सोप्प गणित आहे असंही म्हणता येईल.

उदाहरणार्थ, सवयी बदलून IQ बदलता येऊ शकतो हे यात तुम्हाला समजेल. आपला आत्मविश्वास पण आपल्या सवयींचीच निपज आहे हेही यात वाचायला मिळेल. वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना कसं समोर जायचं?

आपल्यातली कार्यक्षमता, हिम्मत, निर्णयक्षमता, नेतृत्त्वक्षमता या सर्व विषयांवर चर्चा होईल ‘रहस्य जगण्याचे’ या PDF स्वरूपातील पुस्तकात.

‘रहस्य जगण्याचे’ हे इ-बुक घ्यायचे असल्यास मनाचेTalks चा व्हाट्स ऍप नम्बर ८३०८२४७४८० किंवा team@sh051.global.temp.domains या इ-मेल ID वर संपर्क करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।