प्रेरणादायी कहाणी: तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल

मित्रांनो, तुमचं ऍटीट्युड कसंही असो पण आपल्या स्वतःमध्ये जाणीवपूर्वक काही बदल केले तर तुमचं ऍटीट्युड ‘विनिंग ऍटीट्युड’ मध्ये बदलणे हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे.

ऍटीट्युड दोन प्रकारचे असतात एक ‘विनर्स ऍटीट्युड’ आणि दुसरा ‘लूजर्स ऍटीट्युड’

एकदा जमशेदजी टाटा मुंबईतलं त्या काळचं नावाजलेलं हॉटेल ‘हॉटेल वोट्सन मध्ये गेले. पण या हॉटेलच्या बाहेर लिहिलं होतं ‘कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश निषिद्ध आहे’ तेव्हा या गोष्टीला आपलाच काय पूर्ण भारतीयांचा अपमान समजून जमशेदजी टाटांनी ठरवलं कि यापेक्षाही मोठ जगतविख्यात हॉटेल मी भारतात बनवेल….

प्रेरणादायी कहाणी

हा असतो विनर्स ऍटीट्युड… विनर्स जे संधी शोधत बसत नाहीत तर संधी निर्माण करतात.

कारण यशस्वी लोकांना प्रत्येक अडचणीत संधी दिसते पण अपयशी लोकांना प्रत्येक संधीत अडचण दिसते. त्यामुळे ऍटीट्युड बदलावा लागेल आयुष्य आपोआप बदलेल.

हा ‘विनर्स ऍटीट्युड’ आपल्याला अशी नजर देतो ज्यामुळे आपण जगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. जिथं दुसऱ्यांना फक्त समस्या दिसतात तिथं आपल्याला संधी दिसू शकतात.

प्रेरणादायी कहाणी

आता हेच बघा… एक तरुण होता जो बोलण्यात नुसता अडखळायचा एक वाक्य सुद्धा त्याला न अडखळता स्पष्ट बोलता यायचं नाही. पण त्याचं स्वप्नं होतं ऍक्टर बनण्याचं.

त्याच्या अडखळत बोलण्याने त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. पण त्याने हार मानली नाही त्याने स्वतःचाच एक शो बनवला. होऊन होऊन काय होईल शो चालणार नाही, नाही चालला तर पुढे बघू हा त्याचा ऍटीट्युड होता.

या शो मध्ये त्याने तोंडातून एकही शब्द काढला नाही. फक्त तोडवरचे हावभाव हेच त्याचं भांडवल होतं. हा शो सुपरडूपर हिट ठरला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि हा तरुण म्हणजे कोमिडी मास्टर ‘मिस्टर बीन’…

स्वतःमध्ये असलेल्या कमतरतेमुळे त्याने हार मानली असती तर आपल्याला आज ‘मिस्टर बीन’ जगाला माहीत असता का?

समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, समस्या या येणारच पण या समस्यांकडे तुम्ही कसं पाहताय ते तुमचा ऍटीट्युड डीसाईड करतं.

त्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असो त्यामध्ये चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. कारण समस्या आणि संकटं कधीच एकटी येत नाहीत तर ती आपल्यासोबत अनेक संधी घेऊन येत असतात.

पण होतं असं की आपलं लक्ष हे फक्त समस्यांकडे जातं त्यातली संधी शोधायसाठी समस्येकडे थर्ड पर्सन होऊन बघायची फक्त गरज असते.

जग त्याच लोकांना लक्षात ठेवतं जे आपल्या समस्यांवर मात करून काहीतरी हटके करून दाखवतात. नाहीतर बाकीच्यांना समस्या स्वतःच गाडून टाकतात.

मग सांगा तुम्हाला समस्येसमोर पाय रोऊन उभे राहायला आवडेल की समस्या, संकटं यांच्या दुष्टचक्रात स्वतःला संपवायला आवडेल.

प्रेरणादायी कहाणी

जिथे आपण एकदा फेल झालो तरी हार मानतो तिथे या माणसाला एक नाही दोन नाही कित्येक वेळा नोकरीसाठी डावललं गेलं. आणि नोकरी काही मोठी हाय प्रोफाइल कॉर्पोरेट कम्पनिमधली नाही.

साधी वेटरची नोकरी शोधत होता तो. पण त्याचा ऍटीट्युड त्याला हार मानायला देतंच नव्हता त्यानं त्याच्या अपयशाला वेगळ्या नजरेतून पाहिलं त्यातून तो शिकत गेला.

हा आहे अलिबाब चा फाउंडर ‘जॅक मा’ ज्याला एका वेटरच्या नोकरीसाठी हतबुद्ध व्हायची वेळ आली होती तोच आज चायनाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ही असते विनिंग ऍटीट्युडची ताकत.

एक गोष्ट लक्षात ठेवा चुका त्यांच्याकडूनच होतात, फेल तेच लोक होतात जे प्रयत्न करतात. आणि यांच्या चूका तेच लोक शोधतात जे स्वतः काही करत नाहीत.

यासाठी तुम्ही तुमचा विचार, नजर, ऍटीट्युड इतका पॉजीटीव्ह ठेवा की आयुष्यात कितीही संकटं आली तरी तुम्ही त्यांचा सुद्धा सामना करू शकता.

आणि सर्वात महत्त्वाचं अपयशाला स्वीकार करा. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे मी तुम्हाला सांगायला नको😊

जे लोक आज यशाच्या शिखरावरती आहेत ते सुद्धा कधी न कधी अपयशी झालेच होते. बिल गेट्स, अब्राहम लिंकन, एलॉन मस्क अशी कित्येक उदाहरणं आहेत जे अपयशी होऊन थांबले नाहीत.

त्यांनी जर हार मानली असती तर आज जगाला ही महान नावं माहीत असती का?

आता तुम्ही म्हणाल या सगळ्या खूप दूरच्या गोष्टी झाल्या असं काही कोणीही महान, फेमस लोकांच्या यादीत जाऊन बसू शकत नाही. या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या. काय राव नुसतं ज्ञान वाटायचं काम चालवलंय!!

तर थांबा आपल्या ‘रानु मंडल’ सांगितल्यावर तर पटेल ना… की हार न मानता आपल्यामधला एखादा गुण आपल्याला कुठच्या कुठे नेऊ शकतो.

यासाठी अपयशाला घाबरू नका त्यातून शिकत राहा. प्रत्येकामध्ये काहीना काही अंगभूत गुण असतो. आणि तो गुण त्याला स्वतःलाच हेरायचा असतो.

तुमचा पॉजिटिव्ह विनर्स ऍटीट्युड तुम्हाला यशाकडे घेऊन जाईलच जाईल फक्त गरज आहे न थांबता ध्येयाच्या दिशेने चालत जाण्याची.

९० टक्के लोक अपयशी होण्याच्या भीतीने प्रयत्नच करत नाहीत. यासाठी अपयशाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आधी बदला दृष्टिकोन बदलला तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.

अपयशी होणं हि वाईट गोष्ट नाही. आपण आपल्या अपयशातूनच शिकत जातो. जगातला प्रत्येक जण महान, यशस्वी का होत नाही याचं कारण हेच आहे.

अपयशाकडे आपण विनर्स ऍटीट्युडने बघतो की लूजर्स ऍटीट्युडने यावर आपलं आयुष्य ठरत असतं.

आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला प्रयत्न न करता हार मानणाऱ्या नव्वद टक्क्यांचा भाग व्हायच, की प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाला खेचून आणणाऱ्या दहा टक्के विजेत्यांच्या यादीत आपलं नाव कोरायचं.

जगाच्या भीतीने आपला निर्णय बदलायचा की आपल्या निर्णयाने जग बदलायचं हे आपण ठरवायचं…

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “प्रेरणादायी कहाणी: तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।