तिचे किस्से, तिचं बोलणं आणि बोलताना डोळे मिचकावत हसणं सगळंच छान वाटायचं.
ती एका सुशिक्षित आणि समाधानी कुटुंबातली मुलगी. नवराही प्रेमळ आणि भरीस भर म्हणून सासू-सासरेही मनमिळाऊ. भरभरून जगायची. गाणी म्हणायची.
आम्हा मैत्रीणीना वाटायचं, “आमचं कुठे असं नशीब? आनंदात राहण्यासाठी तशी परिस्थिती सुद्धा हवी ना?”
परवा तिच्या नवऱ्याचा अपघात झाला. head injury. वाचला. पण अजून सिरीयस आहे. हे समजलं, तेव्हा तिला भेटायला गेले.
नवरा तिचा जीव कि प्राण. त्याच्याशिवाय तिचं पानही हलायचं नाही. सतत त्याचं नाव तोंडात असायचं.
तिला कोसळलेलं पहावं लागणार ह्या कल्पनेने मलाच वाईट वाटत होतं.
तिला भेटले तेव्हा जीवात जीव आला. मला वाटलं तेवढी ती कोसळलेली नव्हती. हसतमुख चेहर्याने नवऱ्यासाठीची धडपड, सासू-सासऱ्यांची काळजी. सगळंच करत होती.
मग बोलताना म्हणाली, “डॉक्टर आज म्हणाले १०% चान्सेस आहेत तो वाचण्याचे. म्हणून मी आज खूप आनंदात आहे.”
म्हणजे ९० % चान्सेस नाहीत, हे न समजण्याएवढी ती मूर्ख नव्हती. पण तिने १० % वर फोकस करायचं ठरवलं.
मला जाणवलं, ती नेहमीच अशी होती. ज्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आम्ही तक्रार करायचो त्यातली positive बाजू तिला दिसायची. तसं पाहिलं तर तिच्याकडे जे होतं ते थोड्या फार फरकाने आमच्याकडेही होतंच की. आम्हाला तिचा आनंद तिला मिळालेल्या सुखांमुळे आहे असं वाटायचं. आता जाणवलं, तिचा आनंद म्हणजे तिचं नशीब नाही तर तिचा चॉईस होता. म्हणूनच, ती नेहमी आनंद वाटत यायची.
डोळे असले कि दिसतंच सगळं, कोणत्या कोनातून पाहायचं हे मात्र आपण ठरवायचं.
वाचण्यासारखे आणखी काही…..
वसुधा कोरडे-देशपांडे यांचा ब्लॉग
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.