गुडघेदुखी मध्ये काय करावे आणि काय टाळावे

तुम्ही गुडघेदुखीने हैराण झाला आहात का? तर मग हा लेख काळजीपूर्वक वाचा. गुडघे दुखत असताना काय करावे आणि काय करू नये हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. ह्या लेखात सांगितलेल्या गोष्टी केल्या तर तुमची गुडघेदुखी नक्की आटोक्यात राहील.

गुडघेदुखी हा घरोघरी आढळणारा अगदी कॉमन आजार आहे. गुडघेदुखी वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. काही प्रकारची गुडघेदुखी ही तात्पुरती असते आणि योग्य ती विश्रांती आणि औषधे घेतल्यामुळे ती बरी होऊ शकते.

परंतु काही प्रकारची गुडघेदुखी मात्र कायमस्वरूपी असते आणि त्यावर दीर्घकाळपर्यंत औषधोपचार आणि इतर काळजी घेणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या गुडघेदुखीकडे दुर्लक्ष केल्यास पुढे आणखीन काही गुंतागुंत होऊ शकते. शस्त्रक्रिया करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते.

जर आपल्याला गुडघेदुखीचा त्रास असेल तर काही विशिष्ट गोष्टी करणे आणि काही विशिष्ट गोष्टी न करणे यामुळे आपण तो त्रास आटोक्यात तर ठेवू शकतोच परंतु दीर्घकाळपर्यंत काळजी घेतल्यास गुडघेदुखी पूर्णपणे बरी देखील करता येऊ शकते.

चला तर मग, गुडघेदुखी असेल तर काय करावे आणि काय करू नये हे सविस्तर जाणून घेऊया.

करावे:

१. नियमित व्यायाम: सहसा कोणत्याही वेदना किंवा दुखणे असेल तर व्यायाम न करण्याकडे आपला कल असतो. परंतु खरे तर तज्ञ फिजिओथेरपीस्ट च्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते व्यायाम आणि स्ट्रेचिंग केल्यास गुडघेदुखी सारखे दुखणे आटोक्यात राहून वेदना कमी होण्यास देखील मदत होते. तसेच योग्य तो व्यायाम केल्यामुळे स्नायू बळकट राहून अशक्तपणा येणे टाळले जाते.

करू नये:

१. अतिरेक टाळावा: गुडघेदुखीचा त्रास असल्यास कोणत्याही बाबतीतला अतिरेक टाळणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जर तुमचे गुडघे दुखत असतील तरीही बराच वेळ एका जागी उभे राहणे, बरेच अंतर सलग चालणे, उड्या मारणे यासारख्या गोष्टींचा अतिरेक करणे टाळले पाहिजे. ज्यामुळे गुडघेदुखी वाढेल अशा गोष्टी प्रमाणातच करणे आवश्यक असते.

करावे:

२. RICE (Rest, Ice, Compression,Elevation) या पद्धतीचा अवलंब करा:

गुडघेदुखी होत असेल तर RICE म्हणजेच योग्य तो आराम, बर्फाने शेकणे, बँडेज गुंडाळून दुखऱ्या भागावर दाब देणे आणि बसताना किंवा झोपताना गुडघे उंचावर राहतील अशा स्थितीत बसणे अथवा झोपणे या मेथडचा वापर खूप उपयोगी ठरतो.

करू नये:

२. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे किंवा सुरू असलेली औषधे बंद करणे टाळावे.

गुडघेदुखी हा अगदी कॉमन आजार असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे स्वतःच्याच मनाने घेऊ नयेत, तसेच डॉक्टरांनी आधीच गुडघेदुखीवर दिलेली औषधे आता थोडे बरे वाटते आहे असे वाटून बंद करू नयेत. असे करण्यामुळे गुडघेदुखी मध्ये वाढ होऊन आणखी जास्त इजा होऊ शकते.

करावे:

३. वेदना कमी करण्यासाठी वेगवेगळ्या तापमानाचा शेक घेणे:

गुडघेदुखीवर वेगवेगळ्या तापमानाचा शेक नेहमीच उपयोगी ठरला आहे. गुडघेदुखीच्या सुरुवातीला बर्फाने शेकण्यामुळे बराच आराम पडतो. दिवसातून तीन ते चार वेळा बर्फाचा शेक घेणे उपयोगी ठरते. परंतु त्यानंतर हळूहळू शेक घेण्यासाठी जास्त तापमानाचे उपकरण वापरावे. त्यासाठी हीटिंग पॅड किंवा गरम टॉवेलचा वापर करता येईल. त्यामुळे गुडघेदुखी कमी होते असे आढळून आले आहे.

करू नये:

३. दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये बसणे टाळावे:

गुडघेदुखी असताना एकाच पोझिशनमध्ये दीर्घकाळपर्यंत बसल्यास अथवा उभे राहिल्यास आपले स्नायू ताठरतात आणि सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात. अशावेळी दर थोड्या थोड्या वेळानंतर उठून उभे राहणे, थोडेसे चालणे या गोष्टी फायदेशीर ठरतात. यामुळे स्नायू लवचिक राहून गुडघ्यातील वेदना कमी होण्यास मदत होते.

करावे:

४. योग्य पादत्राणे वापरणे:

गुडघेदुखी टाळण्यासाठी आपल्या मापाची योग्य आणि उत्तम क्वालिटीची पादत्राणे वापरणे हितकारक असते. चुकीच्या मापाची, सोल झिजलेली, जास्त कडक असणारी पादत्राणे वापरल्यास शरीरातील वेगवेगळ्या सांध्यांना इजा पोहोचते, तसेच गुडघेदुखीचा त्रास देखील बळावतो.

करू नये:

४. गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करू नये:

सर्वसामान्य लोकांचा विशेषतः स्त्रियांचा आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करण्याचा कल असतो. परंतु असे करण्यामुळे दुखणे तर बळावतेच शिवाय त्यावर औषध उपचार करणे अवघड होऊन बसते. काही रुग्णांच्या बाबतीत शस्त्रक्रिया करण्याची वेळ देखील येऊ शकते. त्यामुळे गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करू नये. त्यावर वेळीच योग्य ते उपचार घ्यावेत. अन्यथा दुखण्याची तीव्रता वाढू शकते.

करावे:

५. चालताना काठी किंवा वॉकरचा वापर करावा:

जर गुडघे खूप जास्त प्रमाणात दुखत असतील, तर तसेच दुखणे सोसून चालत राहणे योग्य नाही. अशावेळी चालताना आधार व्हावा म्हणून काठी, वॉकर यासारख्या उपकरणांचा जरूर वापर करावा. या उपकरणांच्या मदतीने गुडघ्यावर फार जास्त भार न येता आपण सहज चालू शकतो, ज्यामुळे वेदनेपासून आराम मिळू शकतो. तसेच गुडघ्याचे लिगामेन्ट सुरक्षित राहण्यास मदत होते.

करू नये:

५. दिनचर्येत फार मोठे बदल करू नयेत:

गुडघेदुखीच्या वेदना ज्याच्या त्यालाच नीट कळतात. अशावेळी गुडघे दुखत आहेत म्हणून आपल्या दिनचर्येत फार मोठे बदल करू नयेत. म्हणजे गुडघेदुखीला व्यायाम उपयोगी म्हणून खूप जास्त प्रमाणात व्यायाम करू नये, तसेच गुडघे दुखत आहेत म्हणून व्यायाम संपूर्णपणे बंद करणे हे देखील चुकीचेच. आधीपासून सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटीज तशाच सुरू ठेवाव्यात आणि वेदना कमी करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

करावे:

६. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

गुडघेदुखी सुरू झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब त्या विषयातील तज्ञ असणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच त्यांनी सांगितलेले सर्व औषध उपचार आणि व्यायाम व्यवस्थितपणे करावेत. असे करण्यामुळे गुडघेदुखी आटोक्यात राहून बरी होऊ शकेल. परंतु जर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर गुडघेदुखी बळावल्यामुळे पुढे अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते.

गुडघेदुखी थांबविण्यासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

१. गुडघेदुखीपासून मुक्त होण्याचा सर्वात जलद मार्ग कोणता आहे?

उत्तर: गुडघेदुखीपासून मुक्त होण्यासाठी कोणताही एकच मार्ग नाही, परंतु योग्य फिजिओथेरपी व्यायाम, RICE पद्धत, चालण्याचे साधन आणि इतर यासारख्या चांगल्या पद्धतींमुळे गुढघेदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते.

२. गुडघेदुखीच्या वेळी काय करू नये?

उत्तर: जास्त विश्रांती घेणे, योग्य वॉर्म-अप आणि कूल-डाउन या दिनचर्येकडे दुर्लक्ष करणे आणि खूप जास्त ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणे, गुडघेदुखीपासून बरे होण्यासाठी हानिकारक असू शकते.

३. गुडघेदुखीच्या वेदना कमी करण्यात व्यायाम मदत करू शकतो का?

उत्तर: होय, स्नायूंमध्ये स्थिरता, लवचिकता आणि सामर्थ्य निर्माण करण्यासाठी व्यायाम खूप प्रभावी आहे. गुडघेदुखीपासून चांगल्या प्रकारे बरे होण्यासाठी आणि दिवसभराची कामे सहज करण्यासाठी व्यायाम खूप उपयोगी पडतो.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।