व्यवस्थित दिसावं असं पुरुषांना सुद्धा वाटतं, आपल्या लूक बद्दल आता सगळ्यांमध्येच जागृती झालेली आहे.
पुरुषांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग म्हणजे त्यांची दाढी. काही पुरुष रोज दाढी करतात. तर काहीजण दाढी वाढवून त्याची नियमित काळजी घेतात.
रोजच्या रोज गुळगुळीत दाढी करणं चुकीचं आहे अशी एक समजूत आहे. त्यामुळे स्किनला प्रॉब्लेम येतो, त्वचेची हानी होते, नुकसान होतं असं मानलं जातं.
खरंतर दाढी साठी वापरले जाणारे ब्लेड आणि रेझर कोणत्या क्वॉलिटीचं आहे त्यावर तुमच्या स्किनला रोज केलेल्या दाढीचा फायदा होणार की तोटा हे ठरतं.
उत्तम क्वालिटीचे ब्लेड आणि रेझर वापरलं तर तुम्हाला रोज दाढी केल्याचा फायदा होऊ शकतो.
रोज दाढी केलीतर कोणते फायदे होतात?
१) डेड स्कीन निघून जाते.
रोज दाढी केल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की चेह-यावरची डेड स्कीन निघून जाते.
धूळ प्रदूषण आणि चेहऱ्यावरील मृतपेशी याच्यामुळे चेहरा काळवंडतो.
चांगल्या क्वालिटीचे रेझर ब्लेड आणि फोम, क्रीम वापरून जर योग्य पद्धतीने रोज दाढी केली तर या मृतपेशी निघून जातील, चेहरा उजळेल, आणि पिंपल सुद्धा कमी होतील.
२) त्वचा नितळ होते.
योग्य प्रकारची क्रीम जर निवडली तर त्या क्रीम मध्ये असणारे घटक त्वचेला ओलावा देतात, त्वचेचं पोषण करतात.
त्यामुळे त्वचा उजळते.
त्यामुळेच रोज केलेली दाढी ही चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते.
शेविंग क्रीमची निवड करताना आपली स्किन कोणत्या प्रकारची आहे याचाही विचार महत्त्वाचा ठरतो.
३) त्वचेची सुरक्षितता वाढते.
बहुतेक शेविंग क्रीम मध्ये किंवा फोममध्ये अँटिबॅक्टेरियल तत्वं असतात. त्यामुळे त्वचेवरील फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिया कमी होतात.
दररोज शेव्हिंग केल्यामुळे चेहर्याच्या त्वचेची सुरक्षितता वाढते, आणि चेहरा आकर्षक दिसतो.
४) त्वचा ताजीतवानी होते.
ज्या व्यक्ती दररोज दाढी करत नाही त्यांच्या चेहऱ्यावर एक डलनेस आलेला दिसून येतो.
त्वचा राकट दिसायला लागते.
मात्र दररोज दाढी केल्यामुळे चेहरा एकदम प्रेश दिसतो.
आत्मविश्वास निर्माण होतो आणि व्यक्तिमत्त्वाचा एक छान प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो.
५) दाढी करताना या ही गोष्टी लक्षात ठेवा.
दाढी करायच्या आधी चेहरा कोमट पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्या टॉवेलने अलगद चेहरा टिपून घ्या.
त्यावर मॉइश्चरायझर लावा. हे मॉइस्चरायझर दोन ते तीन मिनिट तरी चेहऱ्यावरती असलं पाहिजे.
त्यानंतरच दाढी करायला सुरुवात करा. दाढी करण्यासाठी जे ब्लेड किंवा रेझर घेणार आहात ते शार्प असल्याची खात्री करून घ्या.
डिस्पोजेबल लेझर वापरताना ते योग्य वेळी बदलण्याची काळजी घ्या. ज्या दिशेने केस वाढलेले असतात त्याच दिशेनं कटिंग करा त्यामुळे चेहऱ्यावर कापण्याची शक्यता कमी होते.
आता बिनधास्त रोज दाढी करा. रेझर ब्लेड क्रीम काळजीपूर्वक निवडा आणि दाढी करण्याचे फायदे मिळवा.
चांगली दाढी वाढवण्यासाठी आहारात या चार गोष्टीचा समावेश करा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.