​The Man Who Knew Infinity- भारतीय गणितज्ञाचा एक हॉलीवूडपट

श्रीनिवास रामानुजन म्हणजे गणिताला पडलेलं एक अदभूत स्वप्न. अवघ्या ३२ वर्षांच्याआयुष्यात त्यांनी तब्बल ३९०० प्रमेय मांडलीत. त्यातील जवळपास सगळीच प्रमेय आता गणिताच्या भाषेत बरोबर आहेत हे सिद्ध झाल आहे. १८८७ ते १९२० अश्या छोट्या आयुष्यात त्यांनी जे गणितामध्ये काम केल ते अजूनही कोणाला जमलेलं नाही. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी लंडन येथील रॉयल सोसायटी ची फेलोशिप मिळाली. असा बहुमान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. १९१८ साली ट्रिनिटी कॉलेज केंब्रीज ची फेलोशिप सुद्धा त्यांना मिळाली. हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

Shrinivas Ramanujan
Shrinivas Ramanujan

गणित आणि अवकाश ह्या दोन्ही क्षेत्रात भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारतीयांच्या ह्या बुद्धिमत्तेचे अटकेपार झेंडे जर कोणी लावले असतील तर श्रीनिवास रामानुजन ह्यांनी. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी गणितातील ५००० थियरम वाचून काढली होती. पुढल्याच वर्षी म्हणजे अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी बर्नोली नंबर  तसेच युरल- मास्चोरेनी कोन्सटट  यांची साधारण १५ डेसिमल प्लेसेस पर्यंत आकडेमोड केली होता. ह्या वयात अश्या अदभूत बुद्धिमत्तेने त्यांनी जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्यांनी सबमिट केलेले पेपर तर त्या काळातील गणिती विद्वानांना ही बुचकळ्यात टाकत होते.

पण ह्या बुद्धिमत्तेला जी. एच. हार्डी ह्या इंग्लिश गणिततज्ञाने ओळ्खलं आणि त्यांना संशोधनासाठी इंग्लंड ला बोलावलं. रामानुजन यांनी जे कार्य केलं त्यांच्या विद्वत्तेला हार्डी ह्यांनी आपल्या एका वाक्यात सगळ स्पष्ट केल आहे.

Hardy’s personal ratings of mathematicians. Suppose that we rate mathematicians on the basis of pure talent on a scale from 0 to 100, Hardy gave himself a score of 25, J.E. Littlewood 30, David Hilbert 80 and Ramanujan 100.

रामानुजन ह्यांनी गणितातील असे शोध लावले ज्यावर प्रचंड अस संशोधन आजही चालू आहे. “हार्डी आणि रामानुजन नंबर १७२९” हा हि एक गणिती शोध रामानुजन ह्यांनी लावला. ह्याच्या मागची कथा मोठी मजेशीर आहे.

रामानुजन आजारी असतांना जेव्हा हार्डी एका टॅक्सीमध्ये बसून त्यांना भेटण्यासाठी आले तेव्हा रामानुजन यांनी सहजच टॅक्सीचा नम्बर काय होता असे विचारले. ज्या माणसाला आकड्यांशी गट्टी असेल तोच विचारेल असा हा एक विचत्र प्रश्न? हार्डीने सांगितले की १७२९ असा काहीतरी कंटाळवाणा नम्बर होता. त्यावर रामानुजन बोलले की तो काही कंटाळवाणा क्रमांक नाही तर तो खूपच मनोरंजक आहे.

असा हा भारतीय गणितज्ञ आपल्या मागे एक खूप मोठा वारसा ठेऊन गेला. पण आपल्याच पूर्वजांना विसरण्यात धन्यता मानणारे आपण जेव्हा जगाने नोंद घेतली जाते. तेव्हा जागे होतो. सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान मध्ये डूबलेल्या त्यांचे तद्दन फालतू आणि टुकार पिक्चर बघण्यासाठी तिकीटबारीवर गर्दी करणाऱ्या सो कोल्ड सुजाण प्रेक्षकांना ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर एक चांगला सिनेमा येऊन गेला हे माहित ही नसेल. रामानुजन यांचा जीवनप्रवास रेखाटणारे पुस्तक The Man Who Knew Infinity  हेही अभ्यासू वाचकांनी किंवा गणिताच्या विद्यार्थ्यांनी वाचावे असेच आहे.

The-Man-Who-Knew-Infinity
The-Man-Who-Knew-Infinity

ज्यांच्या स्मरणार्थ आपण २२ डिसेंबर हा दिवस गणिती दिवस साजरा करतो. त्या भारताच्या अदभूत गणिती तज्ञावर हॉलीवूड ने एक सिनेमा काढला. देव पटेल चा हा चित्रपट चुकवू नये असाच होता. पण टुकार खानांच्या गर्दीत जगाला गणित शिकवणाऱ्या गणिततज्ञाचं आयुष्य जवळून अनुभवण्याचा योग मात्र आपण हरवून बसलो. म्हणून कदाचित फायनाइट मध्ये रमणाऱ्या लोकांना कस कळणार… “The Man Who Knew Infinity”

ज्यांच्या स्मरणार्थ आपण २२ डिसेंबर हा दिवस गणिती दिवस साजरा करतो. त्या भारताच्या अदभूत गणिती तज्ञावर हॉलीवूड ने एक सिनेमा काढला. देव पटेल चा हा चित्रपट चुकवू नये असाच होता. पण टुकार खानांच्या गर्दीत जगाला गणित शिकवणाऱ्या गणिततज्ञाचं आयुष्य जवळून अनुभवण्याचा योग मात्र आपण हरवून बसलो.

The Man Who Knew Infinity: A Life of the Genius Ramanujan MP3 CD


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।