Wedding Photography – एक गम्मत

नवरीकडचा फोटोग्राफर लहान गावातला हा महानगरातला, त्यात जास्त रेटचा, त्यामुळे नवरी कडच्या फोटोग्राफरने एक तास घेतल्यावर याला जास्त वेळ घेणे आवश्यक होतेच.

त्याने दहा पोजेस घेतल्या तर याने पंधारा घेणेच होते. आजी बिचारी, नातीचं व नातजवायचे भावविभोर क्षण असहायपणे उघड्या डोळ्याने सर्वांसमोर पाहत होती, आजी चिडणार नाही तर काय?

हल्ली लग्न लागल्यावर ती नवरा आणि नवरी फोटोग्राफरच्या ताब्यात द्यावी लागते, पाहुण्यांना त्यांच्याशी न बोलायची सोय ना शुभेच्छा द्यायची.

अशा वेळी पाहुण्यांची नजर जेवणाकडे नाही वळली तर नवलंच. तरी बरं प्रीवेडिंग फोटोग्राफी आधीच काढून झालेली असते.

प्रीवेडिंग फोटोग्राफी हा प्रकार कोणी शोधून काढला त्याला तर एकवीस तोफांची सलामीच दिली पाहिजे (सलामी नेहमी एकवीस तोफांचीच का देतात? गणपतीचा आणि एकवीस आकड्याचा सबन्ध माहीत होता, पण एकवीस आणि तोफेचा काय सबन्ध ? असो आपल्याला काय एकवीस तर एकविसच, तशाही सलामी द्यायला तोफा आहे कुठे?)

तर आपण त्या प्रीवेडिंग फोटोग्राफी वर होतो. हल्ली बऱ्याच बाबी प्रीवेडिंग होतात म्हणून याचीही भरीस भर पडली असावी का?

“आमच्या वेळेस नव्हते बाई असले भलते चाळे” एका लग्नात एक आजी ठसक्यात म्हणाली. चा..ळे ? आजीला फोटोग्राफीचे हे कौंशल्य चाळे वाटत होते.

मग आजीच्या घरी पाळणा कसा लांबला होता? तो एवढा वेळा लांबला होता की, आजोबा पाळणा सतत बांधून ठेवत. एकदा तर एकाच घरात दोन पाळणे एक मायच्या लेकराचा व एक तिच्या लेकीच्या लेकराचा.

तरी देखील आजी या आधुनिक फोटोग्राफी शास्त्राला चाळे म्हणत होती, त्याचे कारणही तसेच आहे.

आजीच्या नातीच्या लग्नात, नातीच्या डोक्यावर अक्षदा पडल्यावर कोणीतरी ‘नारायण’ टाइप कार्यकर्त्याने आजीला, नातीला व नातजवयाला आशीर्वाद देण्यासाठी स्टेज जवळ आणले होते, पण काय तो दुष्ट फोटोग्राफर त्याने नवरा नवरीचा असा ताबा घेतला की एक तास तरी सोडलेच नाही.

कशीतरी त्या फोटोग्राफरच्या तावडीतून सुटका झाल्यावर आजी स्टेजवर जाईल तर मुलाकडच्या फोटोग्राफरने मोर्चा सांभाळला. नवरा मुलगा व नवरीला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला लावून आता त्याला आपली स्किल सिद्ध करायची होती.

नवरीकडचा फोटोग्राफर लहान गावातला हा महानगरातला, त्यात जास्त रेटचा, त्यामुळे नवरी कडच्या फोटोग्राफरने एक तास घेतल्यावर याला जास्त वेळ घेणे आवश्यक होतेच.

त्याने दहा पोजेस घेतल्या तर याने पंधारा घेणेच होते. आजी बिचारी, नातीचं व नातजवायचे भावविभोर क्षण असहायपणे उघड्या डोळ्याने सर्वांसमोर पाहत होती, आजी चिडणार नाही तर काय?

आजीच काय मुला मुलीला भेटायला आलेले सर्व पाहुणे ताटकळत उभे होते पण फोटोग्राफरचं कोणाकडेही लक्ष नव्हतं. अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसायचा तसे याला फक्त नवरा व नवरी…

एक काळ होता नवरा नवरीचा फोटो पाहुण्यांसोबत काढायची रीत होती. (नाही म्हणायला आजही आहे, पण दुय्यम)

आलेल्या पाहुण्यांतला कुणी सुटला तर नाही ना? अशी काळजी दोन्हीकडच्या यजमानांना राहायची.

एखादा ‘बालीचा पाहुणा’ फोटो काढायचा सुटला तर, केलेल्या सोयीची वाट लागायची.

हल्ली मात्र एकदा लग्न ठरले की प्रीवेडिंग शूट पासून सुरू झालेली फोटोग्राफी संपता संपत नाही. तरी बर सेल्फी वैगरे साठी फोन असतातच.

फक्त फोटोसाठीच लग्न काढले की काय, असे या फोटोंना पाहल्यावर वाटत राहते.

हल्ली लग्न झाल्यावर एकदोन महिन्याने कोणाकडे जाण्याचे मी टाळतो कारण गेल्यावर त्या फोटोग्राफरचा पराक्रम चहाच्या घोटासोबत पचवावा लागतो.

त्या अल्बममध्ये आपण असण्याची शक्यता कमीच असते, दिसलोच तर एखाद्या कोपऱ्यात आणि समजा अल्बम पासून सुटका झालीच तर फेसबुक आहेच की वेगवेगळी पोजेस पाहायला.

(तळटीप: हा लेख निव्वळ विनोद निर्माण करण्याच्या उद्देशाने लिहलेला आहे. कोणीही फार गंभीरतेने घेऊ नये, गंभीर वाटल्यास तो दोष लेखकाचा समजावा)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।