मित्रांनो, शहरी भागात तरी आता स्वतःचे घर म्हणजे फ्लॅट घेणेच शक्य आहे. स्वतंत्र बंगला बांधण्याएवढ्या जमिनी देखील सहज उपलब्ध नाहीत आणि तसे करायला बजेटही जास्त हवे.
साधारणपणे सर्व मध्यमवर्गीय लोकांचा कल हा फ्लॅट घेण्याकडेच असतो. फ्लॅटची किंमत मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या आवाक्यातली वाटते, तसेच त्यासाठी निरनिराळया बँकांचे होम लोन्स सुद्धा सहजपणे उपलब्ध असतात.
परंतु ह्याच फ्लॅट खरेदीसंबंधातल्या एका महत्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे कोणता फ्लॅट खरेदी करावा? रेडी पझेशन म्हणजेच बांधून तयार झालेला की अन्डर कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम सुरू असणारा?
ह्या दोन्ही प्रकारच्या फ्लॅट्सचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. ते कोणते ते आता आपण पाहूया.
१. बरेचदा लोक अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅट कमी रेटने मिळतो तसेच बांधकाम पूर्ण होईपर्यंत फ्लॅटची रक्कम भरण्यासाठी वेळ मिळतो या कारणामुळे अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅटची निवड करतात. हे खरे आहे की रेडी पझेशन फ्लॅट पेक्षा अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅटचा रेट कमी असतो.
तसेच जसजशी बांधकामाची प्रगती होईल तसतसे पेमेंट करायचे असते. परंतु या गोष्टीची भुरळ पडून अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेण्यात काही तोटे देखील आहेत.
अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅट बांधून पूर्ण होण्यासाठी बिल्डरने दिलेला कालावधी वेगवेगळ्या कारणांमुळे वाढू शकतो.
उदाहरणार्थ, बिल्डरला आर्थिक अडचणीमुळे इमारत पूर्ण करता न येणे, इमारत पूर्ण करण्याकरता काही कायदेशीर अडचणी उद्भवणे, पावसाळ्यामुळे बांधकामामध्ये अडचण निर्माण होणे, उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे बांधकामामध्ये अडचण निर्माण होणे, किंवा सध्याच्या काळातील महत्त्वाचे कारण म्हणजे लॉक डाऊन आणि बांधकामावरील मजूर आजारी पडल्यामुळे बांधकाम बंद पडणे या कारणांमुळे ईमारतीचे बांधकाम अनिश्चित काळासाठी लांबणीवर जाऊ शकते.
या पार्श्वभूमीवर थोड्या जास्त रेटने का होईना परंतु बांधकाम पूर्ण झालेला म्हणजेच रेडी पझेशन फ्लॅट घेणे जास्त किफायतशीर ठरू शकते.
महत्त्वाचे म्हणजे अशा रेडी पझेशन फ्लॅटमध्ये आता हा पूर्ण कधी होईल आणि आपल्या ताब्यात कधी मिळेल हा प्रश्नच उरणार नाही. लोन इत्यादी साठी लागणारा वेळ गृहीत धरून बिल्डरला संपूर्ण पेमेंट केले की लगेच फ्लॅट तुमच्या ताब्यात मिळू शकतो. यावरून आपल्या असे लक्षात येते की रेडी पझेशन फ्लॅट घेणे जास्त योग्य आहे.
२. अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅटच्या बाबतीत लोकांना मोहात पाडणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसेजसे बांधकाम प्रगती करेल त्या प्रमाणात बिल्डरला पैसे द्यावे लागतात, त्यामुळे पैसे भरण्यासाठी काही जास्त कालावधी मिळतो. तसेच जर होम लोन घेतले असेल तर लोनच्या रकमेचे संपूर्ण पेमेंट बिल्डरला झाल्यानंतरच बँकेकडून ई. एम. आय. सुरू केला जातो.
त्यामुळे लोकांना असे वाटते की घर ताब्यात मिळाल्यावरच आपल्याला ई.एम.आय. भरावा लागेल आणि ही आपल्या फायद्याची गोष्ट असू शकेल. परंतु घराचा ताबा मिळणे जर अनिश्चित काळापर्यंत लांबले तर बँकेकडून आतापर्यंत झालेल्या पेमेंटवर व्याज आकारले जाऊ लागते आणि ते तुम्हाला भरणे बंधनकारक असते.
त्याचप्रमाणे तुमच्या वरील कर्जाचा बोजा तसाच राहून शिवाय कर्ज फेडण्याचा मुदतीचा कालावधी देखील लांबत जातो. त्याऐवजी जर लगेचच घराचा ताबा घेऊन ईएमआय भरणे सुरू केले तर कर्जफेडीला लवकर सुरुवात होते आणि तुम्हाला लवकर कर्जमुक्त होता येऊ शकते. यावरून देखील असेच सिद्ध होते की रेडी पझेशन फ्लॅट घेणे जास्त योग्य आहे.
३. याबाबतीतला तिसरा मुद्दा असा की जर तुम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्ही अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक केला तर त्या फ्लॅटचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तिथे राहायला जाता येत नाही आणि त्यामुळे सध्या रहात असलेल्या घराचे भाडे आणि नवीन अंडर-कन्स्ट्रक्शन घराचे पेमेंट असा मोठा आर्थिक बोजा तुमच्यावर पडू शकतो.
परंतु जर रेडी पझेशन फ्लॅट तुम्ही घेतलात तर तुम्ही तिथे ताबडतोब राहायला जाऊ शकता आणि त्यामुळे घर भाडे भरण्यासाठी जी रक्कम तुम्ही खर्च करणार होतात त्या रकमेचा विनियोग ईएमआय भरण्यासाठी होऊ शकतो.
तसेच नवीन फ्लॅट जरी तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तरीदेखील रेडी पझेशन फ्लॅट घेणेच फायद्याचे ठरते. कारण असा फ्लॅट घेऊन तुम्ही तो ताबडतोब भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवू शकता.
४. सध्याच्या काळातील रिअल इस्टेट सेक्टरमधील परिस्थिती पाहता बांधकामे पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो आहे ही गोष्ट खरी आहे. असे असताना अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅट जर बुक करायचा असेल तर बिल्डरची विश्वासार्हता खूप महत्त्वाची ठरते.
याशिवाय सध्याची कोविडची परिस्थिती पाहता बांधकाम लांबणीवर पडण्यास लॉकडाउन हे देखील एक कारण ठरू शकते आणि त्या परिस्थितीत नावाजलेले बिल्डर देखील हतबल ठरतात. त्यामुळे अन्डर कन्स्ट्रकशन फ्लॅट बूक करायचाच असेल तर ह्या सर्व बाबींचा आधी विचार करणे आवश्यक आहे.
तर मित्र मैत्रिणींनो, यावरून आपल्या असे लक्षात येते की शक्यतो रेडी पझेशन घर खरेदी करणे हे सर्व दृष्टीने आपल्या फायद्याचे असते. जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर या गोष्टींचा अवश्य विचार करा आणि मगच तुमचा निर्णय घ्या.
जर तुम्ही याआधीच अंडर-कन्स्ट्रक्शन किंवा रेडी पझेशन फ्लॅट घेतला असेल तर तेव्हा तुम्हाला आलेले अनुभव कॉमेंट करून आम्हाला अवश्य सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
shahanya mansane under construction flat gheu naye. Swanubhavarun sangat ahe. Possesion lavkar milat tar nahich shivay book kelyanantar structural changes kele jatat grahakanchya aparoksha…
Obviously right. ..
Amhipn re construction flat ghetlay pn wait karav lagtey …ani kam neat kartil ka nhi yachpn kalat nhi. ..
Do not book under construction or prelaunching flat . i personnaly suffered lot & at present waiting from last 7 years to get my under construction flat.
Under construction jar ghyaycha asel tr builder subvention scheme (Down payment now and rest on possession) madhe gheu shakta, jenekarun tumch loan disbursement on possession gheta yeil tya mule extra interest pay karaychi garaj padanar nahi, Ani builder subvention scheme madhe jr possession delay zala tr tyacha loss builders na hoto buyers na nahi