रुबाबदार दाढी आणि पिळदार मिश्या ठेवण्याचा ट्रेंड गेल्या ३-४ वर्षात पुन्हा अॅक्टिव्ह झालेला आपण पहिला आहे.
मोठ मोठे सेलेब्रिटी, किंवा ओटीटी आणि मु्व्ही आणि लोकप्रिय सिरीयलचे नायकसुद्धा शानदार दाढी मिशात वावरताना दिसतात.
पुरुषांसाठी दाढी फार महत्वाची आहे कारण कुठल्याही कृत्रिम घटकाशिवाय ती पुरुषांच्या व्यक्तीमत्वाला एक आकर्षक लूक प्रदान करते.
रुबाबदार दाढीमुळे पुरूषांचा आत्मविश्वास ही वाढीला लागतो.
आजच्या तरुणाईला सुद्धा बिअर्ड लूक भावलेला आहे.
उन्हाळ्यात ही दाढी थोडी त्रासदायक ठरु शकते असा एक गैरसमज आहे.
उन्हाळ्यात दाढीची स्वच्छता राखणं अवघड होतं शिवाय दाढीमुळे उष्णता वाढते असा एक समज आहे.
उलट उन्हाळ्यात दाढी राखण्याचे खूप फायदे आहेत.
समज, गैरसमज या गोंधळातून बाहेर पडून समजून घेऊया उन्हाळ्यात दाढी ठेवण्याचे काही फायदे.
1) दाढीमुळे थंडावा मिळतो.
तुम्हांला वाटलं असेल असं कसं? दाढीमुळे जास्त उकडणार. थंडावा कुठून मिळणार ?
केसांचं कामच मुळी गर्मी वाढवणं असतं तर दाढीमुळे गर्मी वाढणारच.
मित्रांनो असं नाही, ती दाढी आहे पॉलिथिन थोडीच आहे.
उलट एखाद्या झुडुपासारखी असते दाढी. जी हिवाळ्यात त्वचेचं थंडीपासून संरक्षण करते आणि उन्हाळ्यात थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करते.
म्हणूनच उन्हाळ्यात दाढी राखणं, ती नियमित स्वच्छ ठेवणं गरजेचं ठरतं.
दाढीमुळेच उन्हाळ्यात त्वचा सुरक्षित राहू शकते.
उन्हाळा म्हटलं की घाम आलाच, हा घाम उन्हाळ्यात दाढीत झिरपतो आणि कूल फिलिंग देतो, शिवाय चेहऱ्याला मॉइश्चराइझ ही करतो .
2) दाढीमुळे कॅन्सरपासून बचाव
थेट सूर्यप्रकाशाला अडवणारी दाढी, तुम्हांला स्कीन कॅन्सरपासून वाचवते.
ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की दाढी त्वचेवर पडणाऱ्या 95% हानिकारक युव्ही किरणांपासून संरक्षण करते
आता हे वाचल्यानंतर जरा रिलॅक्स होऊन तुम्ही बिनधास्त उन्हाळ्याच्या दिवसात ही दाढी नक्की ठेवाल.
3) आंघोळीनंतर ओल्या दाढीत बाहेर येणं एक शानदार अनुभव.
उन्हाळयात सगळेच दोनदा तरी आंघोळ करतात.
सुदैवाने उन्हाळा कडक असेल तर तीन तीनदा सुद्धा आंघोळ केली जाते.
तुम्ही उन्हाळ्यात नक्की किती वेळा आंघोळ करता माहीत नाही मित्रांनो, पण एक नक्की आंघोळ झाल्यानंतर दाढीसह बाहेर येणं एक वेगळाच अनुभव आहे.
ही आंघोळ स्वीमिंग पूलमध्ये घडलेली असो किंवा तुमच्या बाथरूममध्ये, दाढीला एव्हढंच माहिती असतं उन्हाळ्यात आंघोळीनंतर तुम्हांला कूssल अनुभव द्यायचा.
4) उन्हाळ्यात दाढी चांगली वाढते.
उन्हाळ्यात दाढीची वाढ चांगली होते ही अंंधश्रद्धा नाही.
आश्चर्यचकीत करणारी ही गोष्ट खरी आहे आणि यामागे विज्ञानही आहे.
उन्हाळ्यात फिरताना, शारीरिक हालचाली करताना श्रम जास्त जाणवतात.
मनसोक्त जेवण ही केलं जातं. यामुळे होतं काय की आपल्या शरीराला पुरेशी पोषक तत्वं सहज मिळून, दाढीची वाढ सुद्धा व्यवस्थित होते.
4) दाढीमुळे आत्मविश्वास वाढतो.
रुबाबदार दाढीमुळे तुमच्या दिसण्यामध्ये आकर्षक भरच पडते. पण त्याचबरोबर दाढीमुळे व्यक्तीमत्वाला एक उठाव येतो.
दाढीतल्या रुबाबदार पुरुषाकडे पाहिल्यावर समोरच्या व्यक्तीच्या मनात एकच गोष्ट ठसते ती म्हणजे दाढी कँरी करणा-या पुरुषाचा आत्मविश्वास.
दाढीमुळे खुललेलं पुरुषी व्यक्तीमत्व मोहक आणि आकर्षक दिसतं यात शंका नाही.
त्यामुळे उन्हाळ्यातही दाढी वाढवायला अजिबात घाबरु नका.
5) दाढीमुळे तुमच्या चेहरा परिपूर्ण दिसतो.
दाढी कशीही वाढवली तर तुमच्या व्यक्तीमत्वाचा रुबाब मातीत मिसळेल. दाढीची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. खास बिअर्ड ऑईलचा नियमित वापर करायला हवा.
वेळच्या वेळी दाढी सेट केलीत नीट काळजी घेतलीत तर तुमचं व्यक्तीमत्व झळाळून निघेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.