ब्लॉगिंग हा एक घरबसल्या पैसे कमवण्याचा हमखास मार्ग आहे… कसा ते वाचा

आपल्या मांडीत लॅपटाॅप आणि हातात स्मार्टफोन आल्यापासून आपले कुठल्याही काम इंटरनेटशिवाय होत नाही.

आपल्याला हवी ती माहिती, मनोरंजन अवघ्या काही क्लिक्समध्ये आपल्यासमोर उपलब्ध होते.

एखाद्या आजाराविषयी माहिती असो किंवा आरोग्याविषयी, एखाद्या पर्यटनस्थळाबद्दल किंवा वेगवेगळ्या प्रांतात केल्या जाणाऱ्या पदार्थांबद्द्ल.

आपल्याला वाचनीय अशा अनेक कथा, लेख सुद्धा या इंटरनेटवर उपलब्ध असतात.

आपल्याला हवी असलेली सगळी माहिती, विरंगुळा म्हणून वाचनासाठी साहित्य आपल्याला अगदी सहज मिळते.

ही आपली एकप्रकारची चैनच म्हणावी लागेल कारण पूर्वीच्या काळी अशी माहिती मिळवायला तासनतास घालवून पुस्तके मिळवून ती चाळत बसायला लागायचे.

पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की ही एवढी माहिती, रेसिपी, प्रवास वर्णने कोण लिहितात, ती वेबसाईटवर कशी अपलोड करतात आणि हे काम कसे चालते

ही वेगवेगळ्या विषयांवरची माहिती लिहिणे, ती इंटरनेटवर पोस्ट करणे याला ब्लॉगिंग म्हणतात आणि हे ब्लॉगिंग म्हणजे इंटरनेट च्या क्रांती मुळे तयार झालेली एक इंडस्ट्री आहे.

आणि इंटरनेट मुळे बरेच नवे उद्योग, करियर ऑप्शन्स जसे जन्माला आले त्यातीलच एक म्हणजे ‘ब्लॉगिंग’!!

हे ब्लॉगिंग म्हणजे नेमके काय, ते कसे करायचे आणि त्याचा करियर म्हणून विचार कसा करायचा, थोडक्यात म्हणजे त्यातून पैसे कसे कमवायचे हे प्रश्न, ही माहिती वाचून साहजिकच तुमच्या मनात आले असतील.

याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखातून तुम्हाला मिळणार आहेत.

तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा.

१. ब्लॉगिंग म्हणजे काय?

आपल्याजवळ असेलेली महिती किंवा आपले ज्ञान हे लेखाच्या स्वरुपात लिहून ते इंटरनेटवर पोस्ट करणे यालाच ब्लॉगिंग म्हणतात.

ज्या वेबसाईटवर ही माहिती पोस्ट केली जाते त्याला ब्लॉग म्हणतात आणि जी व्यक्ती हे लेख लिहिते त्या व्यक्तीला ब्लॉगर म्हणतात.

ब्लॉगर हा त्याला ज्ञान असलेल्या किंवा त्याच्या आवडीच्या कुठल्याही विषयावर लेख लिहून पोस्ट करू शकतो.

हे लेख माहितीपर, अनुभवकथन, अभ्यासाशी निगडीत, निसर्गाशी निगडीत, एखाद्या कलेबद्दल असे विविध विषयांवर असू शकतात.

हल्ली कुठल्या क्षेत्रात, जशा चुकीच्या गोष्टी घडतात तसंच येथे सुद्धा ‘फेक न्यूज’ किंवा ‘सनसनाटी माहिती’ पोहोचवणे तुम्ही बघत असालच.

पण चांगल्या गोष्टी, चांगली माहिती वाचणं ती शेअर करणं हे जर वाचकांनी केलं तर चुकीच्या गोष्टी चुकीचे लेखन हे थांबवणं वाचकांच्याच हातात आहे.

२. ब्लॉगिंग कसे करायचे?

ब्लॉगिंग करायला दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. ते म्हणजे लिहिण्याची कला आणि कोणत्यातरी एका विषयाबद्दल सखोल ज्ञान.

जरी तुम्ही एखाद्या विषयात अगदी एक्स्पर्ट असाल पण तुमच्याजवळ लिखाणाची कला नसेल तर ब्लॉगिंग या प्रांतात तग धरणे अवघड जाते.

या दोन महत्वाच्या गोष्टी असतील तर सोबतीला लिखाण करायला लॅपटाॅप आणि लिखाण इंटरनेटवर पोस्ट करायला इंटरनेट कनेक्शन घेतले की तुम्ही लगेच ब्लॉगिंगला सुरुवात करू शकता.

ब्लॉगिंग करण्यासाठी प्रथम तुम्हाला ज्ञान असलेला, तुमच्या आवडीचा एक विषय तुम्ही निवडला पाहिजे.

तुम्ही तुमच्या पाककृती शेयर करण्यासाठी ब्लॉगिंग करू शकता किंवा तुम्हाला अवगत असलेली एखादी इतर कला शिकवायला सुद्धा तुम्ही ब्लॉगिंगचा वापर करू शकता.

या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्याकडे ज्या विषयांवर माहिती असेल ती तुम्ही या मार्गाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवू शकता.

पण याची नेमकी सुरुवात कशी करायची?

आता यासाठी उपलब्ध असलेले दोन सर्वात सोपे पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही सुरुवात करायला Blogger.com किंवा WordPress.com या वेबसाईटवर सगळ्यात पहिले आपले अकाऊंट उघडून आपला ब्लॉग तयार करावा लागतो.

Blogger.com या वेबसाईट वर जाऊन “Create a new blog” हा पर्याय निवडावा लागतो.

यानंतर आपल्यासमोर गुगल अकाऊंट वापरून साईन इन होण्याचा पर्याय येतो.
हा पर्याय निवडून साईन इन करून आपण आपला ब्लॉग तयार करू शकतो.

यानंतर आपल्याला आपल्या ब्लॉगचे नाव, URL म्हणजे आपल्या वेबसाईटचे नाव आणि ब्लॉगची थीम निवडता येते.

यावर ब्लॉग आकर्षक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्याचा वापर करून आपण आपला ब्लॉग तयार करू शकतो.

यानंतर आपण लिहिलेले लेख त्यावर पोस्ट करणे ही दुसरी पायरी.

आपण लिहिलेले लेख हे योग्य व्यक्तींना पोहोचवणे ही तिसरी पायरी. हे योग्य व्यक्ती म्हणजे ज्यांना आपण लिहिलेले लेख वाचायची इच्छा असेल असे – टार्गेट ऑडीयन्स.

काही महिने जर नियमितपणे लेख लिहिणे, ते ब्लॉगवर पोस्ट करणे, ब्लॉग जास्तीतजास्त आकर्षक करणे आणि तो योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणे जेणेकरून तो जास्तीतजास्त प्रमाणात वाचला जाईल या गोष्टी सातत्याने करत राहिलो तर ब्लॉग लवकरात लवकर लोकप्रिय होतो.

यानंतर आपण आपल्या ब्लॉगवर Google Adsense कडून जाहिराती घेऊन त्याद्वारे पैसे कमवू शकतो.

ब्लॉग तयार करायच्या आधी, आपल्याला ब्लॉगिंगबद्दल प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काही महत्वाचे शब्द माहीत पाहिजेत.

१. कंटेंट – आपल्या ब्लॉगवर पोस्ट केल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीला कंटेंट म्हणतात. हा कंटेंट लेखाच्या स्वरुपात असू शकतो किंवा फोटो, व्हिडीओ सुद्धा असू शकतात.

२. URL – Uniform Resource Locator हा याचा फुल फॉर्म. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर हा म्हणजे आपल्या ब्लॉगच इंटरनेटवरचा पत्ता.

याला वेबअड्रेस असे म्हणतात. हा वेबअड्रेस गुगलवर जी लोक सर्च करतील त्यांना थेट आपल्या ब्लॉगची लिंक मिळते.

२. लेआऊट – याला थीम किंवा डिझाईन असे सुद्धा म्हटले जाते. आपण एकदा ब्लॉग तयार करून आपला URL निवडला की आपल्यासमोर अनेक पर्याय येतात.

त्यातू वेगवेगळी रंगसंगती निवडून डिस्प्ले जास्तीतजास्त आकर्षित करता येतो. तसेच योग्य थीम वापरून आपला ब्लॉग वापरायला अतिशय सोपा करू शकतो.

३. SEO – म्हणजे Search Engine Optimization. आपल्या ब्लॉगवर आपण जे लिखाण करतो ते गुगलवर सर्च केल्यावर जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही ठरविक मार्ग असतात.

या मार्गांचा वापर करून आपला ब्लॉग गुगल सर्चमध्ये दिसेल असे प्रयत्न आपण करू शकतो.

३. ब्लॉगिंग करून पैसे कसे कमवायचे?

खरेतर ब्लॉगवर सतत लिखाण करणे, तो जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ही अत्यंत मन लाऊन आणि नियमितपणे करण्याची गोष्ट आहे.

ब्लॉग हे पैसे कमवण्यासाठी प्रभावी साधन आहे हे जरी खरे असले तरी त्यातून पैसे कमावणे हे इतके सोपे सुद्धा नाही.

यासाठी खूप प्रयत्न करण्याची आणि वाट बघण्याची तयारी हवी. थोडक्या शब्दांत सांगायचं तर ही तपश्चर्या आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

ब्लॉग सुरु केल्यावर साधारण सुरुवातीचे सहा महिने तरी त्याला तितकीशी लोकप्रियता मिळत नाही. पण या सहा महिन्यात कंटाळून न जाता आपण नियमितपणे लेख पोस्ट करत राहिले पाहिजे.

जसजसे जास्तीतजास्त लोक तुमचा ब्लोग वाचतील, शेयर करतील तशीतशी त्याची लोकप्रियता वाढत जाईल.

तुमच्या ब्लॉगची लोकप्रियता वाढावी यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. लोकांना आवडेल अशा पद्धतीचे जास्तीजास्त लिखाण करणे आणि ते लिखाण इतरांना आवडत असल्यास ते शेअर केले जाईल.

एक लक्षात घ्या की आपला ब्लॉग आपणच सोशल मीडियावर भरपूर शेअर करण्याची बऱ्याच नवीन ब्लॉगर्स ची सवय असते.

पण यामुळे स्पॅम होऊन निगेटिव्ह परिणाम होतो. त्यामुळे कन्टेन्ट चांगला असण्यावर भर देणं हे सर्वात महत्त्वाचं…

ब्लॉग लोकप्रिय झाल्यावर काही महिन्यातच गुगल सर्चमध्ये तो दिसायला लागेल. यामुळे अधिकाधिक लोकांना तुमचा ब्लॉग वाचायला मिळेल. यामुळे तुमच्या ब्लॉगवरचे ट्राफिक वाढेल.

यानंतर ब्लॉगमधून पैसे कमवण्याचे काही पर्याय आहेत.

१. तुम्ही Google Adsense ला अप्लाय करू शकता. याचे अप्रूव्हल मिळाले तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर वेगवेगळ्या जाहिराती देऊन पैसे कमवू शकता.

२. तुम्ही एखाद्या कंपनीच्या एखाद्या उत्पादनाची जाहिरात तुमच्या लिखाणाद्वारे तुमच्या ब्लॉगवर करू शकता.

ही जाहिरात करण्याचा मोबदला म्हणून तुम्ही त्या कंपनीकडून पैसे घेऊ शकता. तुमचे एखादे उत्पादन सुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्लॉगवर विकू शकता.

म्हणजे, तुमचा जर कथांचा ब्लॉग असेल तर तुमचे कथासंग्रह तुम्ही विकू शकता, रेसिपीचा ब्लॉग असल्यास तुमची उत्पादने, मसाले इत्यादी तुम्ही विकू शकता.

मित्रांनो, ब्लॉगिंग करू लगेच पैसे कमावणे जरी शक्य नसले तरी कालांतराने ब्लॉगिंगच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावले जाऊ शकतात. असे झाल्यावर तुम्ही ब्लॉगसाठी स्वतंत्र डोमेन, आकर्षक थीम इत्यादी निवडू शकता.

हे जरी असले तरी प्रत्येक ब्लॉगर हा पैसे कमावण्यासाठीच लिहितो असे नाही. जसं मनाचेTalks चा नेहमीच उद्देश असतो, प्रत्येक माहिती वाचकांना स्पष्ट मिळावी, ज्याचा त्यांना फायदा होऊ शकेल.

कोरोनाकाळात आपले काम बरेच जणांना गमवावे लागले म्हणूनच ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. न जाणो कुणाला यातून आपल्या करियरच्या वाटा सुद्धा सापडतील…

हाच विषय मनाचेTalks हिंदी मध्ये खाली बघा.

ब्लॉगिंग क्या है और इससे पैसे कैसे कमाएँ? WHAT IS BLOGGING AND ALL ITS BASICS IN HINDI भाग:१

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “ब्लॉगिंग हा एक घरबसल्या पैसे कमवण्याचा हमखास मार्ग आहे… कसा ते वाचा”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय