खिडकितून ‘दूर’दर्शन

“भाईयों और बहनों …. अब दिल थाम के बैठियों आपके सामने…..” आमीन सायानीचं लयबध्द बोलणं चालू होतं. बंडया रेडीयो मांडीवर घेवून बसला होता. त्याच्या आजुबाजुला वीस पंचविस जण कानात प्राण आणून गाणी ऐकत होती. जवळपास सगळा गावच घोळक्या घोळक्यांनी बसस्टॅण्डवर बसला होता. सकाळी दहा वाजताची वेळ होती एसटीची. मात्र साडे अकरा वाजून गेले तरी एसटीचा पत्ता नव्हता. अखेर बारा वाजताच्या दरम्यान लांबूनच एसटी येताना दिसली तशी जमलेल्या लोकांनी आराडाओरड करायला सुरुवात केली. लहान मुलं नाचायला लागली. मोठयांचा आनंदही गगनात मावेनासा झाला. लहान मोठे सगळयांनीच एसटीचे उभे राहून स्वागत केले. रस्त्यावरचा धुराळा उडवत एसटी बसस्टॅण्डवर थांबली.

बोटावर मोजण्याइतकी माणसं खाली उतरली आणि दोन चार माणसं बसली. तोपर्यंत सर्व जण एसटीला न्याहारुन बघण्यात व्यस्त होते. तेवढयात कंडक्टर जोरात ओरडला. झाली का माणसं. बाकी आहे का कोणी अजून! नाही, कोण नाही जाऊ दया! उपस्थित सगळयांनी जोरात ओरडून कंडक्टरला सांगितलं. ड्रायव्हरने जोरात हॉर्न वाजवला. तसा कंडक्टर ओरडला चालू दया! एसटी चालू झाल्याबरोबर लहान मुलांनी परत ओरडायला सुरुवात केली. पुन्हा धुराळा उडवत एसटी निघून गेली. अन् संपूर्ण गाव आनंदाने एसटीच्याच गप्पा करत घराकडे निघून गेला.

संध्याकाळी पाच वाजता सगळा गाव एसटी स्टॅण्डवर जमला होता. नेहमीप्रमाणे एसटी आली. काशिनाथ सावकारासह चार दोन माणसं उतरली. काशिनाथ सावकाराने बंडयाला हाक मारली. अरे बंडया जरा इकडे ये बरं! काय सावकार! बंडयानं लगेच विचारलं. काही नाही! टीव्ही आणलाय म्हटलं जरा मदत कर! एसटीच्या टपावर एन्टीना ठेवलाय. जरा काढतो का? हो घेतो खाली उतरवून. बंडया एसटीच्या टपावर चढला. एक दोन पोरांच्या मदतीनं एन्टीना खाली घेतला. तेवढयात कंडक्टरनं विचारलं झालं का? सावकार कंडक्टरच्या तोंडाजवळ जावून म्हणाला हो झालं साहेब. काढला एन्टीना पोरांनी. बरं मी काय म्हणतो साहेब! चला चहा घ्यायला आज घरी. नवीन टीव्ही आणलाय तो पण बघा. नाही नको! पुन्हा कधी तरी बघू! कंडक्टरने सावकाराला आढेवेढे घेत नकार दिला. बरं, जशी तुमची मर्जी! या मात्र कधीतरी गरीबांच्या घरी. नक्की नक्की म्हणतच कंडक्टरनं दोन वेळा घंटी वाजवली तशी एसटी मातीच्या फुफाटयात दिसेनाशी झाली.

बंडया एक काम कर. हा टीव्हीचा बॉक्स तु घे डोक्यावर कारण हे जबाबदारीचं काम आहे. बाकीचं सामान देतो दुसर्‍या पोरांकडे ते काय कोणाकडेही दिलं तरी चालते. बंडयानं मान हलवून त्यांच्या बोलण्याला संमती दिली. सावकाराच्या घरी टीव्ही पोहोचेपर्यंत वार्ता गावभर पसरली होती. त्यामुळे आधीच सगळे लोक त्यांच्या घराजवळ गर्दी करुन होते. सावकाराच्या बायकोनं आरतीचं ताट, टीव्ही ठेवायला जागा अशी सर्व तयारी आधीच करुन ठेवली होती.

बंडया हे बघ तिकडे व्हरांडयात उंच बांबू ठेवलेले आहेत. त्यातील दोन बांबू घे आणि एकमेकांना बांधून मग त्यावर आपल्याला हा एन्टीना लावायचा आहे. सावकाराने बंडयाला सांगितलं. पण एन्टीना कशावर बांधायचा? बंडयाने लगेच प्रश्न केला. अरे बाबा, आपल्या दारात जे वडाचं झाड आहे ना त्याच्यावर बांधायचाय एन्टीना त्यात काय एवढं. सावकाराने उत्तर दिलं. असं आहे का? मग लगेच बांधतो. बांबू एकमेकांना बांधतच बंडया बोलत होता. तेवढयात सावकाराची बायको आरतीच्या ताटात पेढे घेवून आली. बंडया पेढा घे आधी तुझी मामी आली बघ पेढे घेवून. सावकार जरा प्रेमाच्या सुरात बंडयाला म्हणाला.

बंड्याने अँटिना लावलेला बांबू वडाच्या झाडाला बांधला. इकडे सावकाराचं घर गर्दीने भरून गेलं होतं. टीव्ही ज्वारीच्या पोत्यांवर ठेवला होता. टीव्हीत चित्र दिसत नव्हतं नुसत्या मुंग्या-मुंग्या दिसत होत्या. सावकार बंड्याला अँटिना फिरवायला सांगत होता. खालच्या गावाकडे, वरच्या गावाकडे फिरव सांगत होता. दिसतंय थोडं थोडं फिरव. टिव्हीमध्ये चित्र दिसायला लागताच मुलं टाळ्या वाजवायची. चित्र दिसलं की जोरजोरात ओरडायचे. सावकार अहो, एवढं फिरवतोय तरी चित्र दिसत नाही. अँटिना चांगला नाही की काय? बंड्या जोरात ओरडून म्हणाला. असं कसं, बारा कांड्यांचा आहे का अँटिना? चोवीस कांड्यांचा आहे चांगला!! सगळ्यात चांगला घेवून आलोय. तू फिरवायच काम कर. चिडून सावकार बंड्याला म्हणाला. आलं रे बंडू चित्र! सावकारासह सगळे एकदम ओरडले. बंडू ये खाली दिसतो टीव्ही छान. खुशीत येऊन सावकाराने बायकोला चहा ठेवायला सांगितला. बंडू ये चहा घे बस! त्याला सावकाराने जागा दिली.

दूसर्‍या दिवशी बंड्या सकाळीच सावकाराकडे टीव्ही बघायला गेला. बघतो तर काय सगळं गाव सावकराच्या घराच्या खिडकीतून टीव्ही बघत होतं. त्याच्या घराच्या पाठीमागे थोडी गल्ली होती. त्या गल्लीत एक खिडकी होती. त्या खिडकीतून सगळे लोक टीव्ही पाहत होते. सावकराच्या बायकोनं घराच्या दरवाज्याला सकाळपासूनच कडी लावली होती. लहान मुलं दरवाजाची कडी वाजवून थकले होते. बंड्या खिडकीतून टीव्ही बघण्यासाठी गेला. सावकार आणि त्याच्या बायकोनं बंड्याकडे बघून न बघीतल्यासारखं केलं. तेव्हापासून बंड्यासह सर्व गावातील लोक सकाळी संध्याकाळ खिडकीतून टीव्ही पाहत होते.

वाचण्यासारखे आणखी काही…

स्वप्नातलं आयुष्य (परिपूर्ण आयुष्य) सत्यात कसं उतरवता येईल?
तीन जीवघेण्या शत्रुंपासुन सावधान!…. Salt, Sugar & फॅट
मेडीटेशन – तेरा ध्यान किधर है?…

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय