लघवीला कमी प्रमाणात होणे व त्या संबंधित आजार जाणून घ्या.

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: लघवीला कमी प्रमाणात होणे व त्या संबंधित आजार जाणून घ्या । लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय | लघवी लाल होणे उपाय | लघवी करताना दुखणे

ज्याला कोणताही आजार नाही अशी प्रौढ व्यक्ती चोवीस तासांत साधारणपणे ५०० मिली मूत्र शरीराबाहेर टाकते. जर का दररोज यापेक्षा कमी प्रमाणात लघवीला होत असेल तर हे चांगले लक्षण नाही.

मूत्रप्रवृत्ती साफ होणे खूप महत्त्वाचे आहे. युरीनमधून शरीर विषाक्त पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या डिटॉक्स प्रक्रिया होते. जर ही विषद्रव्ये शरीरात साठून राहिली तर अनेक समस्या निर्माण होतात.

मूत्रप्रवृत्ती कमी होण्याची अनेक कारणे आहेत. कमी प्रमाणात पाणी पिणे, हृदयरोग, मूत्रमार्गामधे अडथळा येणे अशा कारणांमुळे लघवीचे प्रमाण कमी होते. जर अशी लक्षणे दिसत असतील तर लगेच तपासणी केली पाहिजे. कारण हे किडणी खराब होण्याचे प्राथमिक लक्षण असू शकते. याचबरोबर डार्क रंगाचे मूत्र, ताप, छातीत धडधड, ब्लड प्रेशर कमी होणे अशी लक्षणेही आढळतात.

मूत्रप्रवृत्ती कमी होत असेल तर कोणत्या टेस्ट करतात?

  • पोटाची तपासणी करण्यासाठी अल्ट्रासाऊंड
  • इलेक्ट्रोलाइट्स करीता रक्ततपासणी
  • किडनी फंक्शन टेस्ट
  • ब्लड काऊंट
  • पोटाचा सीटी स्कॅन
  • किडणीची तपासणी

मूत्रप्रवृत्ती कमी होण्यावरील उपचार

या अवस्थेत लक्षणांनुसार ट्रिटमेंट करण्यात येते.

शिरेतून सलाईन देतात. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपोआपच लघवीला जास्त होते.

किडणी संबंधित आजार असेल तर डायलिसिस करण्याचा निर्णय डॉक्टर घेतात.

डायलिसिस द्वारे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढली जातात. मूत्रप्रवृत्ती कमी झाल्यामुळे मेंदू, हृदय, पोटातील अवयव व रक्तामध्ये बिघाड होऊ शकतो. त्याचप्रमाणे गोंधळून जाणे, आकडी येणे, हृदय बंद पडणे, रक्त कमी होणे असे अनेक त्रास होऊ शकतात.

मूत्रप्रवृत्ती कमी होणे म्हणजे नक्की काय?

या अवस्थेला वैद्यकीय भाषेत ऑलिग्युरीया असे म्हणतात. चोवीस तासांत ४०० मिली पेक्षाही कमी मूत्र शरीराबाहेर पडत असेल तर मूत्रप्रवृत्ती कमी होते असे म्हणतात.

या अवस्थेला कारणीभूत असणारे घटक पाहूया

  • किडणी खराब होणे
  • शरीरात पाण्याची कमतरता
  • मूत्र शरीरात साठून रहाणे
  • युरीन इन्फेक्शन

मूत्रप्रवृत्ती कमी होण्याची लक्षणे

  • तोंडाला कोरड पडते
  • खूप तहान लागणे
  • चिडचिड होणे
  • स्नायू कमजोर होणे
  • डार्क रंगाचे मूत्र
  • डोळे खोल जाणे
  • ब्लड प्रेशर कमी होणे
  • डोळ्यातील अश्रू कमी होणे / कोरडेपणा
  • छातीत धडधड
  • डोकेदुखी
  • भूक कमी लागणे
  • उलटी येणे
  • हाडे दुखणे
  • त्वचा फिकट पडणे
  • तोंडाला दुर्गंधी येणे
  • ऐकू येण्याची क्षमता कमी होणे

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

खालील लक्षणे जाणवत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • मूत्र विसर्जन खूपच कमी होत असल्यास
  • उलटी व जुलाब होणे
  • ताप येणे
  • पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे
  • लघवीचा रंग गडद होणे
  • पल्स रेट वाढणे
  • चक्कर येणे

मूत्रप्रवृत्ती कमी झाल्यामुळे कोणती गुंतागुंत होऊ शकते?

जर किडण्या योग्य प्रकारे काम करत असतील पण त्यांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसेल तर मूत्र योग्य प्रमाणात बाहेर पडत नाही. किडण्यांचा रक्तपुरवठा दीर्घ काळ कमी राहिला तर त्यामुळे असा धोका निर्माण होतो.

काही विशिष्ट ऍलर्जी किंवा औषधांचा दुष्परिणाम झाल्यामुळे असा त्रास होऊ शकतो.

मूत्रमार्गामधे अवरोध असेल तर मूत्र बाहेर पडत नाही.

उलटी, जुलाब, ताप यामुळे शरीरातील पाणी कमी होते व मूत्रप्रवृत्ती साफ होत नाही.

किमोथेरपी घेतल्यानंतर असा त्रास होतो.

डायबिटीस, हृदय विकार, लिव्हर फेल्युअर, किडणी फेल्युअर यातही मूत्रविसर्जन कमी प्रमाणात होते.

६५ वर्षे व अधिक वयाच्या व्यक्तींना कमी प्रमाणात लघवीला होते.

यावरील उपाय कोणते?

  • शरीरात द्रवपदार्थांचे संतुलन राखणे.
  • उलटी, जुलाब व ताप असताना डिहायड्रेशन न होऊ देणे.
  • यासाठी जलसंजीवनी (ORS) उपयुक्त आहे.
  • डायटिशीयनचा सल्ला घ्यावा व योग्य आहार निवडावा.
  • दीर्घकालीन आजार असतील तर जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.
  • वजन नियंत्रणात ठेवणे.
  • व्यसनापासून दूर रहावे.

मूत्रप्रवृत्ती कमी होत असेल तर केल्या जाणाऱ्या टेस्ट

संपूर्ण शारीरिक परिक्षण, आहार, पाणी पिण्याची सवय, मेडिकल हिस्ट्री लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येते.

खालीलप्रमाणे तपासण्या केल्या जातात

  • यूरीन टेस्ट
  • यूरीन कल्चर
  • अल्ट्रासाऊंड
  • ब्लड टेस्ट
  • सीटी स्कॅन
  • सिस्टोस्कोपी
  • इंट्रा व्हेनस पायलोग्राम

या रोगावरील इलाज पाहूया.

मूत्रमार्गामधील अवरोध दूर करण्यासाठी तसेच लघवीचे प्रमाण मोजण्यासाठी कॅथेटर वापरतात. ही एक प्रकारची थैली असून एका नलिकेतून मूत्र यात जमा होते.

शरीरातील पाण्याचे प्रमाण भरुन काढण्यासाठी सलाईन लावतात.

जर कोणत्याही औषधाने किडणीला त्रास होत असेल तर ही औषधे बदलून देतात.

रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी डायलिसिस करण्याचा निर्णय घेतात.

या आजारावर घरगुती उपाय

  • भरपूर पाणी पिणे.
  • आहारात मीठाचे प्रमाण कमी करणे कारण मिठामुळे शरीरात पाणी साठवून ठेवले जाते.
  • केळी, संत्री, पालक, बटाटा, टोमॅटो यात पोटॅशियम जास्त असते. हे पदार्थ जास्त खाऊ नयेत. याऐवजी सफरचंद, स्ट्रॉबेरी, कॉलीफ्लावर खाऊ शकता.
  • अधिक प्रमाणात प्रोटीन्स घेऊ नये कारण त्यामुळे किडणी वर ताण येतो.
  • ओटीपोटावर गरम पाण्याने शेकणे.
  • पोटावर हलक्या हाताने मालिश करावे.

मूत्रप्रवृत्ती कमी झाल्यामुळे कोणते धोके संभवतात?

  • वारंवार युरीन इन्फेक्शन होणे.
  • मुलांची उंची कमी रहाते.
  • पोटाचे विकार उदा. अपचन, मळमळ, उलटी
  • रक्तविकार उदा. हिमोग्लोबिन कमी होणे, प्लेटलेट्स ( रक्तातील पेशी ) संबंधित आजार
  • नर्व्हस सिस्टिमचे आजार जसे की आकडी, चक्कर, गोंधळून जाणे, अती झोप येणे, शरीर कंप पावणे.
  • इलेक्ट्रोलाइट्स संबंधित आजार
  • रक्तातील सोडीयम, कॅल्शियमची कमतरता. फॉस्फेट वाढणे.
  • हृदयविकार होणे.

सारांश

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी योग्य प्रमाणात लघवीला होणे किती गरजेचे आहे. वरील घरगुती उपाय केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण राखले जाते. इतर लक्षणांवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपाय करावेत. यासाठी विविध तपासण्या करून नेमकी कारणे शोधली जातात. मूत्रप्रवृत्ती कमी होणे हे साधे लक्षण वाटत असले तरी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून उपचार घेणे आवश्यक आहे.

असेल वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी मनाचे Talks ला लाईक करा. लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “लघवीला कमी प्रमाणात होणे व त्या संबंधित आजार जाणून घ्या.”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।