जगात असतात 8 प्रकारचे लोक, तुम्ही कोणत्या गटात मोडता?
व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो पण नव्या संशोधनानुसार 8 प्रकारचे लोक जगात असतात.
यापैकी एका कोणत्या तरी गटात तुम्ही नक्की सामावता.
तुमचा गट कोणता हे ओळखायला या 8 प्रकारच्या लोकांविषयी जाणून घेऊया.
१) आव्हान स्वीकारणारे
काही लोकांना असं वाटत असतं की आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे.
हे लोक आव्हान स्वीकारणारे असतात.
इतरांचे जीवन सुधारण्यासाठी हे लोक आपली शक्तीपणाला लावतात.
वीर, उदार, आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं.
२) शांतताप्रिय
या व्यक्तींना जगात सर्वत्र शांती असावी असं वाटतं. ही शांती प्रस्थापित करण्यासाठी या व्यक्ती सक्रिय असतात.
कुठंही संघर्ष दिसला तर तो थांबवण्यासाठी या व्यक्ती प्रयत्न करतात.
सर्वांमध्ये स्नेह, प्रेम उत्पन्न होण्यासाठी हे विशेष प्रयत्न करतात.
एक सर्जनशील आशावादी आणि मदतीसाठी तत्पर व्यक्ती म्हणून यांना ओळखलं जातं.
३) शोधक वृत्ती
या व्यक्ती बहिर्मुख आहेत असं वाटत असतं, पण प्रत्यक्षात ते अंतर्मुख असतात.
विचार प्रकट करण्यापेक्षा वाचन आणि लेखन करणं ते निवडतात.
इतरांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करून, प्रेरणादायी लोकांच्या शोधात ही असतात.
४) मदतीला तत्पर
या गटात मोडणाऱ्या व्यक्ती मैत्रीचा हात पुढे करणा-या उदार असतात.
यांच्याकडे सहानुभूती, प्रामाणिकपणा, परोपकारी वृत्ती, निस्वार्थीपणा आणि सगळयांवरती निस्सीम प्रेम करण्याचे गुण असतात.
सदैव मदतीला तयार असल्यामुळे यांचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो.
५) ध्येय गाठणारे
उत्साही, महत्त्वाकांक्षी आणि प्रगतीसाठी सतत कार्यरत असणारे असे या गटातले लोक असतात.
६) सुधारक
एक कठीण व्रत हाती घेणारी माणसं सुधारक म्हणून ओळखली जातात.
जग सुधारण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात.
ज्ञान विवेक आणि चारित्र्यसंपन्न अशीही माणसं प्रामाणिक आणि नीतिमान असतात.
योग्य-अयोग्य गोष्टींची त्यांना जाण असते.
७) व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता
या प्रकारच्या व्यक्ती सजग, अंतर्ज्ञानी आणि जिज्ञासू असतात.
कल्पनाविश्व पासून दूर असणा-या अशा व्यक्ती जरा विचित्र असतात.
अशा व्यक्ती वेगवेगळ्या कल्पना राबवू शकतात आणि छान कौशल्यही विकसित करू शकता.
८) निष्ठावंत
निष्ठावंत माणसांना वचनबद्ध आणि सुरक्षित राहायला आवडतं.
या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे विश्वासार्हता आणि जबाबदारी पेलण्याची ताकद.
ही माणसं स्थिर स्वभावामुळे पूर्णपणे स्वावलंबी असतात.
इतरांच्या इच्छांना मूर्त रूप देण्यासाठी उत्सुक असतात.
हे झाले आठ गट या 8 गटापैकी तुम्ही कोणत्या गटात सामावता हे तुमचं तुम्ही पडताळून पाहू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.