चार्ल्स युगेस्टर – जगातला सर्वात वयस्क ऍथलेट

वय वर्ष ९५. ह्या काळात कोणीतरी शेवटची घटका मोजत असेल असाच विचार आपण करू. एकतर दुर्धर आजार असेल किंवा निदान तब्येत ठीक असेल तर काठी टेकून आधाराची गरज भासत असेल असाच विचार कोणाच्याही मनात येईल. पण जेव्हा आपली जिद्द काहीतरी वेगळं करण्याची असते तेव्हा वय वगैरे गोष्टी खूप मागे पडतात. चार्ल्स युगेस्टर ने असंच वयाला लाजवलं.

वयाच्या चाळीशी मध्ये हाप-हापणारे सगळे बघताना वयाच्या ६३ व्या वर्षी चार्ल्स ने रोवींग शिकायला सुरवात केली. चार्ल्स इथवर थांबला नाही तर वयाच्या ८७ व्या वर्षी त्याने बॉडी बिल्डींग ला सुरवात केली. आपल्या फिटनेस ला एका वेगळ्या उंचीवर नेताना वर्ल्ड मास्टर रोविंग मध्ये तब्बल ४० गोल्ड मेडल त्याने पटकावली. एवढ सगळं झाल्यावर चार्ल्स ने निवृत्ती घेतली असेल असा आपण सगळेच विचार करू. पण चार्ल्स साठी एज इज जस्ट ए नंबर. चार्ल्स ने ह्या वयात यशाचं शिखर गाठल्यावर त्याने दुसर शिखर निश्चित केल. ते म्हणजे धावण्याचं.

जगातील सगळ्यात तंदुरुस्त असा निवृत्ती वेतन घेणारा असा बहुमान मिळवणाऱ्या चार्ल्स ने वयाच्या ९५ व्या वर्षी ब्रिटन चे १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर तसेच लांब उडीतील सगळे जागतिक विक्रम मोडीत काढले. २०० मीटर मध्ये ५४.७७ सेकंद तर ४०० मीटर मध्ये २ मिनिटे २१.४६ सेकंद तर लांब उडीत १.२९ मीटर चा जागतिक विक्रम त्याने केले. इतकं करून चार्ल्स थांबला नाही तर आपलं वार्धक्य त्याने सुंदर केलं ते आपल्या शरीराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन.

आपलं शरीर कधी न कधी थकणार ह्याची जाणीव चार्ल्स ला होती. पण वयाला आपल्या इच्छांच्या आड येऊ न देता त्याने त्या इच्छा नुसत्या पूर्ण नाही केल्या तर तो जगला. आपल स्वतःच आयुष्य त्याने सगळ्यांसाठी एक आदर्श म्हणून पुढे ठेवलं. जगातील अनेक लोकांनी त्याच्याकडून आदर्श घेतला. चार्ल्स च्या शब्दात सांगायच झाल “You are never too old to try something new” मनापासून करायची इच्छा असेल तर मग “Sky is the limit”

१९१९ साली चार्ल्स चा जन्म झाला. पेशाने दंतवैद्य असलेल्या चार्ल्सने आपल्या कार्यक्षेत्रात खूप नाव कमावल. वयाच्या पन्नाशी मध्ये चार्ल्स ला आपल्या फिटनेस बद्दल जाणवलं. त्याने मग ह्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून बघितले नाही. वयाच्या ८७व्या वर्षी चार्ल्स आपल्या फिटनेस ट्रेनर कडे जाऊन म्हणाला मला बीच बॉडी हवी आहे. “उद्या जर मी बीच वरून चालत गेलो तर वयाची ७० वर्ष गाठलेल्या तरुणींनी माझ्याकडे मान वळवून बघायला हवं”. वयाच्या ८७ वर्षी तरुण असणारा चार्ल्स अगदी ७९ वर्षाच्या तरुणीने गालाला हात लावल्यावर पण तितकाच खुश होत होता.

वयाच्या ९५ वर्षी आपल्या फिटनेस ने जगाला वेड लावणारा हा तरुण २०१७ ला एका वेगळ्या प्रवासाला निघून गेला. ९७ वर्षाच्या आयुष्यात त्याने आयुष्य जगल ते वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर. आपलं आत्मचरित्र जगापुढे मांडताना चार्ल्स आपल्या शब्दातून एक संदेश जगाला देऊन गेला. असा संदेश ज्याचा विचार प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करावा. चार्ल्स च्या शब्दात “Age is just a number”.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय