संक्रातीनिमित्त केला जाणारा हिवाळ्यात थंडी पळवुन लावणारा हा पदार्थ ताण दुर करतोच तसेच संधीवातावरही प्रभावी ठरतो.
हिवाळा सुरु झाला की संक्रांतीचे वेध लागतात. संक्रातीला तिळगुळ, तिळाच्या वड्या हव्यातच.
तीळाचे आश्चर्यकारक फायदे बघूनच संक्रातीचं नातं तीळवड्या आणि तीळलाडू यांच्याशी जोडलं गेलं असेल.
तीळाच्या गुणांमुळं संक्रातीच्या आधल्या दिवशी सुद्धा बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जातात.
तीळगुळाचे दागिने लहान मुलांना आणि नवविवाहितेला घालण्यामागे सुद्धा तीळाच्या गुणांचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे हाच हेतू असू शकतो.
तीळाचे फायदे प्रचंड आहेत, त्यामुळं हिवाळ्यात तीळाचा आहारात समावेश करणं आणि विशेषतः तीळ आणि गुळ या़ंचा समन्वय साधत केलेल्या वड्या किंवा लाडू आरोग्यासाठी पोषक आहेत.
चवीला उत्तम असणारे तीळलाडू किंवा तीळाच्या वड्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहेत. त्यामुळं सध्याच्या काळात तर हे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत.
1) सर्दी खोकल्यावर प्रभावशाली
तिळाचे लाडू उष्ण असतात. हिवाळ्यात ते आपल्या शरीरात उष्णता निर्माण करून आपल्याला उबदार ठेवतात.
यामुळंच हिवाळ्यात तिळाचे लाडू खायलाच हवेत. याचा आणखी एक फायदा म्हणजे तिळामुळं हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि ताप यापासून आपल्या शरीराचे रक्षण होतं.
2) तणावापासून मुक्ती
गूळ आणि तीळाच्या मिश्रणातून तयार होणारे हे लाडू खायला चविष्ट असतात.
जिभेवर त्यांची चव पसरली की तुमचा तणाव त्यात विरघळून जातो. त्यामुळं तुम्हांला छान वाटतं.
तिळामध्ये असणारे प्रोटीन, कॅल्शियम आणि ‘बी’ कॉम्प्लेक्सचे प्रमाण मेंदू तणावमुक्त ठेवायला मदत करते.
दररोज साधारण 50 ग्रॅम तिळाचे लाडू खाल्ल्याने तुम्ही हिवाळ्यात तणावमुक्त राहू शकतो.
3) तिळाचे लाडू रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
उत्तम रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच उत्तम आरोग्य.
उत्तम आरोग्यं नेहमीच जपावं लागतं. मात्र जागतिक रोगाचा पुन्हा पुन्हा फैलाव होत असताना तुम्हांला प्रतिकारशक्तीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
हिवाळ्यात तुम्ही लगेचच आजारी पडू शकता, यासाठी नियमितपणे आहारात तिळाचे लाडू किंवा वड्या खाणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल.
4) पचन सुधारतं
सुका मेवा आणि तूप मिसळून तिळाचे लाडू तयार केले तर त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल. केसांना पोषण मिळून केस मजबूत होतील.
शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठीही तिळाचे लाडू फायदेशीर ठरतात.
5) संधीवातावर फायदेशीर
ज्यांना संधीवाताचा तसंच गाऊटचा त्रास आहे त्यांनी तीळाचे लाडू खाल्ले तर त्यांच्या प्रकृतीत निश्चित चांगला फरक पडेल.
हिवाळ्यात वात वाढतो आणि सांधेदुखीचा त्रास सुरु होतो, जळजळ वाढते.
तीळ ही जळजळ कमी करून सांधेदुखीशी दोन हात करायला मदत करतात.
थंडीमध्ये स्वेटर शाली लपेटून घेतानाच आहारात तीळाचा ही समावेश करा आणि तुमच्या शरीराला उबदार करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.