महीला दिन ना आज…

सकाळपासुन शूभेच्छांचा
पाऊसच पडत होता,
महीला दिन ना आज…

म्हणुन स्रियांचा आदर व्हावा,
असं सगळेच सांगत होते.
आजच हं सारं! मग मात्र पुन्हा,
तुझ्याशी सारे जैशे थे चा पाढा
वाचणार होते…

महीलादिन ना आज….

शुभेच्छांसोबत किचनमधला कुकर,
शिटी देवून बोलावणे देत होता…
गॅसवरची भाजी हळुचंच खदखदत होती,
अन् म्हणत होती सूटका नाय हो तुझी..

महिलादिन ना आज….

अंगणातील कचरा ऊडून अस्तित्वाची,
जाणिव करून देत होता…
स्वच्छतेची लढाई तेथे माझा हात,
झाडुशी खेळत होता…

महिलादिन ना आज…

अग! चहा? आई डबा? या आर्त आरोळ्या,
माझ्या नसलेल्या स्व’वर घाला
घालीत होत्या अन् मन मात्र,
उंच आकाशात पंख पसरून
महीलादिनाच्या आनंदात ऊडत होतं…

महिलादिन ना आज…

दहा दहा ची बस तोल सांभाळत,
गाठायची होती अन् हसत आॅफिसात…
एंट्री मारयची होती.. जमलंच तर एक,
मिठी मैत्रिणीला द्यायची होती…

महिलादिन ना आज..,

नवर्‍याचं भांडण, सासूचा जाच अन् बाॅस ने
लावलेली माझी वाट या सार्‍यात,
महिलादिनाची दिलेली खोटीखोटी मुलाखत
सगळंच कस खास वाटत होतं…

महिलादिन ना आज …

संध्याकाळी ओसरलेला पुर सावरत,
पुन्हा घर गाठायचं होतं,
अन् किचनओट्यावरच्या पसाऱ्यातल्या,
भांड्यांशी दोन दोन हात करायचे होते….

महिलादिन ना आज …

असं म्हणत त्याच गिरणीत,
पुन्हा दळायचं होतं, अन् पुढच्या वर्षाच्या
महिलादिनाचे आजच नियोजन करायचे होते
महिला ‘दीन’ ना आज….
हेच तर मनात ठेवायचं होतं….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “महीला दिन ना आज…”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।