समस्या सोडवण्यात कुशल होण्याचे सहा सोपे मार्ग

हे वाचा आणि आपल्या मित्र मंडळीत आपली ओळख, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मशीन अशी करून घ्या!!

आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून आणि यु ट्यूबच्या व्हिडिओंमधून पाहिले. तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.

आयुष्यात प्रत्येक दिवशी आपल्या समोर कोणती ना कोणती समस्या उभी असतेच असं म्हटलं तर तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल पण हे पूर्णपणे खरं आहे.

आता तुम्ही म्हणाल एवढ्या काय समस्या येतात आपल्याला रोज, तर आपण आपला दिनक्रम बघू.

सकाळी उठल्यावर आपल्या समोर प्रश्न असतो कपडे काय घालावेत? ही सुद्धा एक लहानशी समस्याच असते.

नंतर नाश्ता काय बनवायचा ह्या लहानश्या समस्येपासून सुरु होणारा प्रवास अगदी करीयर मध्ये आपण पुढे कसं जायचं, दुसरा जॉब बघावा का, स्वतःचा बिझनेस सुरु करावा का?

अशा अनेक कठीण समस्यांवर येऊन थांबतो. तुम्ही कोण आहात, काय करता ह्यावर तुमच्या समस्यांचे स्वरूप बदलते मात्र समस्या ह्या प्रत्येक माणसाला असतातच.

अंबानींच्या समस्या भले साधी नोकरी करणाऱ्या माणसाच्या समस्यांपेक्षा वेगळ्या असतील पण त्यांना सुद्धा त्या माणसाएवढ्याच किंबहुना जास्त समस्या असतात.

आपण आपल्या समोर असणाऱ्या समस्यांचा विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की बऱ्याचशा किंवा कधीकधी अगदी सगळ्याच समस्या ह्या निर्णय न घेण्यामुळे आलेल्या असतात.

आपल्याला त्या सोडवण्यासाठी फक्त एक निर्णय घ्यायचा असतो.

घाबरून किंवा दुर्लक्ष करून आपण तो निर्णय घेणे टाळत असतो ज्यामुळे ती समस्या अजून वाढत जाते.

आपल्यासमोर जेवढ्या समस्या असतात तेवढाच आपल्याला होणारा त्रास वाढत जातो आणि आपल्या आसपास असणाऱ्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास जाणवू लागतो.

यामुळे समस्या न सोडवता येणाऱ्या माणसाच्या जवळपास फार लोक राहणे पसंत करत नाहीत.

समस्या सोडवता येणे का महत्वाचे आहे ?

प्रत्येक माणसाला समस्या ह्या असतातच हे आपण आताच बघितलं. ह्या समस्या म्हणजे कधी कधी एखादी परिस्थिती असते, कधी एखादा प्रश्न असतो तर कधी एखादा माणूस असतो.

ह्या सगळ्यातून मार्ग काढता येणे हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते. स्टीव्ह जॉब्स सारखे मोठे उद्योजक असो किंवा महात्मा गांधींसारखे महान नेते असो ते समस्या सोडवण्यात प्रवीण होते म्हणून ते एवढे यशस्वी होऊ शकले.

आपल्याला एवढे मोठे प्रश्न सोडवायचे नसले तरी आयुष्यात येणाऱ्या लहान लहान समस्या सोडवण्यासाठी आपल्याला समस्या सोडवता येणे फार गरजेचे असते.

आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून आणि यु-ट्यूबच्या व्हिडिओंमधून पाहिले.

तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.

१. उपायाकडे लक्ष द्या, समस्येकडे नाही

संशोधनाने हे सिद्ध झालेले आहे की जर आपण समस्येवर लक्ष केंद्रित केले तर आपला मेंदू त्या समस्येचा उपाय शोधून काढू शकत नाही.

आपण जेव्हा समस्येचा विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूला आपण नकारात्मकता पुरवत असतो ज्यामुळे आपल्या मेंदूतून नकारात्मात भावना सुरु होतात आणि ह्या नकारात्मक भावना आपल्याला समस्येचे समाधान शोधून काढण्यापासून अडवतात.

ह्याचा अर्थ असा नाही की आपण समस्येकडे दुर्लक्ष करायचे!!

एकदा समस्या समजून घ्यायची आणि आणि त्यानंतर आपली सगळी उर्जा त्या समस्येचे समाधान शोधण्यात लावायची…

हे करताना आपण शांत असणे सगळ्यात महत्वाचे आहे. आपल्या समोर असणाऱ्या समस्येतून आपण बाहेर कसे पडू शकतो हा एकच विचार आपल्या मनात असणे गरजेचे आहे.

हे असं का झालं? कुणाच्या चुकीमुळे झालं? हे माझ्याच बाबतीत का झालं? असल्या निरर्थक विचारांना आपण आपल्या मनातून हद्दपार करणे गरजेचे आहे.

हे केल्याने आपले विचार स्पष्ट राहतात आणि आपल्याला समस्येचे समाधान सहज शोधता येते.

२. समस्येला प्रश्न विचारायला शिका

आपल्या समोर कुठलीही समस्या असेल आणि आपल्याला ती सोडवायची असेल तर आपल्याला त्या समस्येला “का” हा प्रश्न विचारता आला पाहिजे.

हे नीट समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपली समस्या आहे “मी ऑफिसला रोज उशिरा जातो” आता आपण प्रश्न विचारू

प्रश्न : मी ऑफिसला उशिरा का जातो?

उत्तर : मला उठायला उशीर होतो.

प्रश्न : मला उठायला उशीर का होतो ?

उत्तर : मला रात्री झोप येत नाही म्हणून मी फेसबुक बघत उशिरा पर्यंत जागा असतो.

प्रश्न : मला रात्री झोप का येत नाही ?

उत्तर : दिवसा झोप येऊ नये म्हणून मी बऱ्याचवेळा कॉफी पितो.

प्रश्न : मला दिवसा झोप का येते?

उत्तर : रात्री झोप पूर्ण न झाल्यामुळे.

आता आपल्या लक्षात येईल ही समस्या म्हणजे एक दुष्टचक्र आहे. ह्यातून बाहेर पडायचे असेल तर हे दुष्टचक तोडावे लागेल.

दिवसा कॉफी पिणे आणि रात्री फेसबुक बघणे बंद केले तर वेळेत झोप येईल, त्यामुळे वेळेत जाग येईल, ऑफिसला जायला उशीर होणार नाही आणि झोप पूर्ण झाल्यामुळे दिवसा झोप येणार नाही त्यामुळे कॉफी प्यायची गरजच लागणार नाही.

अशाप्रकारे आपल्या समस्येला प्रश्न विचारून त्यातून आपण उत्तर मिळवू शकतो. मित्रांनो ऐकून किंवा वाचून कदाचित हस्यास्पद वाटेल तुम्हाला, पण हा लेख वाचून झाल्यावर एक अशी एक्झरसाईझ घ्या कि, तुमच्या समोर असलेल्या एखाद्या समस्येवर अशी प्रश्नांची साखळी तयार करून बघा.

मुळाशी तुम्हाला एक उत्तर नक्की मिळेल. आणि या उत्तरावर काम करणे जमले तर समस्या तुमच्या आसपास फिरकणार सुद्धा नाही.

३. गुंता करू नका सोडवा

बऱ्याचदा आपण अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा खूप गुंतागुंतीच्या करून टाकतो ज्यामुळे त्या समस्या बनतात आणि त्या सोडवणे आपल्याला खूप कठीण जाते.

कोणतीही समस्या सोडवण्यासाठी आधी त्यात असलेली गुंतागुंत नाहीशी करून तिला साधी बनवणे आवश्यक असते ज्यामुळे आपण ती समस्या समजून घेऊ शकतो आणि नंतर ती आरामात सोडवू सुद्धा शकतो.

४. सर्व शक्यता ध्यानात घ्या!!

कोणतीही समस्या आपल्या समोर आली आणि आपण तिच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करायला लागलो की बऱ्याचदा आपण मनात आलेला पहिला उपाय करून मोकळे होतो किंवा एकापेक्षा जास्त उपाय सुचत असतील तर गोंधळून जातो.

अशावेळी आपल्याला सुचणारे सगळे उपाय आपण एकत्र लिहून काढावेत.

सगळे उपाय लिहून काढल्यामुळे आपले काम खूप सोपे होऊन जाते. आता आपल्याला समोर असलेल्या उपायांपैकी सगळ्यात परिणामकारक उपाय अमलात आणणे सहज शक्य असते किंवा जर तो काही कारणाने अमलात आणता आला नाही तरी आपल्याकडे बाकीचे उपाय तयार असतात.

५. सगळ्या बाजूंनी विचार करा

एखादी समस्या आपल्याला फार कठीण वाटते, आपण कितीही विचार केला तरी आपण ती सोडवू शकत नाही मात्र तीच समस्या एखादा दुसरा माणूस अगदी सहज सोडवतो. हे का होते ?

आपण कधीकधी समस्येवर विचार करताना फक्त एकाच बाजूने विचार करतो त्यामुळे आपल्याला उपाय शोधता येत नाही.

ह्यामुळे कोणतीही समस्या असेल त्यावर आपण सगळ्या बाजूंनी आणि सारासार विचार करणे फार गरजेचे असते.

६. समस्येबद्दल नकारात्मक विचार कधीही करू नका

कोणत्याही समस्येवर विचार करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मकता.

आपण उपायांवर विचार करताना “असं झालं तर….” “समजा आपण असं केलं तर…..” अशाच प्रकारे विचार करणे गरजेचे आहे.

ह्यामुळे आपला मेंदू सकारात्मक उर्जेने काम करायला लागतो आणि कठीणत कठीण काम आपण अगदी चुटकीत सोडवून टाकतो.

“हे मला शक्य नाही…” “असं कसं होईल…” अशा प्रकारे विचार केले तर आपला मेंदू सुद्धा नकारात्मक होऊन जाईल आणि आपण त्या समस्या कधीच सोडवू शकणार नाही. म्हणून चुकूनही समस्या सोडवताना त्या समस्येचा नकारात्मक विचार करू नका.

ह्या सहा प्रकारे आपण आपल्या आयुष्यातल्या समस्यांचा सामना केला तर आपल्याला त्यांना घाबरण्याची काहीच गरज नसेल.

खरे तर आपल्या आयुष्यातल्या समस्या ह्या आपल्या वागण्याचा प्रतिसाद असतो. प्रत्येक समस्या आपल्याला सांगत असते की तू ही गोष्ट बरोबर करत नाहीयेस आणि तू त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपण ते ऐकून त्यावर काम केले तर आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कुणीच अडवू शकत नाही.

तर ह्या सहा मार्गांचा आयुष्यात वापर करा आणि तुमच्या समोरच्या मोठ्यात मोठ्या समस्या सोडवा आणि तुम्ही सोडवलेल्या समस्या आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “समस्या सोडवण्यात कुशल होण्याचे सहा सोपे मार्ग”

  1. अतिशय सुरेख पद्धतीने समस्या समजून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने सकारत्मक विचार करून त्या सोडवू शकतो या बद्धल माहिती या लेखातून टीप च्या माध्यमातून दिली आहे.
    साकारत्मकता पसरविण्याचा या उपक्रमाला मनाचे talks टीम ला शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय