आकर्षणाचा नियम (Law of Attraction) संतानप्राप्तीसाठी वापरता येऊ शकेल का?

आज एका नाजूक विषयावर चर्चा करणार आहे…

आजचा लेख फक्त विवाह झालेल्या, मुल होण्याची वाट पाहणार्‍या, मॅरीड लोकांसाठी आहे. बघूया इथे आकर्षणाचा नियम (Law of Attraction) कसा वापरता येईल.

केस १ – आमच्या जवळचे एक परिचित, लग्नाला सहा वर्षे झाली, अजून मुलबाळ नाही, दोघेही नेहमी चिंतेत असतात, आनंदानं जगणंच विसरलेत जणु, उसणं अवसान आणून हसतात, आतल्या आत मनाला खाऊन घेतात!

केस २ – आमच्या गेल्या व्हॉट्सएप कोर्सच्या एक सदस्या होत्या, लग्नाला दहा वर्षे झाली, TTC. (टीटीसी म्हणजे ट्राईंग टु कन्सिव्ह) म्हणजे गर्भधारणेच्या प्रयत्नात.

केस ३ – सर, माझं वय तीस वर्षे आहे, एक मुलगा आहे, आता दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करतोय, डॉक्टर म्हणतात, ५०-५० टक्के चान्सेस आहेत, तेव्हा ह्यासाठीआकर्षणाचा नियम (Law of Attraction) काम करेल का?

केस ४ – सर, मला सात वर्षांची मुलगी आहे, आता मुलगा हवा आहे, माझं वजन वाढलेलं आहे, आणि मला थायरॉईड आहे. ट्रिटमेंट चालु आहे, सकारात्मक विचार करायचा प्रयत्न करते पण कधीकधी भिती वाटते, ह्यामुळे माझ्या करीअरवर सुद्धा परिणाम होत आहे.


आकर्षणाचा नियम (Law of Attraction)

मित्रांनो, माझं लग्न झालं आणि दीड वर्षातच मला मुलगा झाला, त्यामूळे अशा कुठल्या पॅनिक सिच्युएशनमधुन मला जावे लागले नाही, पण समाजात फिरताना असे अनेक पेशंटस आणि त्यांच्या मनातली घालमेल मात्र, वेळोवेळी जाणवत होती.

गायनकोलॉजीस्टच्या हॉस्पीटलमध्ये गेलं की अशा बऱ्याच केसेस दिसायच्या, आणि अस्वस्थ करायच्या.

आजकालचं भेसळयुक्त जेवण, प्रदूषित वातावरण, मानसिक तणाव आणि नातेसंबंधातले चढउतार ह्या सगळ्यांमुळे अपत्यप्राप्ती हे सुद्धा कधी कधी आव्हानात्मक बनत आहे!.

अशावेळी घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही, प्रत्येक प्रॉब्लेम हा आपल्या अफाट मानसिक शक्तीपुढे क्षुल्लक असतो,

लोकं पण विचित्र असतात नं!

आधी चांगलं करीअर कर, असा धोशा लावतात…

मग करीअर सेट झालं की लाडु कधी देणार असे विचारुन भंडावुन सोडतात, एकदाच्या लग्नाच्या गाठी बांधल्या की, बाळाचे वेध लागतात…..

लग्नाला दोन-तीन वर्ष होतात, आणि पेढे कधी देणार? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येऊ लागतो…

आपल्यापेक्षा त्यांनाच घाई का असते?

हळूहळू गोडीगुलाबीचे दिवस संपतात, लग्नाची नशा उतरते, धीर संपत आला की, पुढचे प्रश्न छळू लागतात.

मूल व्हायला वेळ लागत असेल, पतीपत्नी दोघांनाही वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

नवऱ्याचा पुरुषी अंहकार दुखवतो,

साला, मी नॉर्मल आहे का माझ्यात काही दोष आहे? माझ्या पत्नीला सुख देण्यात मी सक्षम आहे की नाही? फालतु मानसिक दडपण येते.

नको ते विचार मनात येतात, कामावरचं मन उडतं, आपल्या बरोबरच्या, आपल्या पेक्षा लहान असलेली, दुसऱ्यांची मुले बघून आतल्याआत जीव तडफडतो, खुप वाईटही वाटते. विचित्र परीस्थीती असते ही!

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, बायकोवर चिडचिड वाढते, कामावरचं लक्ष उडतं, मन नको, तिकडे भटकत राहतं!

बायकांची अवस्था तर अजून केविलवाणी होते, कारण यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले जातं. (विचारणाऱ्या आणि खोदून विचारणाऱ्या बायकाच असतात)

मग नाना सल्ले दिले जातात, एकीकडे मंदिर, नवस आणि व्रत सुरू होतात, दुसरीकडे वेगवेगळ्या दवाखान्याच्या वाऱ्या सुरू होतात.

कधी आयुर्वेदिक, कधी होमिओपॅथिक आणि कधी एलोपॅथिकला आपण शरण जातो.

मुलं जन्माला घालण्यात तज्ञ असणाऱ्या दवखान्यांच्या, पेपरमधल्या फुलपेज जाहिरातीकडे वाचु लागतो, आणि ‘दवाखाने’ असं लिहलेल्या बाजारात एंट्री करतो.

जितकं मोठं नाव, तितकं खोटं लक्षण.

पेशंटशी कसलंही सोयरसुतक नसणारे, मख्ख चेहरा ठेवुन वावरणारे, सो कॉल्ड तज्ञ ‘डॉक्टर्स’….

आपल्याच तोऱ्यात वावरणाऱ्या आणि घोळका बनवुन…… आपल्याकडे दुर्लक्ष करुन, फिदीफिदी दात काढुन हसणाऱ्या नर्सेस आणि नावाच्या सिस्टर्स.

जिवंत माणसांची सेवा करायचा दिखावा करणारी, पैशाला हपापलेली ही मेलेल्या मनाची माणसं!….

दवाखान्यातल्या गडबड गोंधळापेक्षा, जनांवरांचा बाजार आणि गाढवांचा गोंधळ बरा होता, अशी फिलींग येते.

इथे कुणाचा कुणाला पायपोस नसतो, ना कोणाला आपली चिंता असते.

त्यांच्या लेखी ‘पेशंट’ हे बकरे असतात, आणि जणु काही चकचकीत कपड्यातले ‘कसाई’ मिटक्या मारत, हातातल्या चाकूवर हात फिरवत राहतात.

मोठया मोठया मेडिकल टर्म सांगून घाबरवलं जातं.

“तुमची ही ट्यूब ब्लॉक आहे,”……. “तुमच्यामध्ये सीमेन्स कमी आहेत”……”आय एफ व्ही’ करा, नाहीतर ‘एफ यु पी’ करा,

आपल्याला त्यातलं ‘घंटा’ काहीच कळत नाही…..

भुरट्या, भामट्या आणि निर्लज्ज लोकांच्या गराड्यात आपण सापडलो आहोत का, अशी शंकाही यायला लागते!..

“बाळ होण्याचे चान्सेस आहेत, तसा प्रॉब्लेम मोठा नाही पण आहे”,

“ही ट्रीटमेंट घ्या”,

“ते ऑपरेशन करा”

“ती थेरपी करा”,

“दोनतीन दिवसाला इथे दाखवायला या,

‘रेग्युलर तपासण्या करा”…….. (थोडक्यात तुम्ही गरीब होईपर्यंत आम्हाला श्रीमंत करा)😡

उघड्याला नागडं करणारी ही महागडी ट्रीटमेंट!,

एवढं करूनही बाळ होईल का नाही, सगळं संदिग्धच असतं…… बरं!

प्रत्येक रोगावर ह्यांच्याकडे पन्नास पन्नास टक्के चान्सेस असतात…. म्हणजे हे भाडं-खाऊ सेफ राहतात, धड हो ही म्हणत नाहीत आणि नाहीही म्हणत नाहीत, अधांतरी लटकवतात.

आकर्षणाचा नियम (Law of Attraction)

चित भी मेरी, पट भी मेरी! आणि काहीही झालं तरी, अंटा मेरे बाप का, म्हणजे टॉस करण्यासाठी उधळलेलं नाणं, माझ्या बापाचं!…… तुमच्याजवळ फक्त तुमचं नशीब!.

औषधाचे, पथ्यपाण्याचे आणि सल्ल्यांचे भडीमार चालू होतात…..

शरीराची प्रयोग शाळा करतात, महागडी औषधं खपवण्यासाठी आपला वापर केला जातोय अशी शंकाही आपण घ्यायची नसते……. श्रद्धेने, आपल्याला लुटणाऱ्यांना आपण देवच मानायचं असतं.

गोळ्या घ्या, औषधं घ्या…..

वरुन एका दिवसाआड संबंध ठेवा, अशी दटवणी करतात….

जगातली सर्वात आनन्द देणारी क्रिया, मूल व्हावं, म्हणून जबरदस्तीने ठेवल्यास यांत्रिक आणि नकळत सर्वात उबग आणणारी क्रिया बनू लागते, जीवनातला सगळा आनंद हिरावुन घेतला जातो….

लग्न हा उत्सव नसुन एक प्रकारची शिक्षा वाटायला लागते.

एकुणच ह्या सगळ्या प्रकाराबद्द्ल घृणा आणि चिडचिड निर्माण होते.

आयुष्यात काही राम उरला नाही असे वाटते!

आकर्षणाचा नियम (Law of Attraction)

सकारात्मक विचार करुन ह्या सगळ्यावर मात करता येईल का?……. निश्चितच हो!… आकर्षणाचा नियम (Law of Attraction) वापरून, खाली सांगितलेली बारा सुत्रे वापरुन तुम्ही, तुमच्या मनावर आलेलं मळभ पूर्णपणे नाहीसे करुन, पुन्हा आनंदी जगू शकता, हलकं फुलकं होवुन बागडु शकता.

 

  •  तुम्हाला बाळ होणार आणि होणारच, असा ठाम विश्वास बाळगा!.
  • आपण त्या परमपित्याचं क्रिएशन आहोत, मग आपल्या शरीरात फॉल्टच कसा असेल? आत्मविश्वासाने वावरा. स्वतःवर खुप खुप खुप प्रेम करा.
  • डॉक्टर काहीही बोलले तरी अजिबात घाबरायचं नाही, स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवायचा. हसत हसत सगळे ऐकुन घ्यायचे.
  • मुकी बिचारी कुणी हाका, अशी मेंढरे बनु नका!..
  • स्वतःच्या शरीराची निगा राखा, चांगलं सकस अन्न खा, फळे खा, ज्यूस प्या, भरपूर पाणी प्या, आवर्जून भरपूर व्यायाम करा.
  • योगासने, ध्यान, सुदर्शन क्रिया तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्टया प्रचंड ताकतवान बनवतील!
  • भरपुर खा, प्या, झोपा, एंन्जॉय करा.
  • हसणाऱ्या निरागस, गोंडस मुलांचे फोटो सतत डोळ्यासमोर ठेवा.
  • लोक विचारतात, चौकशा करतात म्हणून रागाराग करून चारचौघात मिसळणं, अजिबात कमी करु नका, उलट, आत्मविश्वासाने, हसतमुखाने प्रत्येकाला सामोरे जा, लोक आपली काळजी करतात म्हणून त्यांचे मनापासुन आभार माना.
  • इतरांशी, जोडीदाराशी आणि स्वतःशीही बोलतना, ‘त्या’ नेमक्या आणि नाजुक प्रश्नावर बोलणे टाळा, त्यासंबंधीची चर्चा टाळा, बाकी दुनियभराच्या टॉपिकवर बोला!
  • नवराबायकोतही खूप हसीमजाक करावा, रुसावे, थट्टा मस्करी करावी, येताजाता एकमेकांना छेडावे, रोमान्स खुलवावा, फुलवावा, प्रणय चेष्टा कराव्यात!
  • आतापर्यंत बाळ झालं नाही, म्हणुण यापुढे होणार नाही, असे नाही.
  • स्वतःशी क्लिअर करावे की आपण मुलं पैदा करायची मशीन नाहीत, आपण माणसं आहोत, नि आनंदी राहणं आपला पहिला हक्क आहे, बाकी सगळं नंतर!…
  • नशिबाला दोष देऊन रडण्यात वेळ घालवू नये, आणि दुसऱ्यांच्या मुलांकडे बघून वाईटही वाटुन घेऊ नये, सर्वाना आशीर्वाद द्यावेत आणि चांगलं वागून, सेवा करुन, आपणही त्यांचे आशीर्वाद मिळवावेत!..
  • सगळ्या टेंशनला गोळी मारा आणि भरपुर पैशे कमवण्याकडे आपलं संपुर्ण लक्ष केंद्रित करा.

(वरील लेखात फक्त भाडखाऊ डॉक्टरांचा उल्लेख केला आहे, जे कोणी प्रामाणिक डॉक्टर सेवाभावाने पेशंटची सेवा करतात, ते मनाला लावुन घेणार नाहीत.)

वाचण्यासारखे आणखी काही….

आर्थिक
प्रेरणादायी
पालकत्व


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “आकर्षणाचा नियम (Law of Attraction) संतानप्राप्तीसाठी वापरता येऊ शकेल का?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।