दिल्ली मेट्रो मध्ये वासनांध नराधमाला प्रतिकार करणाऱ्या मेघाची कहाणी

स्त्रियांनी आता रणरागिणी म्हणून जगाला तोंड देण्याची वेळ का आली आहे..? वाचा दिल्लीच्या एका रणरागिणीची शौर्य कथा

स्पर्शातून प्रेम व्यक्त होते..

आईचे मुलांवर, मुलांचे आईवर, नवराबायकोचे एकमेकांवर, मैत्रीतले निखळ प्रेम हे जसे वागण्याबोलण्यातून व्यक्त होते तसेच एकमेकांना केलेल्या स्पर्शातूनही व्यक्त होते..

आपल्या आवडत्या व्यक्तीचा स्पर्श हा हवाहवासा वाटतो..

पण ह्या स्पर्शाच्या प्रेमसुलभ भावनेला बट्टा लावला गेला आहे तो वासनांध नराधमांकडून..!!

प्रत्येक स्त्रीला एक सिक्स्थ सेन्स असतो असे म्हणतात.. तिला कोणत्याही प्रकारच्या स्पर्शातून समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते लक्षात येते..

मात्र कित्येक किळसवाण्या स्पर्शातूनही तिला आयुष्यभर जावे लागते..

मग ते नजरेचे असोत की हातांचे..

काही पुरुष तर महिलांना स्वतःची जागिर समजत आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपल्या शरीराचे अवयव महिलेवर वापरून आपली वासनेची भूक भागवतात..

स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे, तिला आपल्या मनात वाईट भावनेत रंगवणे, तिला विकृत स्पर्श करणे, किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी करणे ही सुद्धा बलाXत्काXरी वृत्तीच आहे..

मोXलेस्टेXशन हा प्रकार बलाXत्काXराची पहिली पायरी आहे.. प्रवासात, ऑफिसात, घरातही स्त्रीवर नजरेने बलाXत्काXर करणारे जो पर्यंत आहेत तो पर्यंत हे जग स्त्रियांसाठी सुरक्षित नाही..

आणि असल्या वासनांध प्रवृत्तींना स्त्री आणि तिच्या रुपांशी काहीही घेणेदेणे नसते..

ती देवी, आई, बहीण, लेक स्वरूप असली तरी बलाXत्काXरी वृत्तीचे नराधम तिला फक्त एक मादी किंवा एक शिकार म्हणूनच बघतात..

ह्याला १००% स्त्रिया सहमत असतील..

आपल्या भारतीतात अजून एक अडचण अशी आहे की.. स्त्रियांवर कसल्याही प्रकारचे अत्याचार होत असताना बघ्यांची संख्या कमी नसते..

आता तर मोबाईल वर शूट करणाऱ्यांची भर पडतिये.. पण मदत करायला, सपोर्ट करायला स्वतःच्या घरातले सुद्धा येत नाहीत ही सद्य परिस्थिती आहे..

इतर आगाऊ स्त्रिया सुद्धा पीडित स्त्रीलाच दोषी धरतात.. मग असल्या वासनांधांचे फावते..

मात्र आज आम्ही अशी एक हकीकत तुमच्या पुढे घेऊन आलोय जी वाचून तुम्ही स्वतःला कमजोर समजणार नाही..

स्त्री स्वतःच स्वतःला कशी न्याय मिळवून देऊ शकते ह्याचेच हे उदाहरण आहे..

दिल्ली शहर जे भारताची राजधानी आहे.. सुशिक्षितांचे, धनिकांचे शहर आहे ते अलीकडे बलात्कार आणि स्त्री अXत्याXचारांचे माहेरघर असल्याचंही बरेचदा म्हंटल गेलं आहे.

पण खरं तर हि एक प्रवृत्ती आहे जिला कुठल्या सीमा नाहीत.

बलाXत्काXराशी, मोXलेस्टेXशनशी सुशिक्षित किंवा अशिक्षित असणे, गरीब किंवा श्रीमंत असणे ह्याच्याशी काहीही संबंध नाही..

काही पुरुषांची पुरुषी, इगोइस्टिक मानसिकताच ह्याला जबाबदार असते..

दिल्लीत राहणारी मेघा अश्याच मानसिकतेचा बळी ठरली असती..

मात्र तिने स्वतःला लाचार किंवा बिचारी असे लेबल लागू दिले नाही..

तिने जे केले ते केवळ एक बहादूर स्त्रीच करू शकते..

आणि सगळ्याच स्त्रियांनी आता बहादूर बनण्याची वेळ आली आहे..

मेघा तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाला लपवत नाही.. ती सांगते,

ती दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी स्टेशन वर गेली होती..

तुफान गर्दीतून कशीबशी जनरल डब्यात चढली.. त्या डब्यात इतकी गर्दी होती की लोक एकमेकांना चिकटले होते..

हे तसे रेग्युलर झाले आहे..

हल्ली स्त्रियांना कामावर जाताना उशीर होऊ नये म्हणून समोर दिसेल त्या डब्यात मग तो लेडीज स्पेशल असो वा जनरल त्यात चढावेच लागते..

पण आत गेल्यावर मात्र अंग चोरून उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो..

करण इतक्या गर्दीत कोण कधी कुठे हात लावेल सांगता येत नाही..

त्यामुळे कित्येक स्त्रिया स्वतःला असल्या घृणास्पद स्पर्शातून वाचवायला बॅग, सॅक, छत्री जिंवा अगदी सेफ्टी पिनांचा सुद्धा आधार घेताना दिसतात..

पण मेघाचा तो दिवस दुर्दैवी स्पर्शाचा होता..

ती जिथे उभी होती तिथे खूप पुरुष होते. तेही आपापल्या मोबाईल मध्ये, गप्पांमध्ये व्यस्त..

ती सुद्धा नेहमीप्रमाणे अंग चोरून उभी होती..

गर्दी खूपच असल्याने तिला उभे राहायला जागाच नव्हती..

तिने विचार केला पुढच्या स्टेशनवर उतरलेले बरे.. नंतर पुढच्या ट्रेनने जाऊ..

तेवढ्यात तिला तिच्या मागील अंगावर कसला तरी विचित्र स्पर्श जाणवला..

तिने लगेच मागे पाहिले.. मात्र मागचा लांब कुर्ता घातलेला, सभ्य दिसणारा माणूस वरच्या हँडलला दोन्ही हाताने धरून शांत उभा होता..

हात वर असले तरी तिला सतत किळसवाणा स्पर्श जाणवत होता.. तिला कळेना नक्की काय होतंय..

तिला खूपच त्रास होऊ लागला म्हंटल्यावर तिने रागाने त्या व्यक्तीचा कुर्ता वर उचलला आणि तिला घाण स्पर्शाचे कारण दिसले..

पॅन्टची चेन उघडी ठेऊन त्याचा ‘तो’ अवयव तिच्या पार्श्व भागावर घासण्यात तो विकृत आनंद मिळवत होता..

आणि तिच्याकडे बघून कुत्सित हसत होता..

मेघाची तळपायाची आग मस्तकात गेली.. ती जोरात किंचाळली..

एवढे सगळे होत असताना आजूबाजूचे प्रेक्षक तिच्याचकडे विचित्र नजरेने असे बघत होते, जणू तिचीच चूक आहे..

मेघा ओरडत राहिली..

पण कोणीही तिची मदत केली नाही..

स्टेशन आल्यावर तो विकृत खाली उतरला मात्र मेघाने हार मानली नाही..

ती त्याचा पाठलाग करत राहिली.. त्याच्या दिशेने जात ओरडत राहिली…

प्लॅटफॉर्म वरच्या एका पोलिसाने त्याला पकडून धरले..

तिने तिथे जाऊन त्या विकृतीला जाब विचारला, पोलिसांना कुर्ता उचलून तिने सहन केलेला स्पर्शाची, समोर दिसणारी ‘हकीकत’ सांगितली आणि त्याला सरळ सरळ पोलिसांच्या हवाली केले..

इतक्यावरच ती थांबली नाही..

त्याच्यावर सेXक्शुXअल हXरॅसXमेंट ची केस केली आणि कोर्टात त्याच्या विरोधात उभी राहून स्टेटमेंट देऊन आली..

तिने स्वतःला असल्या नराधमाच्या पुढे सरेंडेर केले नाही..

महिला आहे म्हणून अबला असणे स्वीकारले नाही.. स्वतःसाठी लढली आणि न्यायही मिळवला..

ही गोष्ट खरी घडलेली आहे.. आणि अशा गोष्टी महिलांबरोबर सर्रास होत असतात…

काही वीरबाला लढतात पण अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्या अशा घटनांना भीतीने दुर्लक्षित करतात..

सहन करतात मात्र स्वतःवर होणाऱ्या अXत्याXचाराला वाचा फोडत नाहीत..

संविधानात स्त्रियांवर होणाऱ्या अXत्याXचारांवर शिक्षा आहेत मात्र आपल्याला बोलावे लागेल..

आरोपीला लोकांसमोर उघडे करावे लागेल..

कोणी तुमच्यावर वाईट नजर ठेवून असेल किंवा तुम्हाला तुमच्या मर्जीशिवाय स्पर्श करत असेल तर मोXलेस्टेXशन ठरते..

हे समजून घेऊन त्याच्या विरोधात आवाज उठवावा लागेल..

स्त्रियांच्या ह्या लढाईत घरातील आणि समाजातील पुरुषांनी सुद्धा ऍक्टिव्ह पार्टीसिपेशन दाखवणे महत्वाचे आहे.

आपल्या नात्यातल्या स्त्रिया किंवा मैत्रिणी किंवा कोणीही अनोळखी स्त्रिया संकटात असतील तर तुम्ही त्यांना खंबीर आधार द्या..

आपल्या मुलांना स्त्रियांचा मान राखण्यास शिकवा..

समाजातली विकृती ठेचायला पुरुषांनी सुद्धा पुढे यायची वेळ आली आहे..

स्त्रिया स्वतःसाठी उभ्या राहतील न राहतील पण पुरुषांच्या सपोर्ट मुळे चित्र नक्कीच बदलेल..

वाईट स्पर्शाचे, आरोपांचे हाकनाक बळी पुरुष देखील ठरतात.

कधी कधी स्त्रिया आपल्या बाजूने असलेल्या कायद्याचा गैरवापर करतात अशा वेळी तुम्हाला ओळखणाऱ्या स्त्रिया देखील तुमच्या बाजूने लढा देतीलच..

मात्र अशी परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीतल्या अत्याचारांपेक्षा खूपच कमीच येते..

त्यामुळे कधी तुमच्या आसपास कोणी कुकर्मी व्यक्ती दिसला तर सामाजिक जबाबदारी म्हणून स्त्रियांची मदत करायला पुढाकार घ्या..

सख्यांनो, आपण विकृती विरुद्ध लढलो किंवा गप्प बसलो तर दोन्ही बाजूने बोलणारे लोक असतात..

त्यामुळे गप्प बसण्यापेक्षा तोंड उघडून विकृत व्यक्तीला त्याच्या पापांची सजा देणे आपले स्वतःसाठीचे आणि इतर महिलांसाठीही असलेले कर्तव्य आहे..

मैत्रिणींनो.. तुम्हाला असली नीच माणसे कुठेही भेटली तर त्यांची हयगय करू नका.. सहन करू नका..

त्यांना दुर्लक्षित केले तर आपण त्यांच्या नीच विकृत मनोवृत्तीचा अजून खतपाणी घालत असतो..

असल्या ह्या विषारी नागांना तिथल्या तिथे ठेचणे फार गरजेचे आहे..

उद्या तुमची लहान बहीण किंवा मुलगी ह्याच अनुभवातून जाताना बघणे खूप वेदनादायक असेल..

त्यापेक्षा आजच स्वतः आवाज उठवला पाहिजे..!!

स्वतःसाठी उभे राहा.. आजच..!!

Image Credit: Better India

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय