एक होता इरफान..

लेखन: सोनिया हसबनीस-सावंत

डोळ्याने उत्तम अभिनय करणाऱ्या इरफान खानने आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.. क्वचितच कोणी भारतात असे असेल ज्याला तो माहीत नाही..

जात धर्मापालिकडे कलाकाराचे एक भावुक नाते त्याच्या चाहत्यांशी असते.. आणि ते त्याने आज सिद्ध केले..

मात्र अशा हाव्यहव्याश्या वाटणाऱ्या व्यक्तीला वर्सोवाच्या काब्रिस्तनावर शेवटचा सलामही देता येऊ नये ही खंत प्रत्येक चाहत्यांच्या मनात राहील..

कोरोनाच्या क्रिसिस मध्ये काय होऊ नये असे वाटत असेल तर ती गोष्ट म्हणजे समाजातील चांगल्या लोकांचा मृत्यू..!!!

क्षेत्र कोणतेही असो त्यात उत्तम कामगिरी करणारे, जनमानसात आपले वेगळेपण उमटवणारे, अतिशय हृद्य माणसे जेव्हा जगाला कायमचा निरोप देतात तेव्हा आपसूकच डोळ्याच्या कडा पाणवतात.. आपले त्या व्यक्तीशी नाते असो व नसो..!!

आजच सकाळी मिळालेल्या बातमीने अगदी असाच अनुभव सगळे सिनेमाप्रेमी घेत आहेत..

काल कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी काय येते आणि आज तो माणूस आपल्यातून निघूनही जातो..

सकाळ पासून मनाची घालमेल होतेय.. इरफान खान आता आपल्यात नाही हे सत्य पचवायला फार अवघड जातेय..

दोन वर्षांपासून दुर्मिळ अशा न्यूरो कॅन्सरशी लढणारा लढाऊ, हरहुन्नरी कलाकार आणि एक चांगले व्यक्तिमत्व असणारा इरफान..!!

अवघ्या पन्नाशीत आपला निरोप घेऊन गेला.. पण तरीही त्याच्या पडद्यावरील कामामुळे तो आपल्यात कायमच राहील ह्यात शंका नाही..

राजस्थानात जयपूरमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या इरफानने एन. इस. डी. मधून अभिनयाचे शिक्षण घेतले.. १९८८ पासून आपले अभिनयाच्या क्षेत्रातील करिअर चालुही केले..

एकेक दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने सिरीयल मधून सुरुवात करून बॉलिवूडच्या सिनेमात आपला जम बसवला.. खलनायक आणि चरित्र भूमिकांमध्ये त्याने जीव ओतला..

सुंदर चेहरा बळकट शरीरयष्टी असणारा व्यक्तीच हिरो बानू शकतो हे बॉलिवूडचे गणित देखील इरफान ने खोडून टाकले..

सर्वसामान्य चेहरा, अतिशय युनिक असा आवाज, सामान्य शरीरयष्टी असून सुद्धा, फक्त आपल्या बोलक्या डोळ्यांनी सगळ्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले..

अनेक अवार्ड आणि पद्मश्री सन्मान मिळवलेल्या इरफानच्या अभिनयाचा एक वेगळा चाहता वर्ग होता..

पण वेगवेगळ्या भूमिकांच्या अदाकारीने तो सगळ्यांचाच लाडका बनला.. इतका की इंटरनॅशनल इंटरटेन्मेंनट जगात सुद्धा त्याच्या कामाचे चाहते निर्माण झाले..

मोठ्या मोठ्या सिनेमातून त्याने हॉलिवूड मध्येही नाव कमावले.. भारतात कोण ऑस्कर अनु शकेल तर ते इरफान आणेल इतका विश्वास चाहत्यांनी त्याच्यावर टाकला.. मात्र ते सत्यात उतरायच्या आधीच त्याने एक्सिट घेतलीये..

कॅन्सर मधून जरा कुठे बरा झाला.. आणि चाहत्यांच्या मनात नवा उत्साह आला..

सगळ्यांना वाटले, ‘अभि पिक्चर बाकी है..’ अजूनही त्याला मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी मिळेल.. त्याचा सिनेमा आलाही..

इंग्लिश मिडीयम हा सिनेमा त्याच्या कारकीर्दीतल्या उत्तम सिनेमाच्या यादीत आपले स्थान निर्माण करून गेला.. पण हाच सिनेमा शेवटचा ही ठरला.. आणि सगळ्यांना चटका लावून ५३ व्या वर्षी हा पठ्ठा निघूनही गेला..

त्याच्या जाण्याने करमणूक विश्वाची खूप हानी झाली आहे.. अजूनही कित्येकांनी त्याला समोर ठेवून किती स्क्रिप्टस लिहिल्या असतील, अजूनही सिनेमा बनवण्याचे निश्चित केले असेल..

पण आता ते होणे नाही.. फक्त अभिनेतच नाही तर एक प्रेमळ मनाचा चांगला माणूसही भारताने गमावला आहे..

एक कलाकार असूनही कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सि, धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य, सहकलाकार स्त्रियांबरोबर नाव जोडणे जाणे आशा कोणत्याच फंदात तो कधी पडला नाही.. त्याची इतकी सदसद्विवेकबुद्धी जागृत होती..

सरळ बोलणे, मनांतलेच ओठावर ठेवणे ह्या साठीच तो ओळखला जातो.. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या कामात त्याने कधीच लक्ष्य घातले नाही..

आयुष्याचे एकच ध्येय ठेवले की चाहत्यांची करमणूक करायची.. तीही निखळ..!! त्यामुळे सगळ्या चाहत्यांनी आपापल्या मनातला ऑस्करही त्याला केव्हाच देऊन टाकला आहे..

आपण म्हणतो.. उत्तम माणसाचे आयुष्य कमीच असते.. आता ह्या उक्तीवर, त्याच्या अकाली जाण्याने पुन्हा एकदा विश्वास बसला..

पण इतक्या मनस्वी, स्वच्छंदी माणसाचे जाणे हे दुःखदायक असले तरी आपण त्याचे आनंददायी आयुष्य सेलिब्रेट करूया.. हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल..!!

खरेच.. असा नट पुन्हा होणे नाही..!! मात्र तू तुझ्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात कायम राहशील..

रेस्ट इन पीस डिअर इरफान..!! यु विल बी डिअरली मिस्ड.. 😔

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “एक होता इरफान..”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय