‘व्यक्तिमत्त्व विकास’ करायचा म्हणजे नक्की करायचं तरी काय?

आपले व्यक्तिमत्त्व हे आपलं वागणं, बोलणं असतं हे जरी खरं आहे तरी त्याचं मूळ हे आपल्या सवयी आपल्या विचारांचं पॅटर्न यात आहे, याचा आपण कधी विचार करतो का? याचबद्दल बोलू आजच्या या लेखात.

मार्च, एप्रिल महिन्यात सगळ्या परीक्षांचं, टेन्शनचं वातावरण संपलं की बऱ्याच ठिकाणी जाहिराती झळकतात. “व्यक्तिमत्त्व विकास शिबिर”.

काही ठराविक दिवसाचं हे ट्रेनिंग बऱ्याच ठिकाणी दिलं जातं. ह्याच वेळेत सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक घरातल्या परीक्षेच्या वातावरणातून मोकळं झालेले असतात.

आता पुढचा महिना दीड महिना मस्त मज्जा करायची असते. अभ्यास करा असं मुलांना कोणी म्हणणारं नसतं, किंवा मुलांचा अभ्यास घ्यायचाय हे आई वडिलांना टेन्शन नसतं.

ह्याच वेळात काहीतरी नवीन शिकून घ्यायचं असतं, म्हणून सगळीकडे अशा जाहिराती दिसायला लागतात.

वास्तविक पाहता आई वडील ह्या व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल जाणून असतील तर मुलांना सुद्धा ते काही शिकवू शकतात. पण आई वडील सुद्धा ह्या बाबतीत काही जाणत नसतील तर मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास चांगला होत नाही म्हणून दोघांनी हे चांगलं समजून घेतलं पाहिजे.

कारण जे तुम्ही स्वतः मिळून करू शकता, त्यापेक्षा चांगले काही हजाराच्या घरात फी घेऊन, काही तासात होऊ शकेल का? हाही एक संशोधनाचा विषय आहे.

मग हा व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे नक्की काय आहे ते तर समजून घेऊ.

प्रत्येक व्यक्ती मध्ये बरेच चांगले गुण असतात. कला असतात, हातोटी असते, काही चांगलं करण्याची धमक असते, म्हणजे प्रत्येक माणूस हा दुसऱ्या पेक्षा काही वेगळा असतो.

ही प्रत्येकामधे खास विशेषता असते. काही व्यक्ती खूप संवेदनशील असतात. म्हणजे काही वेगळं काम करायला जरा घाबरतात. त्यांच्यात स्वतः बद्दल न्यूनगंड असतो.

म्हणजे ते इतरांपेक्षा स्वतःला कमी समजतात. अशा लोकांचं त्यांच्याकडे एखादी विशेष हातोटी असून सुद्धा आयुष्यात नुकसान होतं. आपली प्रगती हे लोक हवी तशी करून घेऊ शकत नाहीत.

उदाहरण द्यायचं झालं तर, चार लोकांमध्ये एखाद्या विषयावर चर्चा करताना हे लोक शांत बसून इतर लोक काय बोलतात तेवढं ऐकत असतात पण प्रतिक्रिया देत नाहीत. ह्याचाच अर्थ त्यांच्यात आत्मविश्वास नसतो.

काही लोक स्टेजवर चार शब्द बोलायला सुद्धा घाबरतात. कारण आयुष्यात कधी असं बोलायचं धाडसच केलेलं नसतं.

आपल्या समोर बसलेल्या एखाद्या व्यक्तीला काही पटवून सांगायचं असेल तर काही जण ते सहज पटवून देऊ शकत नाहीत. कारण त्या विषयाचं ज्ञान त्यांच्याजवळ नसतं. मग काय बोलणार हा प्रश्न पडतो.

आम्ही कॉलेज मध्ये असताना एका एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. विनोदी एकांकिका होती.

सगळे मिळून अकरा जण त्यात काम करत होतो, त्यात २ मुली ही होत्या. चांगली २ महिने कसून प्रॅक्टिस केली. आणि आपली एकांकिका पहिल्या तीन नंबरात आणायची इतकी तयारी केली.

स्पर्धेचा दिवस आला आणि आम्ही पुन्हा एकदा रिहलसल केली. सगळे अगदी परफेक्ट काम करत होते म्हणून आमच्या अपेक्षा जास्तच उंचावल्या होत्या.

पडदा वर गेला, आमची एकांकिका सुरू झाली, सुरुवात तर अगदी दमदार झाली. लोकांच्या टाळ्या आणि विनोदी वाक्यावर जबरदस्त लाफ्टर येत होते, तसं तसं आम्हाला स्फुरण चढत होतं. दोन पैकी एका मुलीची एन्ट्री अगदी मस्त झाली ती पण टाळ्या घेत होती.

दुसऱ्या मुलीची एन्ट्री झाली, तिने समोर बसलेले प्रेक्षक बघितले. आणि तिचं वाक्य ती विसरली. काय बोलायचं ते तिला कळेना. ती घाबरून थरथर कापायला लागली आणि स्टेजवरच घाबरून खाली बसली. लोकांच्या लक्षात आलं. पण दुसऱ्या ने पुढचे डायलॉग घेऊन नाटक पुढे चालू ठेवलं. आणि पूर्ण केलं. पडदा पडला. सगळेच गंभीर झाले होते. आमचा फज्जा उडाला होता.

पण हे कसं झालं? इतके दिवस चांगलं काम करणारी मुलगी घाबरून गेली. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं थिएटर तिने बघितलं, एवढे लोक आपल्याला बघतायत ह्या भीतीने तिची गाळण उडाली होती.

म्हणजे एवढ्या लोकांसमोर ती कधी स्टेजवर गेलीच नव्हती म्हणून ती घाबरली होती. प्रॅक्टिस करताना एवढी माणसं समोर नसतात. असंच कसल्यातरी भीती ने जगणारी माणसं अशी घाबरून मागे पडतात.

आयुष्यात आपल्याला आपली प्रगती करायची असते, असंख्य प्रश्नांना तोंड द्यायचं असतं, आणि यशस्वी व्हायचं असतं.

जर आपल्यात आत्मविश्वास नसेल तर हे सगळं शक्य होईल का? जर आपण घाबरट राहिलो तर हे यश मिळवता येईल का?

जर आपल्यात हिम्मत नसेल तर पुढे जाऊ शकू का? आपल्यात बोलण्याची कला नसेल तर, न बोलता आपल्याला आपली प्रगती करून घेता येईल का?

मित्रांनो , ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसामध्ये असतातच. पण ह्याची जाणीव आपल्याला नसते. म्हणून आपल्यात काय काय क्षमता आहेत? कोणत्या कला आहेत? आपला आत्मविश्वास कुठं लपून बसलाय?

आपल्यात एखादी जबबदारी घ्यायची धमक आहे काय? ह्या आपल्यात असलेल्याच सगळ्या गोष्टी जागृत करायच्या म्हणजेच आपल्या व्यक्तित्वातला एक एक पैलू चांगला पॉलिश करून चमकवायचा. हाच आहे आपला व्यक्तिमत्वाचा विकास.

१०वी, १२वी च्या, कॉलेज च्या परीक्षा झाल्यावर प्रत्येकाला मोकळ्या वेळात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घेता येऊ शकतो.

म्हणजे आपल्यात काय काय बदल घडून येतील? ते जर कळलं तर प्रत्येकाला आपला विकास करून घ्यायला निश्चितच आवडेल.

१- आपला स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणायचा तर सगळ्यात आधी स्वतःला “प्रोटॉन” सारखं पॉझिटिव्ह (सकारात्मक) बनवा.

“प्रोटॉन” कायम पॉझिटिव्हीच राहतो. त्याच्यावर न्यूट्रॉन चा काहीही परिणाम होऊ शकत नाही. म्हणजे आपल्यामध्ये एकाही नकारात्मक (निगेटिव्ह) विचारला घुसखोरी करता येणार नाही..

२- ज्यावेळी आपण पूर्ण सकारात्मक विचार करायला लागतो त्यावेळी आपल्यातला आत्मविश्वास वाढायला लागतो. आत्मविश्वासा मुळे आपल्यामध्ये उत्साह, जोश निर्माण होतो. आपलं प्रत्येक काम आपण उत्साहाने करायला लागतो.

प्रत्येक गोष्ट दमदार होत जाते.

३- आपल्या कामात जोश असला की आपण सगळे नवीन नवीन अनुभव मिळवत जातो. त्यांचा आनंद घेत घेत पुढं चला.

अडचणी, संकटं, येतील, परिस्थिती बदलेल. पण परिस्थतीला आपल्या ताब्यात ठेवाल. आपल्या भावनांवर सुद्धा अंकुश ठेऊ शकाल.

४- साहस, धाडस, ह्या गोष्टी आत्मविश्वास वाढला की आपोआप आपल्यामध्ये यायला लागतात. भीती लांब पळून जाते. जबाबदारी, जोखीम ह्या सगळ्या गोष्टी आपण सहज पार पाडू शकतो.

५- चार लोकांशी बोलायचं कसं? असंख्य लोक समोर असताना एकट्याने त्यांच्यासमोर आत्मविश्वासाने भाषण कसं करायचं? ह्याची तयारी होते. स्टेजवर उभं राहण्याची ताकद येते. सराव केल्यामुळे सहज बोलता यायला लागतं. शब्दांचा खजिना वाढतो.

६- आपले जसे चांगले गुण लोकांना दिसतात तसे दुसऱ्यांचे चांगले गुण पहायची दृष्टी आपल्याला मिळते. आपण दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करायला शिकतो. प्रशंसा केली की दुसऱ्यांना आपल्या बद्दल आदर निर्माण होतो. हे सगळं व्यक्तिमत्व विकास होत असताना आपण शिकत जातो.

७- आपल्यामध्ये ‘धीर’ किंवा ‘संय्यम’ राखायची शक्ती येते. उतावीळ पणा, भांडखोर स्वभाव हा घातक असतो, तसा स्वभाव आपला असेल तर त्याच्यावर आपण संय्यम राखून बदल घडवून आणू शकतो. ह्याचा उपयोग आपलं नातं, लोकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी होतो.

म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास झाला की आपल्याला आपल्या आयुष्याची एक नवी दिशा मिळते, आपण सगळ्या गुणांनी परिपक्व होतो.

भीती, न्यूनगंड, कमीपणा, उतावीळ पणा भांडखोर वृत्ती निघून जाऊन, आत्मविश्वास, धाडस, साहस, पॉझिटिव्ह विचारशक्ती, संयम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वागण्या बोलण्यातून दिसायला लागतात. एक आदर्श व्यक्ती म्हणून आपली ओळख समाजात होऊ शकते.

आपल्यातल्या कला जागृत होतात. आपण वक्ता, कलाकार, नेता, समाज सेवक, शिक्षक, कारखानदार, नोकर, कामगार, यापैकी काय आहोत हे आपल्याला कळतं.

आणि आपण आपल्या मनाप्रमाणे कार्यक्षेत्र ठरवू शकतो. आपली प्रगती करू शकतो. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं ही एक आवश्यक गोष्ट मानली जाते.

मग करा व्यक्तिमत्त्वाचा विकास, आयुष्य बनवा झकास……

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “‘व्यक्तिमत्त्व विकास’ करायचा म्हणजे नक्की करायचं तरी काय?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय