“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!

होत नाहीत कधी कधी स्वप्नं पुर्ण!… ठीक आहे की. सहज चुटकीत, मेहनत न करता आणि वाट न बघता,पटकन पुर्ण झालं तर, स्वप्नंच कसलं ते? झगडुन, संघर्ष करुन मिळालेली वस्तुच अनमोल असते. सांगा ओरडुन त्या स्वप्नाला, “सस्ती चीजोंका शौक तो साहब, हम भी नही रखते.”

मराठ्यांच्या इतिहासात खुप शुरवीर योद्धे होवुन गेले पण पहील्या बाजीरावाच आकर्षण काही वेगळचं आहे. मुघल असो वा निजाम, त्यांच्या मनात नेहमीच बाजीराव पेशव्यांबद्दल दहशत होती.

त्याचं कारण बाजीराव त्यांच्या घरात घुसुन युद्ध करायचा. शत्रु पुण्याच्या दिशेने निघाला की बाजीराव त्याचीच राजधानी उद्ध्वस्त करायचा.

पहील्या बाजीरावाने उण्यापुर्‍या एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यात एकुण तेहतीस लढाया लढल्या पण तो एकही लढाई कधीच हरला नाही. जगात एकाही यौद्ध्याला हे जमलं नाही, हेच होतं बाजीरावाचं वेगळेपण.

आक्रमकपणाने शत्रुला जाऊन भिडणे, हेच बाजीरावाच्या यशाचं गुपित होतं. युद्धातील मुत्सद्दी लोक जिंकण्यासाठीचं एक तत्व आवर्जुन सांगतात.

“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”. कोणतेही उदाहरण घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखान असो वा अफझल खान, अटॅकच केला.

अजेय फ्रेंच सेनापती नेपोलिअन रंगीत नकाशावर सुया खुपसुन रात्र रात्र जागुन आक्रमण करायची प्लानिंग करायचा, तर जग जिंकायला निघालेला अलेक्झांडरला आक्रमणाच्या खुमखुमीने भारतापर्यंत मजल मारता आली.

अगदी आजकाल यशस्वी म्हणवले जाणारे अमेरिका चीन काय करत आहेत, प्रत्येक चाल अटॅकिंग खेळतात मग ते व्यापारात असो वा युद्धनितीत.

सारेच विजयी योद्धे आक्रमकपणेच खेळातात. फुटबॉल, हॉकी किंवा कुस्ती कोणताही खेळ असो, उत्कृष्ट कोच आपल्या शिष्यांच्या मनावर हे ठसवण्यात यशस्वी होतो.

क्रिकेट मध्ये पहील्या बॉलपासुन आक्रामक खेळुन, विरुद्ध टीमचं मनोबल तोडायचं तंत्र जुनंच आहे.

ओलिंपिकमध्ये सुरवातीला पिछाडीवर असलेली साक्षी मलिक कशी विनर बनली किंवा सर्वस्व पणाला लावुन त्वेषाने लढणारी सिंधु, जगज्जेती बनली ती केवळ आक्रमक खेळुनच ना!…..

कुठल्याही क्षेत्रात टॉपला असलेली कंपनीच्या यशाचं गुपित काय? एग्रेसीव्ह मार्केटिंग. जाहीरातींचा मारा, सेल्स टीमला तुफान पगार देऊन टारगेट दिली जातात, आणि काहीही करुन माल खपवतात.

भारत हा फक्त गारुड्यांचा आणि हत्तींचा देश आहे असं समजणार्‍या पाश्चात्य देशातल्या लोकांना खर्‍या भारतीय संस्कृतीची ओळख करुन दिली ती विवेकानंदांनी, त्यांच्या घरात म्हणजे शिकागोच्या धर्मपरिषदेत जावुन.

गीता, वेद, उपनिषद म्हणजे काय हे जगाला शिकागोत आणि अमेरीकेत जावुन ठासुन सांगावं लागलं आणि तेव्हा कुठे भारतातही तत्वज्ञान आहे ह्याची जगाने दखल घेतली.

तर थोडक्यात काय, एक महत्वाचं तत्व आहे, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स!..…

जे नियम युद्धात, जे नियम खेळात, तेच नियम जीवनातही लागु होतात.

रोजच्या जगण्यात प्रत्येकाला कोणता ना कोणता प्रॉब्लेम सतावतच असतो. कधी पैशाचा, कधी आरोग्याचा, कधी प्रतिष्ठेचा तर कधी जे हवे ते मिळत नाही याचा.

खरंतर प्रत्येक प्रॉब्लेम हे फक्त भीतिचंच रुप असतं. त्याला न घाबरता त्याच्यावरचं आक्रमकपणे धावुन त्याचा चुराडा करायचा असतो.

मनासारखे पैसे मिळत नाहीत, परिस्थितीवरचं तुटुन पडा. नवे रस्ते शोधा. नव्या वाटा धुंडाळा, कामाच्या पद्धतीत बदल घडवा, स्वतःच्या मेदुंत नव्या गुंतवणुक करा, नव्या स्किल शिका, कष्टाचे तास वाढवा. नक्की इन्कम वाढायलाच पाहीजे.

एखादा आजार छळतोय? द्या की त्या आजारालाच आव्हान, ओरडुन सांगा, निरोगी आहे मी!.. ठणकवा त्याला, चालता हो माझ्या चौकटीतुन, माझ्या शरीरातुन, माझ्या घरातुन, आमच्या आयुष्यातुन. चल निघ, हो बाहेर…

आयुष्य नीरस आणि अळणी वाटतेय, कोणीतरी आपलं म्हणावं, जीव तोडून प्रेम करावं अशी मनातुन तीव्र ओढ वाटतेय, मग त्याच तीव्रतेने आजुबाजुच्या माणसांमध्ये आनंद वाटा की.

कोणी रोखलयं तुम्हाला? फुलवा की अनोळखी चेहर्‍यांवर हास्य, प्रेमासाठी भुकेल्या लोकांना प्रेम द्या, गरजु लोकांना जमेल तशी जमेल तिथुन मदत करा, तुमचं हक्काचं, अफाट प्रेम करणारं माणुस आपोआप तुमच्याजवळ येईल,…

एखादी चिंता बेजार करतेय, एखादं दुःख त्रास देतयं, पुन्हा पुन्हा आठवुन हैराण करतयं, घ्या एक आनंदाचा टिचभर थेंब, टाका त्या दुःखावरचं आनंदाचं, उत्साहाचं विरजण!…

उगाच कारण नसताना आनंदी होवुन बघा, मनसोक्त हसा, गा, आणि उड्या मारुन नाचा, इतरांना खळळुन हसवुन चिंतेलाच उल्लु बनवा की. बघा, कशी गुडघे टेकुन शरणागती पत्कारतात ही दुःखे आणि चिंता. करुन बघा की हा पावरफुल अटॅक….

होत नाहीत कधी कधी स्वप्नं पुर्ण!… ठीक आहे की. सहज चुटकीत, मेहनत न करता आणि वाट न बघता,पटकन पुर्ण झालं तर, स्वप्नंच कसलं ते?

झगडुन, संघर्ष करुन मिळालेली वस्तुच अनमोल असते. सांगा ओरडुन त्या स्वप्नाला, “सस्ती चीजोंका शौक तो साहब, हम भी नही रखते.”

तुला प्राप्त केल्या शिवाय मी शांत बसणार नाही, आता प्रयत्नांचा वेग दसपटीने वाढवा, आणि विश्वास जिवंत ठेवा, नक्की त्या दिशेने वाटचाल होईल, आणि अवचित एके दिवशी स्वप्नही पुर्ण होईलच की!….

जेव्हा केव्हा माझ्याही आयुष्यात कठिण प्रसंग येतात तेव्हा मीही हेच करतो….

आधीही कित्येकदा अनुभवलेय आणि रोज पुन्हा पुन्हा स्वतःला सांगतो, समजावतो….

आक्रमकतेमुळे हारत आलेली बाजी नक्की जिंकता येते, फक्त सर्व शक्तिनिशी तुटुन पडता यावं लागतं.

वाचण्यासारखे आणखी काही..

आता नवी डिजिटल भांडवलशाही
सिझरिंग
सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on ““अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय