अपचनाचा त्रास होत असल्यास, हे घरगुती उपाय करून बघा

अपचनाचा त्रास होऊन पोटात दुखतेय? गॅस होतात, पित्त होते? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या अपचनावर करण्याचे घरगुती उपाय.

अपचनाबद्दल हि माहिती समजून घेतली, तर नक्कीच तुमचा अपचनाचा त्रास कमी होऊ शकेल.

जरा जास्त जेवण झाले की बऱ्याचदा आपल्याला त्रास होतो.

जेवण घशाशी येणे, नंतर लवकर भूक न लागणे, क्वचित पोटात दुखणे यासारखे त्रास व्हायला लागतात.

कधी जेवण रोजच्या ठरलेल्या वेळेत झाले नाही तरी आपल्याला पित्ताचा त्रास होतो आणि खाल्लेले पचत नाही.

कधी एखाद्या पदार्थाने सुद्धा आपल्याला पित्त होऊ शकते किंवा काही पदार्थांनी पोट सुद्धा बिघडू शकते.

अपचन होणे हा अगदी सामान्य आजार आहे.

वरवर बघता हा आजार किरकोळ जरी वाटला आणि त्याचा त्रास फारफार तर एक दोन दिवस होत असला तरी, तो चांगलाच तापदायक मात्र असतो.

अपचन होते म्हणजे नक्की काय होते?

पोट डब्ब होणे, पोटात दुखणे किंवा जळजळणे, मळमळून उलटी सारखे वाटणे आणि काही खावे प्यावे न वाटणे म्हणजेच थोडक्यात अपचन होणे.

अपचन होण्याची अनेक कारणे असू शकतात. एखाद्याची प्रकृती, एखाद्या औषधाचा परिणाम, खाण्यात काहीतरी कमीजास्त झाल्यामुळे पोट बिघडणे, एखाद्या पदार्थाची ऍलर्जी, पोटात इन्फेक्शन किंवा फूड पॉयझनिंग आणि टेंशन सुद्धा!

अँटिबायोटिक्स, थायरॉईडची औषधे, स्टिरॉइड या औषधांमुळे सुद्धा पोट बिघडून अपचनाचा त्रास होऊ शकतो.

तसेच खाण्यापिण्याच्या सवयी म्हणजेच जास्त खाणे, घास नीट न चावता खाणे, खूप तेलकट आणि तिखट, मसालेदार जेवण करणे, खूप प्रमाणात दारूचे सेवन करणे यामुळे सुद्धा अपचन होऊ शकते.

अपचन झाल्यावर आराम मिळावा, पोटातले दुखणे कमी व्हावे यासाठी घरच्याघरी करायचे असे कोणते उपाय आहेत ते आपण आता बघूया.

1. भरपूर पाणी प्या

पोट बिघडल्यामुळे जुलाब होत असतील तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

यामुळे डिहायड्रेशन होऊन अशक्तपणा येऊ शकतो. म्हणून पोट बिघडल्यावर पाण्याचे प्रमाण वाढवावे. पाण्याबरोबर लिंबू, कोकम सरबत, नारळ पाणी प्यायले तर अशक्तपणा कमी व्हायला मदत होते.

शिवाय पोट बिघडल्याने जेवण जात नसेल तर, पाण्याने शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवली जाते.

2. आले

‘आले’ हे एक अपचनासाठी उत्तम घरगुती उपाय आहे.

आल्यामध्ये असलेल्या जिंजेरॉल्स मुळे पोटाचे आकुंचन होते आणि पोटात असलेल्या अन्नाचे पचन लवकर होते.

आल्यामुळे मळमळणे, उलटी आल्यासारखे वाटणे सुद्धा कमी होते.

पोट बिघडल्यावर आले किसून त्यात लिंबू आणि साखर घालून थोडे थोडे घेत राहिल्याने बरे वाटते.

3. पुदिना

पुदिन्याच्या वासाने उलटी सारखे वाटणे आणि मळमळणे कमी होते.

पुदिन्यात असलेल्या ‘मेंथॉल’ मुळे पोटातले आखडलेले स्नायू मोकळे होऊन पोट दुखण्याचे कमी होते.

पुदिन्याची पावडर लिंबाच्या सरबतात मिसळून किंवा चहामधे उकळून पिऊ शकतो.

4. गरम पाण्याने शेकणे

गरम शेकामुळे आखडलेले स्नायू मोकळे होऊन पोटदुखी कमी होते.

अपचनामुळे जर पोटदुखी असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने पंधरा ते वीस मिनिटे शेकल्याने आराम मिळतो.

5. आहारात बदल करा

आहारात जास्त स्टार्च असलेले पदार्थ वाढवल्याने जुलाब कमी होतात.

केळी, सफरचंद, भात आणि भाजलेला ब्रेड या पदार्थांमध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असते.

पोट बिघडल्यावर इतर मसालेदार, तेलकट, तुपकट, असे पचायला जड असलेले पदार्थ न खाता या पदार्थांवर भर दिला तर जुलाबाचे प्रमाण कमी होते.

याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ सुद्धा टाळावेत व भरपूर पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.

6. लिंबू पाणी आणि बेकिंग सोडा

लिंबू पाण्यात एक चिमुटभर बेकिंग सोडा घालून प्यायल्याने ऍसिडिटीमुळे झालेल्या अपचनापासून लगेच आराम मिळतो.

बेकिंग सोड्यात असलेले कॅर्बोनिक ऍसिड हे पित्तनाशक असते.

आणि लिंबाच्या वासामुळे मळमळणे, उलटी होणे हे कमी होते. लिंबू सुद्धा पित्तनाशक असते.

7. जिरे

जिऱ्यांमुळे आपल्या शरीरातला गॅस, म्हणजेच वात कमी होतो आणि ते पित्तशामक सुद्धा असते.

अपचनामुळे पोटात दुखत असेल तर एक चमचा जिरे चावून खाल्ले तर लगेच आराम मिळतो.

चमचाभर जिरेपूड पाण्यात उकळून ते पाणी पिणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.

8. कोरफडीचा गर

अपचनात कोरफडीचा गर फायदेशीर असतो.

कोरफडीच्या गरात अँटिबॅक्टेरियल एजंट्स असतात. त्यामुळे पोटात काही इन्फेक्शन असेल तर दूर होते.

पोटात जर अन्नावाटे काही विषारी घटक गेले असतील तर ते शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत होते.

आणि मुख्य म्हणजे कोरफडीच्या गरामुळे प्रोटीन पचायला मदत होते.

9. तुळस

तुळशीची पाने अपचनासाठी अतिशय उपयुक्त असतात.

यामुळे पोटातला गॅस लवकर पास होतो आणि पचनाचा वेग सुद्धा वाढतो.

जर अपचनामुळे पोटात दुखत असेल तर तुळशीची पाने चावून खाल्ल्याने ते दुखणे सुद्धा कमी होते.

पोट बिघडल्यावर जेवणांनंतर चार-पाच तुळशीची पाने खाल्ल्याने फरक पडतो.

तुळशीची पाने पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे उकळून ते पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि अपचन यापासून लगेच सुटका मिळते.

10. थंड दूध

दूध हे पचायला जड असले तरी खूप पित्त होऊन उलट्या आणि अपचन होत असेल तर वाटीभर थंड दूध सगळ्यात पटकन पित्त कमी करायला उपयोगी पडते.

11. ताक आणि हिंग

ताकात असलेले लॅक्टोबॅसिलस हे पचनासाठी मदत करतात आणि हिंगामुळे गॅसेस कमी होतात.

अपचन, पित्त या सारख्या त्रासात वाटीभर ताकात चिमूटभर हिंग घालून प्यायल्याने लगेच फरक पडतो.

हे झाले अपचनावरचे घरगुती उपाय. अपचन झाले तर सर्वात आधी, आपण घरच्याघरी हे उपाय करून बघू शकतो.

याने अपाय नक्कीच होणार नाही. हे उपचार करून सुद्धा पोटात दुखतच असेल, उलट्या होत असतील, जुलाबावाटे रक्त जात असेल तर मात्र लगेचच योग्य त्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावेत.

अपचन मुळात होऊच नये, म्हणून काय काळजी घ्यायची ते आता थोडक्यात बघूया.

1. अन्नाचा घास चावताना खूप भराभर तसेच तोंड उघडे ठेऊन किंवा बोलता बोलता चावू नये.

यामुळे हवा पोटात जाते आणि अपचनाचा त्रास होतो.

2. घास नीट चावूनच गिळावा. घास चावताना अन्न आपल्या लाळेत मिसळते ती पचनक्रियेची पहिली पायरी असते.

घास नीट चावला तर अन्न लवकर आणि व्यवस्थित पचते.

3. जेवताना पाणी पिणे टाळावे, जेवण झाल्यावर काही वेळाने पाणी प्यावे.

4. शक्यतो जेवायच्या वेळा ठरवून रोज त्याच वेळेला जेवायचा प्रयत्न करावा. रात्री उशिरा जेऊ नये.

अपचन या खूप सामान्य पणे होणाऱ्या त्रासाची माहिती देणारा, हा लेख तुमच्या ओळखीच्यांबरोबर नक्की शेयर करा.. कारण ‘शेयरिंग इज केअरिंग’

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय