फक्त 3500 रुपयांची गुंतवणूक करत, सॅलड विकून पुण्याच्या महिलेने १.५ लाख रूपयाची महिना कमाई सुरू केली.
पुण्यातील उद्योजिका मेघा बाफना, यांनी त्यांचा स्टार्टअप ‘कीप गुड शेप’ द्वारे सॅलड विकण्यासाठी फक्त 3500 रुपये गुंतवले.
आज त्या स्वतः तर लाखांत कमावतातच पण ३० लोकांना रोजगार ही देतात….
जेवणाच्या ‘साइडला’ असणारी आणि कच्च्या पदार्थांची ही डिश स्थिर उत्पन्न मिळवून देईल याचा कुणी विचार केला असेल?
पुण्याच्या मेघा बाफना यांनी हा विचार केला.
रिअल इस्टेट कंपनीत पूर्णवेळ काम करत असताना त्यांनी त्यांची आवड जोपासली.
मेघांना स्वतःच्या कौशल्यांवर खूप विश्वास होता आणि ते कौशल्य वाया घालवायचं नव्हतं.
रिअल इस्टेट क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक काळ अनुभव घेतल्यामुळे, मी माझ्या आवडीच्या गोष्टीवर काम करू शकले, असे ‘कीप गुड शेप’च्या यशस्वी उद्योजिका मेघा बाफना आत्मविश्वासानं सांगतात.
मेघाने त्यांच्या सॅलड बिझनेसची सुरूवात २०१७ मध्ये केली.
“मला फक्त सॅलड बनवण्याची आणि लोकांना खायला घालण्याची आवड नव्हती, तर उद्योजिका होण्याची कल्पना देखील मला मोहात पाडत होती,” असं मेघानं सांगितलं.
एका दिवस सॅलडचा
“मी नेहमीच एक महत्त्वाकांक्षी व्यक्ती होते.
“मी माझी पहिली नोकरी कॉलेजमध्ये असतानाच केली होती, ती ही पैशाची गरज म्हणून नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी!!” मेघाने त्यांचे अनुभव सांगितले.
त्या म्हणतात की आरोग्याच्या काही अडचणींमुळे त्या रोज ऑफिसला स्वतःचं जेवण घेऊन जायच्या
त्यांच्या दुपारच्या जेवणात नेहमीच महत्वाचा मुख्य पदार्थ म्हणजे त्यांचा सॅलड बॉक्स.
त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्याचा आस्वाद घेऊन आणि अनेकदा त्यांनी मेघांना आणखी सॅलड आणायचा आग्रह केला.
मेघाने यात एक संधी पाहिली त्या म्हणतात, “जंक फूड सहज उपलब्ध असताना, चांगले आरोग्यदायी सॅलड एकतर महाग होते किंवा सहज उपलब्ध नव्हते.
ताजं सॅलड्स सहजासहजी मिळत नाहीत ही एक समस्या होती जी मला सोडवायची होती.”
एका रात्री, उत्साहानं मेघानं त्यांच्या पतीशी या व्यवसायाच्या कल्पनेवर चर्चा केली आणि लगेचच सोशल मिडीयासाठी ई-फ्लायर तयार ही केला.
आश्चर्याची गोष्ट अशी की मेघाने त्यांच्या उपक्रमासाठी कोणतंही सशुल्क प्रमोशन केलं नाही.
संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचं हे सॅलड्स माऊथ पब्लिसिटीतूनच सगळ्यांपर्यंत पोहचलं.
मेघाने केवळ ३,५०० रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरुवात केली आणि पहिल्या दिवशी फक्त सहा ऑर्डर मिळाल्या.
पण पुढे पुढे ऑर्डर्स वाढत गेल्या तशी तशी त्यांच्यासमोरची आव्हानं ही वाढत गेली.
मेघाने पूर्ण-वेळ कॉर्पोरेट नोकरी करतच हा व्यवसाय सुरू केला.
पहाटे ४ वाजता मेघाचा दिवस सुरू व्हायचा…
सॅलडसाठी धान्य भिजवायचं मग, ताज्या गोष्टींसाठी बाजार गाठायचा, भाज्या स्वच्छ करून चिरून सॅलडसाठी तयार करायच्या.
एका मागोमाग एक कामं तयारच असायची.
चिरणं, कापणं, आणि तयारी या सगळ्यामध्ये मेघाला त्यांच्या मुलाला शाळेसाठी तयार करणं, सॅलड्स पॅक करून पाठवणं आणि कामावर जाणं या सगळ्या गोष्टी वेळेत बसवण्याची कसरत करावी लागायची.
आपला अनुभव सांगताना मेघा म्हणाल्या, “ती एक रोलर कोस्टर राईड होती, पण मी त्यात ही खूप आनंद लुटला आहे.”
आज मेघा दरमहा दीड लाख रुपये कमावतात.
ग्राहकांना नेहमीच चांगली सेवा देण्याची मेघाची खात्री होती.
पण कसं असतं, विक्री अनेक घटकांवर अवलंबून असते ती कधी वाढू शकते तर कधी खालीही जाऊ शकते.
चार वर्षांपासून उत्तम गुणवत्ता आणि चांगली सेवा राखण्यासाठी मेघानं कठोर मेहनत केली.
व्यवसाय आणि ऑर्डर्स जोरात चालू झाल्या आणि कामाला चांगला वेग मिळाला.
नेमकं तेंव्हाच सरकारनं प्लास्टिक बंदी आणली आणि हा मेघाच्या व्यवसायासाठी मोठा धक्का ठरला.
प्लास्टिक बंदी हा चांगला निर्णय होता पण मेघाच्या व्यवसायासाठी त्याची वेळ चुकीची होती.
नुकतीच व्यवसायाला सुरवात झाली होती आणि प्लास्टिक बंदीमुळे पॅकेजिंगचा प्रश्न उभा राहिला.
पर्याय शोधण्यासाठी झगडावं लागलंच. मेघाने फॉइल वापरणं चालू केलं पण त्यामुळे सॅलड पूर्णपणे ओले झाले.
एका रात्रीत सॅलड विक्री दिवसाला ३०० ऑर्डरवरून दिवसाला ५० पर्यंत खाली गेली.
यावर उपाय शोधावाच लागणार होता. मेघाने पुन्हा वापरता येण्याजोगे प्लास्टिकचे कंटेनर शोधले जे थोडेस महाग होते, परंतु त्यात सॅलड ताजे राहतील याची खात्री होती.
पुर्वीच्या ग्राहकांना परत मिळवण्यासाठी, मेघाने नवीन पॅकेजिंगसह सॅम्पल पॅक पाठवायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांचा विश्वास परत मिळवण्यात त्या यशस्वी ठरल्या.
चार वर्षांच्या व्यवसायात खूप अडथळ्यांचा सामना मेघानं केला.
पण रोज सकाळी उठून त्या समस्या सोडवण्याचे मार्ग शोधून काढणे हेच त्यांना त्यातून शिकायला मिळालं.
आज, मेघाच्या व्यवसायात ३० लोक काम करतात आणि ६ सॅलडपासून सुरुवात करून आज २७ वेगवेगळ्या सॅलड्स पर्यंतचा टप्पा त्यांनी गाठला आहे.
अर्थातच यापैकी काहीही सोपं नव्हतं, पण अथक समर्पण आणि मेहनत फळाला आलीच.
या सॅलडचा मेनू आठवड्याभरात बदलतो आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी सॅलड्स देखील कस्टमाइझ केली जातात.
ज्यांना उच्चरक्तदाब आणि मधुमेहासारख्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी वेगळी सॅलड्स असतात.
१० पेक्षा जास्त महिलांकामगार सोबत असल्यामुळें मेघा स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकतात आणि वीकेंड त्यांच्या कुटुंबासोबत घालवतात.
पहाटे ४ ला सुरू होणारा दिवस आता सकाळी ६.३० ला सुरू होतो.
६२० रुपयांपासून सुरू होणारं साप्ताहिक मॉर्निंग सॅलड सबस्क्रिप्शन पॅक आणि १२०० रुपयांचं सॅलड आणि सूपचे कॉम्बो जेवण, याला सध्या मागणी आहे
मेघा लवकरच ही सेवा मुंबईला घेऊन जाण्याची आशा बाळगतात
तुम्ही पुण्यात असाल तर काही सॅलड तुम्ही ऑर्डर करू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very very nice job