वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ चे आयकर रिटर्न भरण्याची संधी ३१ मार्च २०१८ पर्यंत

अर्जुन(काल्पनीक पात्र)-कृष्णा, आर्थिक वर्ष २०१७-१८चा शेवटचा महिना जवळ आला आहे. या वर्षाच्या मार्च अखेरीस करदात्याने काय काळजी घेतली पाहिजे?

कृष्ण(काल्पनीक पात्र)-अर्जुना, मार्च महिना सर्व करदात्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. आपल्या देशात, एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष सर्व कर कायद्यांसाठी लागू होते. म्हणूनच एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी खात्याची वह्या पुस्तके तयार केली जातात. २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठीIncome Tax Returnभरण्यासंदर्भात काही सक्तीचे नियम आले आहेत.

अर्जुन-कृष्णा, आयकर रिटर्न कोणाला भरावयाचे असतात?

कृष्ण-

  • ज्यांचे वैयक्तिक किंवा एच.यु.एफ. करदात्यांचे वार्षिक उत्पन्न नियोजित मर्यादेपेक्षा जास्त आहे,
  • कंपनी, एल.एल.पी., पार्टनरशिप फर्म, कितीही उत्पन्न असले तरी
  • संस्था राजनैतिक दल ज्यांचे सूट घेण्याअगोदरचे उत्पन्न बेसिक कर निर्धारण रकमेपेक्षा जास्त असेल तर.

तसेच, खालील व्यक्तींनी आयकर रिटर्न दाखल करावे.

  • उत्पन्न बेसिक कर निर्धारण रकमेपेक्षा कमी परंतु, मोठी रक्कम बँकेत जमा केली असेल
  • ज्या व्यक्तीने मोठ्या रकमेचे व्यवहार केले असतील

अर्जुन-कृष्णा, २०१५-१६ साठी आयकर विवरणपत्र भरण्याची वेळ काय होती?

कृष्ण-अर्जुना,ज्यांना ऑडीट लागू होत नाही त्यांना वर्ष २०१५-१६ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०१६ होती, तसेच टॅक्स ऑडीट लागू असणाऱ्यांसाठी १७ ऑक्टोबर २०१६ होती. करदाते उशीरा रिटर्न ३१ मार्च २०१८ पर्यंत दाखल करू शकतात. परंतु उशीरा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये तोटा असेल तर तो पुढील वर्षात घेता येत नाही व कर भरण्यास येत असेल तर त्यावर व्याज भरावे लागेल.

अर्जुन-कृष्णा, आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या आयकर विवरण पत्र दाखल करण्याची मुदत वेळ काय असते?

कृष्ण-अर्जुना, ज्यांना ऑडीट लागू होत नाही त्यांना वर्ष २०१६-१७ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०१७ होती. तसेच टॅक्स ऑडिट लागू असणाऱ्यांसाठी ७ नोव्हेंबर २०१७ होती. करदाते उशीरा रिटर्न ३१ मार्च २०१८ पर्यंत दाखल करू शकतात. परंतु उशीरा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये तोटा असेल तर तो पुढील वर्षात घेता येत नाही व कर भरण्यास येत असेल तर त्यावर व्याज भरावे लागेल.करदाता आर्थिक वर्ष २०१६-१७ चे आयकर रिटर्न ३१ मार्च २०१८ नंतर दाखल करू शकणार नाही.

अर्जुन-कृष्णा, आर्थिक वर्ष २०१७-१८ चे आयकर विवरण पत्र दाखल करण्याची मुदत वेळ काय असेल?

कृष्ण-अर्जुना, ज्यांना ऑडीट लागू होत नाही त्यांना वर्ष २०१७-१८ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१८ आहे. तसेच टॅक्स ऑडीट लागू असणाऱ्यांसाठी ३० सप्टेंबर २०१८ आहे. जर करदात्याने आयकर विवरण पत्र दाखल केले नाही तर त्यावर लेट फी लागेल. करदात्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखाच्या खाली असेल तर त्यावर रू.१,००० लेट फी भरावी लागेल आणि रू. ५ लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्याला रू. ५,००० लेट फी भरावी लागेल. आयकर विवरण पत्र ३१ डिसेबंर २०१८ नंतर दाखल केले तर त्यास रू. १०,००० लेट फी लागेल.

अर्जुन-कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?

कृष्ण-अर्जुना, शिस्त हे माणसाला जीवनात यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. आणि शासनाने आणलेले हे उपाय आर्थिक शिस्त लावण्यासाठी मदत करतील. करदात्यांनी या बदलाचे स्वागत केले पाहिजे. आणि आयकर विवरण पत्र वेळेवर दाखल करून त्याचे योगदान दिले पाहिजे.आर्थिक वर्ष २०१५-२०१६ व २०१६-१७चे आयकर रिटर्न भरण्याची संधी ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे.

वाचण्यासारखे आणखी काही…..

बँकांकडून केली जाणारी एकतर्फी शुल्कवसुली
शेअरबाजार- आक्षेप आणि गैरसमज
गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय