होऊ द्या चर्चा! हा व्हायरल व्हिडीओ बघा आणि तुमचं मत सांगा

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. काही अंशी ते खरं देखील आहे. लहान मुले अगदी निरागस असतात. ती खरे बोलतात. जे मनात असेल ते सांगून टाकतात. पण..

हा ‘पण’ च फार महत्वाचा आहे. काही वेळा मुले निरागसपणाने काहीतरी बोलून जातात. कानावर पडलेलं, आधी ऐकलेलं असं काहीतरी बोलतात ज्याचा त्यांना कदाचित अर्थही समजत नाही.

पण ऐकणाऱ्यांना विशेषतः त्या मुलाच्या आई वडिलांना अगदी कानकोंडल्यासारखं होतं. अगदी एम्बॅरेसिंग सिचुएशन निर्माण होते.

पण मुले असे काही इतक्या निरागसपणे बोलतात की काही वेळा हसू फुटतं. अशा वेळी मग समजत नाही की मुलांच्या बोलण्यावर हसावं की त्यांना रागवून असे बोलू नये असं शिकवावं.

आता हा व्हिडीओच बघाना, एका साध्या, सुंदर बडबडगीतात शेवटी असे शब्द त्या लहान मुलाने म्हटले आहेत. मुलगा लहान आहे, त्याने नक्कीच सहजपणे त्याच्या कानावर जे पडलं तसंच म्हटलं आहे.

आपल्याला त्यावर हसू देखील येतं. पण हे बरोबर आहे का?

लहान मुलांनी अशा रीतीने बोलणे आणि सतत हाताशी असलेल्या मोबाईलने त्यांचे विडिओ काढून आई वडिलांनी ते वायरल करणे कितपत बरोबर आहे?

आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल फोन असतो. त्यामुळे फोटो, विडिओ काढणे अगदी सोपे झाले आहे. आपल्या मुलांचे लहानपणीचे कितीतरी क्षण आठवणींच्या रूपाने विडिओमध्ये कैद करणे आता अगदी सोपे झाले आहे. ह्याचे फायदे तर खूपच आहेत, कारण आपल्या मुलांच्या बालपणातील असे सुंदर सुंदर क्षण आपण पुन्हा पुन्हा अनुभवू शकतो.

आपल्या मुलाने/मुलीने टाकलेले पहिले पाऊल, मारलेली पहिली हाक ह्यांचे विडिओ आई वडिलांसाठी आनंदाचा ठेवा असतात. ते परतपरत पाहणे किंवा सोशल मीडियावर वायरल होणे ह्यात फार काही गैर नाही.

पण मुले जर निरागसपणे किंवा जाणूनबुजून वेडेवाकडे किंवा अनुचित काही बोलली तर मात्र आई वडिलांनी नुसते कौतुक न करता मुलांना वेळोवेळी योग्य ती शिकवण दिली पाहिजे.

कुणाचा अपमान होईल, काही भलते अर्थ निघतील असे मुलांनी बोलणे योग्य नाही, अशा वेळी आई वडिलांनी मुलांच्या बोलण्याला खत पाणी न घालता त्यांना काय चूक काय बरोबर ते शिकवले पाहिजे.

आपली पोटची मुले असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक आई वडिलांना वाटणे स्वाभाविक आहे, ‘आपला तो बाब्या’ असेच आई वडिलांचे फिलिंग असते. परंतु गोष्टी फार बिघडण्याआधी मुलांना योग्य समज देणे देखील आवश्यक आहे.

काही वेळा मुलांचे बोलणे त्या परिस्थितीत हसू आणणारे असते खरे पण त्याचे दूरगामी परिणाम वाईट असू शकतात. अशा वेळी काय करावं? हसून विषय सोडून द्यावा का ह्यावर काही ऍक्शन घ्यावी?

मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला ह्यावर काय वाटतं? लहान आहेत म्हणून मुलांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करावं का त्यांना काय चूक काय बरोबर ह्याची समज देऊन त्यांचे वागणे वेळोवेळी सुधारावं?

ह्याबाबतीत तुमचे मत काय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. होऊ द्या चर्चा….

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।