वाट चुकलेली…..

दुपारच्या विश्रांतीनंतरची वेळ…….

माझ्या समोरची पेशंटची मम्मी अचानक किंचाळली…… मी दचकलो…. 

डोळ्यासमोरून काळे काही तरी सरकल्यासारखे झाले. मी उठलो……

शेजारी असलेल्या वजनकाट्याजवळ हालचाल झाली…..

पाहतो तर इटुकली खारूताई 🐿 अंग चोरून लपलेली. मी अलगद पकडले तिला. किती छोटी अन् सुंदर होती. तळहातावर सहज बसली…… नाजुकशी,मऊशार……

वाटले सोडूच नये. पण वाट चुकलेली ती… कुणालाही सहज सापडली असती. कदाचित जीवाला मुकली असती…… तळहातावर घेऊन तसाच बाहेर गेलो….

जीन्यापलीकडे सीताफळाचे झाड होते… अलगद हात मोकळा केला… सरसर शेंड्याशी गेली…… हातावर स्पर्श ठेवून…..🐿

असेच घडावे ना कुणी “वाट चुकलेली” भेटली तरी……. कुणीही…..

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।