वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे यासाठीचे तीन नियम !!

तुमचं एंजल माईंड आणि डेव्हील माईंड यातल्या डेव्हील माईंडला प्रभावी होऊ न देण्याच्या काही सोप्या टिप्स वाचा या लेखात.

माणसाच्या मनाचेTalks किती सुंदर असतात. कोणालाही विचारा, तो कायम सकारात्मक स्वप्नरंजन करतो.

प्रत्येकाला आयुष्याकडून खूप काहीतरी उत्कृष्ट हवे असते. नवनवीन संधी, चांगली नाती, सुदृढ शरीरसौष्ठव, तल्लख बुद्धिमत्ता, उत्तम कार्यक्षमता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बक्कळ पैसा..!!

पण जे काही आयुष्याकडून हवे असते ते सगळ्यांनाच मिळते का? शक्यतो नाही हेच उत्तर आपल्याला मिळेल.

कार्य पूर्ण करण्यात आपले प्रयत्न कमी पडत असतील असे आपण मानू. प्रयत्न खूप करत असू आणि तरीही नाही मिळाले तर नशिबाच्या नावाने चांगभलं समजून पुढे चालत राहू… नाही का?

पण प्रयत्न आणि नशीबाची जोड असणारेही कधी कधी हतबल असतात.. सगळे मिळवणे शक्य असूनही ते कुठे तरी मागेच पडतात..

आणि ह्याला एकमेव कारण म्हणजे त्यांच्या मनातील नैराश्य.

हा मानसिक निराशावाद आपल्यामध्ये पोटेंशिअल असून सुद्धा आपल्याला मागे मागे ओढतो.

कधी कधी तर आपल्या हे लक्षातही येत नाही.. अलगद आलेली संधी गमावली की मात्र आपल्यावर रडत बसायची वेळ येते.

आपल्याला आपल्याच मनाचे खेळ त्रास देतात. समोर कोणतीही परिस्थिती असली की मनाचे २ आवाज आपल्या मदतीला येतात..

एक आवाज (म्हणजेच एंजल) आपल्याला सकारात्मक सल्ले देतो तर दुसरा (डेव्हिल) नकारात्मकतेकडे घेऊन जातो…

अशी द्विधा मनस्थिती झाली तर निराशावादी माणसांचे ‘डेव्हिल माईंड’ च जास्ती प्रभावी ठरते आणि ते अपयशी होतात..

हे डेव्हिल माईंड आपल्याला विश्वास देते की आपण काही करू शकत नाही, हे आपल्याला शक्य नाही, आपण तितकेसे हुशार नाही, थोडक्यात काय तर आपली काहीही करण्याची लायकी नाही..

आणि ह्यावर आपले मन डोळे मिटून भरोसा ठेवते. हेच शत्रू झालेले मन आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींपासून लांब घेऊन जाते.

आपल्यामध्ये नकारात्मक भावभावनांना स्थान मिळवून देते. डिप्रेशन, तणाव, anxiety ह्या सगळ्याला आपले नैराश्यवादी मन खत पाणी घालते.

पण जर आपल्याला ह्या सैतानाच्या विळख्यातून बाहेर पडायचे असेल तर आपल्या ह्या डेव्हिल माईंडचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे.

तरच तुम्हाला तुमच्यातले गुण कळतील, तुमचे पोटेंशिअल काय आहे त्याची जाणीव होईल. त्यामुळे ह्या सैतानाचा आवाज न ऐकता आपल्या आतील सकारात्मक आवाज ऐकायला शिकले पाहिजे.

ह्यासाठी आधी, जो नकळत का असेना पण नकारात्मक विचार आपण जोपासतो तो कसा ते जाणून घेऊया..

१. कोणत्याही गोष्टीतून घटनेतून प्रथम बरोबर वाईट शोधतो:

ही सवय सगळ्यांनाच असते. मुलेही मोठ्यांकडे पाहून ही सवय शिकून घेतात आणि लहानपपणापासूनच आपल्यामध्ये अशी नकारात्मकता वाढीस लागते.

म्हणजे बघा ना, काही पालकांना सगळ्या मुलांच्यात सगळे उत्तम गुण दिसतात मात्र आपल्याच मुलात काही ना काही कमजोरी दिसते.

चुकून कधी हिंदी मध्ये सगळ्यात कमी गुण का आहेत म्हणून त्यास बोल लावतात. मात्र एरवी कायम इतर सगळ्या विषयात अगदी ‘ए’ ग्रेड असली तरी ती दिसत नाही..

स्वतःमधला डेव्हिल तर मान वर काढतोच पण त्या लहान मुलाच्या डोक्यातही न्यूनगंड उत्पन्न होतोय हे लक्षातच घेत नाहीत.

२. सगळ्यांचे खापर स्वतःवरच फोडून घेणे:

कोणत्याही कामात कोणतेही विघ्न आले तर त्याला जबाबदार आपणच, असा विचार करणारे पाहिले मनातल्या राक्षसाच्या तावडीत सापडतात..

गल्लीतली क्रिकेट मॅच कॅन्सल झाली, म्हणजे मी त्या टीम मध्ये असल्याने कोणाला माझ्यासोबत खेळायची इच्छा नसल्यानेच कॅन्सल झाली.

किंवा

सोसायटीच्या कमिटीने यंदा वर्गणी गोळा करण्याची टीम वेगळी बनवली म्हणजे आता माझ्यावर कोणाचा विश्वासच नाही राहिला. अशा पद्धतीचे मनाचे मांडे खाणारी माणसे सतत नैराश्यवादी राहतात.

३. कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला कायम नकारार्थी विचार करणे:

ऑफिसमधील कोणी मित्र नोकरी सोडून नवीन बिझनेस करणार आहे म्हणून सगळेच त्याला शुभेच्छा देतात मात्र सगळ्यात आधी फक्त नकारात्मक विचार करणारे जाऊन त्या मित्राला उगीच घाबरवून येतात.

अरे बिझनेस असा कसा चालेल? तू त्यात अपयशी झालास तर? पुन्हा नोकरी मिळेल का? मग काय करशील? आशा प्रकारचे अत्यंत निगेटिव्ह शेरे मारून येतात..

स्वतः तर कोणतेच काम हिरीरीने, सकारात्मकतेने करणार नाहीत मात्र दुसऱ्यांनाही भ्रमित करून सोडणार.

४. टोकाचे मत मांडणे:

काही जण बऱ्याचदा टोकाची मते मांडतात. त्यांना बॅलन्स्ड राहताच येत नाही.. चांगले टोकाचे विचार परवडतात… पण हे सारखे निराशाजनक टोकाचे विचार करतात!!

म्हणजे कधी चुकून स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बिघडला तर मी आता कधीच चांगला स्वयंपाक करू शकणार नाही. किंबहुना मी स्वयंपाक करण्याच्या लायकीचाच नाही. हे ही निराशावादी विचारांचे पाईक असतात.

हे असे मनामध्ये इतकी निगेटिव्हीटी भरून कसे राहतो आपण ह्याचा विचार केलाय का कधी?…

कधीतरी शांततेने थोडा विचार करा….
  • की मी चांगले ते गाळून फक्त वाईटाचा विचार करतो का?
  • सगळ्यातून शेवटी फक्त काहीतरी वाईटच घडणार असे समजून चालतो का?
  • सगळ्या चुकांना मी स्वतःलाच जबाबदार धरतोय का?
  • मला हे रंगीबेरंगी सुंदर जग फक्त कृष्णधवलच दिसतेय का?

ह्या सगळ्यांचे उत्तर, जर हो येत असेल तर आपण खूपच निराशावादी होत चाललेलो आहे हे पक्के समजा. मग आता ह्या निराशावादातून आशावादाकडे कसे वळता येईल ह्यावर थोडे मंथन करा.

कारण आपल्या मनातल्या ह्या दुष्टभावनांना आवर घालणे फारच गरजेचे आहे. ह्या निराश करणाऱ्या भावना आपल्याला चांगला माणूस बनू देत नाहीत.

निराश, हतबल, डिप्रेस्ड, गूढ किंवा विकृत अशी मनोवृत्ती वाढीस लागण्याची शक्यता असते. अशी माणसे समाजात सुद्धा नाकारली जातात.

म्हणून जितक्या लवकर तुमच्या मनातून हे नाकारात्मकतेचे भूत पळून जाईल तितक्या लवकर तुम्ही आयुष्य जगायला शिकाल. तुमची नोकरी, तुमचे काम आनंदाने करायला शिकाल. सगळ्या लोकांमध्ये आवडीचे, हवेहवेसे बनून राहाल.

हे तर आपल्याला आता कळून चुकले आहे की, हे विचारांचे दुष्टचक्र आपल्याला हवे असलेले आयुष्य कधीच जगू देत नाहीत.

तर मंडळी सोप्या पद्धतीने ह्या वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावायचे ते आपण पाहू:

१. मनातल्या आवाजाला एकदा ऐकून घ्या आणि त्यावर उपाय योजना करा:

एखाद्या सभेत उभे राहून बोलायची हिम्मत माझ्यात आहे मात्र आतले मन मला सांगतेय की कोण ऐकणार तुला? काय बोलणार तू? ते चुकलं तर जग हसेल तुझ्यावर. कशाला स्वतःची नाचक्की करून घेतोस?

अशा वेळी मी नक्की काय करायला हवे?

तर मनातल्या आवाजाला, त्या शैतानाला आपल्यावर, आपल्यातल्या सद्गुणांवर वरचढ होऊ द्यायचे नाही.

सभेत बोलायचे आहे ना, तर मनाला समजावा… की कोणी ऐको ना ऐको मी जाऊन बोलणार. मला विषयाला धरून जे बोलायचे आहे तो विचार मांडणार.

चुकली मांडणी तर लोक हसतील. मला त्यातून धडा मिळेल. मात्र जर विषयाची मांडणी सगळ्यांना पटली तर माझी प्रशंसा होईल. मला अजून धैर्य मिळेल आणि पुढे जाऊन मी अजून चांगला प्रवक्ता बनेन.

त्यामुळे ज्याला लोकांशी बोलता येते अशा व्यक्तीने स्वतःशी सुद्धा संवाद साधला पाहिजे.

जे काही किल्मिष मनात घर करून बसले आहे त्याला बाहेरची वाट मोकळी करून दिली पाहिजे.

तुमच्यातले नकारात्मक विचार तुम्हीच अशा रीतीने, आत्मविश्वासाने, प्रयत्नांने सकारात्मक करू शकता.

२. स्वतःवर माया करा, स्वतःशी कठोर होऊ नका:

आपण जे दुसऱ्याला बोलू शकत नाही असे काहीही स्वतःला बोलू नये. जर दुसऱ्याला वाईट वाटू नये म्हणून आपण कोणाला दुखरे शब्द बोलत नसू, तर तसे विचार आपण स्वतः बाबतीत ठेवणे सुद्धा चुकीचेच आहे.

तुमच्याकडून काही चुका झाल्या तरी सतत स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. मोठ्या चुकीसाठी पश्चाताप जरूर करावा आणि आपले वागणे सुधारून पुन्हा हेल्दी लाईफकडे वळावे.

मात्र मनावरचे ते ओरखडे पुसून टाकण्यास मनाला मदत करावी. सतत गतकाळातील चुकांची उजळणी करत स्वतःला दुखवू नये.

स्वतःकडून उगाच अवास्तव अपेक्षा करणे उचित नाही. चूका सगळ्यांकडूनच घडतात तुम्हीही त्यातीलच एक असे समजून स्वतःला ताणताणावापासून दूर ठेवा. दुसऱ्यांच्या चुकांसाठी स्वतःला कधीच दोषी समजू नका. आणि सगळ्यातून मार्ग निघेल असे मनाला समजवा.

३. ‘परफेक्शनिस्ट’ बनण्याच्या नादाला लागू नका:

जर तुम्ही सर्वांगाने परिपूर्ण म्हणजेच परफेक्ट बनायच्या मागे लागलात तर तुम्ही लवकर निराश व्हाल कारण अपयश तुमच्याने सहन होणार नाही.

जगात कोणीच परफेक्ट नाहीये. सगळे जण आपापल्या परीने उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न मात्र करत असतात.

आपणही आपल्यातल्या त्रुटी समजून घेतल्या पाहिजेत. आणि मानला उन्नतीचा मार्ग दाखवला पाहिजे. सतत पुढे जात राहणे हेच यशाचे गमक असते.

‘कमी वेळात परफेक्ट होणे’ असे काहीही अस्तित्वात नाही. आयुष्यभर शिकत राहायचे असते आणि मनाला त्या साच्यात बसवायचे असते.

कारण आपण जर परफेक्ट होण्याच्या मागे लागलो तर आपल्यातले ते नकारात्मक विचार पुन्हा डोके वर काढायला लागतात. आणि आपल्याला निराश, उदास होण्यास हातभार लावतात.

परफेक्ट होण्याच्या नादात तुम्ही अशक्य गोष्टीही करायच्या मागे लागता. सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. कोणाशी भांडण झालेच तर त्याला काय उत्तर दिले किंवा काय द्यायला हवे होते हेच विचार तुमच्या डोक्यात घर करून राहतात.

आणि ते सगळे नकारात्मकच असते हे ध्यानात ठेवा.

परिपूर्ण होताना आपण सतत इतरांना जे आपल्यापेक्षा जास्ती परिपूर्ण आहेत त्यांना आपल्या नजरेसमोर ठेवतो.

मला असे बनायचे आहे.. मात्र माझ्याकडे अमुक नाही. असे जमायला हवे पण माझ्या नशिबात तमुक नाही असा ‘नन्ना’ चा नकारात्मक पाढा सुरू होतो..

आणि सतत आपल्यापेक्षा कोणीतरी सुपिरिअर आपल्याला दिसत राहते ज्यामुळे आपल्यामध्ये पुन्हा इंफिरीओरिटी कॉम्प्लेक्स (दुसऱ्यांपेक्षा कमी असणे) वाढायला लागतो..

त्यापेक्षा तुम्ही ज्यात पारंगत आहात त्यावर लक्ष केंद्रित करा. त्यातही आपल्या पुढे कोण आहे हे बघण्यापेक्षा आपण आपल्याशीच काही स्पर्धा करू शकतो का ते बघा.. स्वतःचीच उत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न जरूर करा…!!

मनातील निराशेचा राक्षस / डेव्हिल काढून टाकून तो आनंदी आणि सकारात्मक देवदूत / एंजल शोधा.. त्याला कधीच जाऊ देऊ नका.. शेवटी सकारात्मकताच सशक्त मनाचा सोबती आहे हे सत्य जाणून घ्या.. चला तर मग मनाच्या नैराश्येतून आशावादाकडे वाटचाल सुरू करूया..!!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय