COVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे

COVID- 19 या कॉरोन व्हायरसमुळे होणाऱ्या आजारात शेवटच्या स्टेजला व्हेंटीलेटरची गरज पडते आणि सध्या सगळे जग व्हेन्टिलेरच्या तुटवड्या मुळे हैराण झालेले आहे या एका बातमीने सर्वांची झोप उडवून दिलेली आहे. पण व्हेन्टिलेटरची गरज का आणि केव्हा पडते? याशिवाय या लॉकडाऊन मध्ये घरात बसून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे ते वाचा या लेखात.

लेखाची सुरुवात मला अशी करायला आवडेल कि, हे काही नियम पाळले तर आपल्या देशात कोणाचाच कोरोना विषाणूने मृत्यू होणार नाही!!

आता आम्ही काहीतरी अफवा वजा गोष्टी सांगायला सुरु करू असे अजिबात समजू नका.

आपण घरातच राहून फक्त काही काळजी घ्यायची आहे. तो विषाणू आणायला बाहेर जायचं नाही.

पण तरीही कितीही आयसोलेट राहिले तरी भीती आहेच… हे हि नाकारता येत नाही.

कारण काही गरजेची वस्तू, किराणा आणण्यासाठी आपण बाहेर जातच असतो, बाहेरून दुकानातून काही सामान आपल्या घरात प्रवेश करत असतं.

कोरोनच्या या सगळ्या भीतीचं सावट गडद करणाऱ्या बातम्यांच्या मध्ये आज आताच एक पॉझिटीव्ह बातमी मिळाली कि चीनमधील काही शहरांचा लॉक डाऊन उठवण्याची तयारी आता होऊ लागली आहे.

चीनमध्ये कॉरोन व्हायरसने इतक्या प्रचंड प्रमाणात थैमान घालून कित्येकांना यमसदनी धाडलं. या मृत लोकांवर इलाज करता करता आणि बरेच पोस्टमार्टम करून चीन मध्ये डॉक्टर या आजाराला समजण्यात आता यशस्वी होऊ लागले.

हळूहळू काही शहरांचे लॉकडाऊन काढून आता तिथे सगळे नॉर्मल होऊ लागले आहे. कारण एखाद्याला इन्फेक्शन झाले तरी ते कंट्रोल करणे आता त्यांना जमायला लागलं आहे..

हे असे सांगण्याचा उद्देश एकच कि आपल्या भारतात आजाराचा विळखा वाढण्याआधीच झालेल्या लॉकडाऊनला आपण सर्वांनी सहकार्य केले तर आपल्याकडची परिस्थिती सुद्धा अशीच किंवा यापेक्षा लवकर नियंत्रणात येऊ शकते.

तर आता बघुयात या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत…

१) COVID-19 च्या उपचारात व्हेन्टिलेटरची गरज का पडते- या कोरोनाच्या इन्फेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात श्लेष्मा सारखा पदार्थ, ज्याला आपण कफ म्हणतो तो घशात तयार होतो आणि त्यामुळे श्वसन मार्ग ब्लॉक होऊन यात सर्वात जास्त चर्चेचा विषय झालेलं व्हेंटिलेटर हे या उपचारात खूप गरजेचं होऊन जातं.

यात शेवटच्या स्टेजला व्हेन्टिलेटरची गरज पडते!! लोकांमध्ये भयंकर भीती पसरली ती यामुळे….

आणि म्हणून सर्वात महत्त्वाची बाब अशी कि घशात हा कफ तयार होणार नाही याची काळजी घेणं…

यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी गरम पेय पिणं. चहा, कॉफी, गरम दूध, सूप आणि महत्त्वाचं म्हणजे गरम पाणी यामुळे कोरोनाच नाही कुठलेही इन्फेक्शन थांबवणं शक्य होऊ शकेल. हे संक्रमण फुफुसात जाण्याआधी तीन दिवस घशात असतं असा निष्कर्ष चीनमधल्या काही डॉक्टरांनी अभ्यासाअंती काढला आहे.

या गरम पदार्थांमुळे शरीरातला कफ पोटात जाऊन पोटातल्या जठररसांमुळे (gastric juices मुळे) व्हायरस न्यूट्रलाइझ व्हायला मदत होऊ शकते.

२) गार्गल करत राहून विषाणूंना नो एन्ट्री झोन तयार करा – दुसरी काळजी आपल्याला घ्यायची ती म्हणजे गार्गल म्हणजे गुळण्या करत राहणं…

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या तर आपण सहज करू शकतो. याशिवाय पोटॅशिअम परमॅंगनेट, बीटा डीन गार्गल यासारखे अँटिसेप्टिक गार्गल करत राहिलं तर घशात व्हायरस चा प्रादुर्भाव असेल तर तो न्यूट्रलाइझ व्हायला मदत होऊ शकेल.

३) रोग प्रतिकारक शक्तीसाठी पांढऱ्या पेशींचं सैन्य शरीरात सुसज्ज ठेवा – आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ‘सी’ चं सेवन नेहमी करणं हे हि आपल्याच हातात आहे. फळे, पालेभाज्या यांचे नियमित सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढून शरीरातल्या पांढऱ्या पेशी येणाऱ्या व्हायरसचा मुकाबला करायला सज्ज होतील.

४) बाहेर जावं लागलं तर हि काळजी घ्या – आता पुढे राहतो प्रश्न कि काही महत्त्वाचे काम करण्यासाठी आपण बाहेर जातो तेव्हा कुठली काळजी घेतली पाहिजे?

आपण बाहेरून जाऊन आल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन अंगावरचे कपडे डिटर्जंट मध्ये टाकून कपडे धुऊन डोक्यापासून पायापर्यंत स्वच्छ अंघोळ करावी.

५) मेटॅलिक सर्फेस अल्कोहोल युक्त द्रावणाने स्वच्छ ठेवा – मेटॅलिक सर्फेसवर हा विषाणू १२ तास राहू शकत असल्याने दारांच्या कड्या, बाल्कनीचे रेलिंग यांची अल्कहोल बेस लिक्विडने नियमित स्वच्छता करणे हेही तितकेच महत्त्वाचे.

६) हा विषाणू ‘ह्युमन टू ह्युमन’ पसरणारा आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांचा तिरस्कार करू नका – हा विषाणू माणसाकडून माणसाकडे जाणारा असल्याने जे लोक प्राणी पाळतात त्यांनी यासाठी काहीही घाबरण्याचे कारण नाही. किंवा हल्ली काही सोसायट्यांमध्ये कुत्री, मांजरं पाळणाऱ्या लोकांना शेजाऱ्यांकडून बहिष्कृत केले जाण्याचे प्रकार सुद्धा होऊ लागले आहेत.

त्यामुळे या गोष्टींनी घाबरून न जात स्वच्छतेची कास धरणं हे सर्वात महत्त्वाचं…

७) साध्या सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांना दुर्लक्षित करू नका – आपल्याला वातावरणातील बदलामुळेही बरेचदा सर्दी, खोकला, ताप होऊ शकतो तर अशा वेळी घरगुति उपाय न करता लगेच डॉक्टरकडून इलाज करून घेणं या वेळी गरजेचं आहे. कारण अशा साध्या सर्दी, खोकल्यात आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशा वेळी व्हायरसला हल्ला करणं सोपं होऊन जातं.

या व्हायरस मुळे मृत्यू तेव्हाच होऊ शकतो जेव्हा श्वसनाला त्रास होऊ लागतो. त्यामुळे गरम लिक्विड पिणे, गुळण्या करणे आणि त्याशिवाय लेखात सांगितलेली इतर काळजी घेणे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत या २१ दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये.

या शिवाय उगाचच बाहेर जाऊन पोलीस यंत्रणांना आपल्याला थांबवण्यात थकवणं हे जर आपण चालू ठेवलं तर याने आपण आपल्याच पायावर धोंडा पडून घेतोय हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी तसेच स्वविकास करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय