मिळाला मोकळा वेळ की लेखात सांगितलेली ही ५ कामं डोळ्यासमोर आणा. कोणतं काम त्या वेळी करता येईल ते जरूर करा.
तुमचं यश तुमच्या समोर चालत येईल. ते येताना दिसलं की एक गोष्ट मात्र करा. “मनाचेTalks” च्या ह्या लेखाला तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. नवीन नवीन तरुणांना त्यातून प्रेरणा मिळेल…..
एखादा ‘यशस्वी’ माणूस आणि एक ‘अयशस्वी’ माणूस ह्या दोघांमध्ये हाच मोठा फरक आहे की ते दोघंही आपल्या मोकळ्या वेळात काय काय कामं करतात?
एखाद्याला आपण आपले आयकॉन मानतो. त्या व्यक्तीसारखेच यश आपल्याला मिळवायचे असते. पण कुठे तरी आपण कमी पडतो आणि मग नाद सोडून देतो.
पण असे हार मानून चालेल कसे मित्रांनो..?
आपले प्रयत्न कुठे कमी पडतायत का ते तरी जाणून घेऊयात या लेखात..
आपला आयकॉन असलेला, तो यशस्वी झालेला माणूस काय काय कामं करत असेल, असं तुम्हाला वाटतंय?
तो जे जे करतो ते ते तुम्ही करून पाहिलेच असेल पण तो निवांत बसलेला असताना किंवा त्याची कामे संपलेली असताना सुद्धा तो कामातच असतो. म्हणजे तो जे काही करतो ते हटके असतं.
मग हाच यशस्वी माणूस तुम्हाला व्हायचं असेल तर कोणती विशेष कामं तुम्हाला करावी लागतील?
एका सर्व्हेमध्ये यशस्वी लोक मोकळ्या वेळात अशी कुठली कामे करतात याचा अभ्यास केला गेला आणि जी अगदी कुणीही करू शकेल अशी कामं आहेत.
तुम्ही जर यशस्वी असाल तर तुम्ही ती करतच असाल, पण तुम्हाला यशाची वाटचाल अजून सुरू करायची आहे, किंवा यश अजून लांब दिसत असेल तर वेळ वाया न घालवता वाचून बघा, कोणती आहेत ती ५ कामं?
१- तुम्हाला प्रेरणा मिळवायची असेल तर नवीन नवीन ठिकाणांना भेटी द्या…
तुम्ही रोज एकाच ठिकाणी तुमचं काही काम करत असाल, त्याच लोकांशी तुमचे व्यवहार होत असतील, एकाच प्रकारचं काम रोज करत असाल, अगदी रोज तुमचा जाण्या येण्याचा रस्ता सुद्धा तोच असेल, तर उठा, आणि तुमच्या मोकळ्या वेळात तिथून कुठे तरी लांब जा.
एखादं रेस्टोरेन्ट किंवा एखाद्या पार्क मध्ये फिरा, किंवा एखाद्या म्युझिअम ला भेट द्या, ज्या ठिकाणी तुम्ही ह्या आधी कधीच गेलाच नसाल.
तिथलं वेगळं वातावरण अनुभवा, तुमचं मन उल्हसित होईल. काही नवीन करायची प्रेरणा तुम्हाला मिळेल.
रोज तेच ठिकाण, तेच काम, तेच लोक, पाहून तुमचं रोजचं जीवन कंटाळवाणं होईल ना?
तिथून जर बाहेर पडलात तर वेगळे लोक तुम्हाला भेटतील, दिसतील, ओळखी होतील.
काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. त्याच त्याच गोष्टींपेक्षा हे काही तरी निराळं वाटेल. त्यातून तुम्हाला काही नवीन कल्पना सुचतील.
बरेच लोक असं आपलं घर सोडून कुठे लांब जात नाहीत. चार भिंतीत आपल्याला कोंडून घेतात, त्याच टीव्ही सिरियल्स बघत बसतात.
त्यांचं आयुष्यच ते मर्यादित करून ठेवतात. एखाद्या विहिरीतल्या बेडकांसारखं. विहिरी शिवाय त्यांना जगात दुसरं काही आहे हे कळतंच नाही.
त्यांनी जरा बाहेर पडून लोकांमध्ये मिसळायला पाहिजे. त्या लोकांशी काही बातचीत केली पाहिजे, विचार समजतील, नवीन काही आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा होईल.
काही लोकांशी दोस्ती होईल. त्यातून जरूरीची असणारी एखादी गोष्ट, माहिती, प्रेरणा मिळून जाईल. तो कदाचित यशाचा ‘स्पार्क’ असेल.
नवीन मित्र मदत सुद्धा करतील. चांगले बदल घडून येतील. असे चांगले बदल घडवून आणण्यासाठी चांगल्या गोष्टी अनेक ठिकाणांवर जाऊन गोळा करायला लागतात.
म्हणून बाहेर पडा आणि यशस्वी लोकांच्याकडून, नवीन माहितीतून, चांगल्या विचारातून, प्रेरणा घ्या.
आपल्या देशाची घटना कशी बनली हे तुम्हाला माहिती आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपली घटना बनवण्या पूर्वी सगळ्या देशांना भेटी दिल्या.
त्यांच्या घटनांचा अभ्यास केला. आणि जे जे मुद्दे चांगले वाटले, ज्या चांगल्या गोष्टी समोर आल्या, त्या डॉ. आंबेडकरांनी प्रत्येक देशातून मिळवल्या.
आणि त्या प्रमाणे सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्र करून भारताची घटना तयार केली. म्हणून आपली घटना इतकी उत्तम आणि श्रेष्ठ होऊ शकली. म्हणून बाबासाहेबांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं.
२- काहीतरी नवीन शिका…
तुम्हाला मोकळा वेळ मिळाला की नवीन काहीही शिका. काहीही म्हणजे, पोहायला शिका, एखादं वाद्य वाजवायला शिका, एखादी भाषा शिका.
ह्यातली एखादी गोष्ट जी तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिकून पूर्ण करता तेंव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं मिळवल्याचा आनंद होईल.
आणि तो म्हणजे तुमचा एक विजय असेल. तुम्हाला पैसे कमावण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होईल. म्हणजे तुम्हाला जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा तुम्ही असं काहीही शिका जे तुमच्या फायद्याचं असेल.
हल्ली यू ट्यूब वर सुद्धा काही काही नवीन शिकायला मिळतं ते सुद्धा शिकता येईल, इंटरनेट चा फायदा करून घेता येईल.
बरेच ऑनलाइन कोर्सेस सुद्धा शिकायला हरकत नाही. कोर्स पूर्ण केल्यावर त्या विषयात मास्टरी मिळवा, तुम्हाला चांगले पैसे कमावता येतील. हि सुद्धा शक्यता आहे.
काही लोक तर हुशार असून सुद्धा इंग्लिश वर त्यांना मास्टरी मिळवता येत नाही. इंग्लिश चांगलं नाही म्हणून चार लोकांशी बोलायला घाबरतात.
आणि पाहिजे तशी आपली प्रगती करून घेऊ शकत नाहीत.
ह्याच लोकांनी फेसबुक वर त्यांचा वेळ फालतू घालवण्या पेक्षा जर मोकळ्या वेळात इंग्लिश चांगलं शिकून घेतलं तर? भल्या भल्याला मागे टाकतील.
मग टाका की.. अडवलंय का कुणी? कोणी अडवत नाही. आपणच आपल्याला ते करण्यासाठी अडवतो. “न्यूनगंड” म्हणतात त्याला. लांब सोडून या त्याला अगदी बॉर्डर च्या पलीकडे.
आणखी काय काय करू शकता तुम्ही? शिकायचंच असं जर तुम्ही मनात पक्कं ठरवलं ना तर तुम्ही मोकळ्या वेळेचं सोनं कराल.
कसं? तुमची बॉडी लँग्वेज सुधारून. स्टेजवर बोलताना, भाषण देताना तुम्ही तुमच्या हातांचा, डोक्याचा, खांद्याचा वापर कसा करायचा, माईकवर बोलताना हातवारे कसे करायचे हे शिकून आत्मसात करायचं.
काही प्रभावी वक्ते कसे बोलतात ते पाहायचं. जमेल त्या वेळी प्रत्यक्ष जाऊन त्यांचं भाषण ऐकायचं, बोलण्याची त्यांची पद्धत समजून घ्यायची.
आणि तसा घरात सतत सराव करायचा. हवा तर तुमचाच एखादा व्हिडीओ तयार करा, आवाजा साठी एखादी ऑडिओ तयार करा, आणि त्या बघून त्यातल्या काय चुका होतात त्या सुधारत तुम्ही सुद्धा प्रभावी वक्ते बना.
मनात पक्कं ठरवा आणि तसे व्हा. असं कोणतही नवीन कौशल्य आत्मसात करा जे तुम्हाला पुढेच घेऊन जाईल.
३- नवीन लोकांना भेटून त्याच्याशी मैत्री करा..
सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे जे लोक फक्त त्यांच्याच छोट्या विश्वात अडकलेले असतात ते प्रगती करू शकत नाहीत.
म्हणून तुम्ही बाहेरच्या मोठ्या विश्वात पाउल टाका. तुम्हाला जसं स्वतःला घडवायचंय आशा लोकांना शोधा त्यांच्या कडून सतत काहीतरी शिकून घ्या.
जिथे नवीन नवीन लोक तुमच्या संपर्कात येतील. त्यातल्या कामाच्या लोकांना हेरून त्यांच्याशी चांगली मैत्री करा.
त्यांच्याप्रमाणे पुढे जाण्याची कौशल्ये त्यांच्याकडूनच शिका. आणखी काही गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या कामात उपयोगी पडतील अशा गोष्टींची माहिती घ्या.
सेमीनार्स, मिटिंग आशा कार्यक्रमात नेहमी जा, तिथे तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा. एखादा माणूस खूप ज्ञानी असतो, पण तो हुशार असतोच असं नाही.
पण जो ज्ञान किंवा पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी कुठून कशा मिळवायच्या हे चांगलं जाणतो आणि त्या सहज मिळवतो तो ‘खरा हुशार’.
नवीन मैत्री करून वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधणे हे नेहमी तुमच्या फायद्याचेच असते. त्यांची तुम्हाला वेगवेगळ्या कामात मदत होईल.
कोणता माणूस कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. असे लोक अडचणीच्या वेळी सुद्धा एकमेकांना सहकार्य करतात.
४- रोज व्यायाम करा…
मित्रांनो तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू ह्या दोन गोष्टींना तुम्ही जर रोज काही ताण दिला नाही तर ते मजबूत राहणार नाहीत. मेंदूला सतत खुराक द्या तो चांगला कार्यरत राहील आणि तुमची स्मरण शक्ती सुद्धा चांगली राहील.
समजा तुम्हाला एक वर्ष काहीही काम करायचं नाही असं सांगितलं, फक्त खायचं आणि झोपायचं एवढंच तुम्ही करायचं.
तर एक वर्षानंतर तुमचं शरीर काहीच काम करण्याच्या लायकीचं राहणार नाही. खरंय की नाही?
तुमच्या शरीराला रोज नियमित व्यायाम दिला तर ते काहीही तक्रार न करता तुमच्या सगळ्या कामासाठी तयार राहील, तंदरुस्त राहील.
तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला तुमचं शरीर तंदरुस्त ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे मेंदू सुद्धा चांगलं काम करेल, त्यासाठी नियमित व्यायाम ही आवश्यक गोष्ट आहे जी तुम्ही रोज केलीच पाहिजे.
मग त्यासाठी तुम्ही दिवसातला तासभर तरी तुमच्या शरीराच्या तंदरुस्ती साठी द्यायला पाहिजे का नको? शरीर अशक्त आणि तुमचे इरादे तुम्ही बुलंद करायचे ठरावलेत तर ते कसं जमणार?
शरीराची साथ तेवढीच महत्वाची नाही का? तुमच्या शरीराला ठणठणीत करायला लागा. तुमचा उत्साह वाढेल.
वाढता उत्साह तुम्हाला मोकळं बसूच देणार नाही. आपोआप तुम्ही तुमच्या नवीन कल्पनांना वाव देण्यासाठी तुमच्या छोट्या विश्वातून बाहेर पडाल.
५- नवीन नवीन पुस्तकं वाचा….
तुम्हाला भरपूर माहिती मिळवायची असेल तर मोकळा वेळ एखादं चांगलं पुस्तक वाचण्यासाठी द्या. ह्या इंटरनेट च्या जगात पुस्तक वाचणं तुम्हाला आवडतही नसेल.
त्याचं कारण आत्तापर्यंत तुम्ही कदाचित कोणतही चांगलं पुस्तक वाचलं नसेल. चांगलं पुस्तक जर तुम्ही नुसतं चाळायला म्हणून हातात घेतलं ना तर अर्ध पुस्तक कधी वाचून संपलं तुम्हाला कळणार नाही.
पुढचं वाचून संपवल्या शिवाय तुम्ही ते हातातून खालीच ठेवणार नाही. बघा वाचून अशी पुस्तकं, मग कळेल असं होतंय का नाही ते.
पुस्तकातून तुम्हाला खूप शिकायला मिळेल. अगदी स्वतःला तुम्ही कसं डेव्हलप करायचं, ह्या विषयाचं पुस्तक वाचलं ना, तरी त्यातून तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्याची सगळी माहिती मिळेल.
तुम्ही त्या पुस्तकाचा आधार घेऊन तुमच्यात सकारात्मक बदल सुद्धा घडऊन आणू शकता. म्हणजे ही पुस्तकं तुमचे गुरू होऊ शकतात.
अशा पुस्तकांमधून भरपूर माहिती तुम्ही गोळा करा. तुम्हाला सिद्ध करायला त्या माहितीचा सगळ्या बाजूने उपयोग होईल.
म्हणजे मोकळ्या वेळात तुम्ही तुमचं ज्ञान वाढवाल. तुमची आतून प्रगती व्हायला पुस्तकांची चांगलीच मदत होईल. तुम्ही बाहेरून कसे दिसता त्या पेक्षा आतून किती समृद्ध होताय ह्याला तुमचा उत्कर्ष साधताना जास्त महत्व येईल.
मग मिळाला मोकळा वेळ की ही ५ कामं डोळ्यासमोर आणा. कोणतं काम त्या वेळी करता येईल ते जरूर करा.
तुमचं यश तुमच्या समोर चालत येईल. ते येताना दिसलं की एक गोष्ट मात्र करा. “मनाचेTalks” च्या ह्या लेखाला तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. नवीन नवीन तरुणांना त्यातून प्रेरणा मिळेल…..
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
very good knowldge for me thanks sir
अप्रतिम लेख….मनाचे Talks तुमचे मनःपुर्वक आभार… असेच नवनवीन लेख प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करा… यामुळे संकटात सापडलेल्या लोकांचे उज्ज्वल भविष्य समृध्द होईल..
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom