मुलं आक्रस्ताळेपणा करत आहेत का? वेळीच सुधारा त्यांच्या “या” चुका

आपण रेल्वेने प्रवास करत असतो. आपल्या बरोबर आणखी काही परिवार असतात.

त्यांच्याबरोबर लहान मुलं सुद्धा असतात. या मुलांच्या गमती जमती चालू असतात तोपर्यंत छान वाटतं.

पण मध्येच एखादा मूल एखाद्या अनोळखी व्यक्तीशी इतक्या चुकीच्या पद्धतीने बोलताना आपल्याला दिसतं की आपण थक्क होतो.

एखाद्या अनोळखी व्यक्तीचा त्या मुलाला चुकून धक्का तरी लागलेला असतो किंवा अगदी छोटंसं काहीतरी कारण असतं.

पण तो मुलगा किंवा मुलगी समोरच्या व्यक्तीचं वय लक्षात न घेता आपल्याच तोऱ्यात वाईट-साईट बोलायला लागतात.

अशा वेळेला पालक एकतर सगळ्यांसमोर आपल्याच मुलांवर जोरात ओरडतात किंवा दुसरं टोक गाठतात, ते काहीच बोलत नाहीत.

अशी मुलं हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. मुलं खरंतर ओल्या मातीचा गोळा असतात. त्यांना जसं घडवावं तशी ती घडतात.

लहान मुलं इतकी संवेदनशील असतात की त्यांच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेला ते आपलसं करतात.

कोणती गोष्ट योग्य कोणती चुकीची हे त्यांना ठरवता येत नाही.

ती फक्त अनुकरण करतात. त्यांना वेळीच रोखणं हे पालकांचं काम असतं.

आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मुलांच्या चुका पालकांनी कशा पद्धतीने सुधारल्या पाहिजेत याविषयी चला आज आपण चर्चा करूया

1) अनादर

समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा वयानं मोठी असली तरी तिला योग्य मान न देता अद्वातद्वा बोलणारी मुलं खरंतर आपल्या मनातला संताप व्यक्त करत असतात.

त्यांना सांगायचं असतं की मला इतरांच्या भावनांची अजिबात पर्वा नाही.

असा प्रसंग घडला तर पालकांनी काय करायचं? तर लगेचच त्या मुलाला बाजूला घेऊन त्यात काय चुकलं आहे त्यांनी कसं वागायला हवं होतं त्याची स्पष्ट शब्दात जाणीव करून द्यायची.

काही मुलं जास्त हट्टी असतात त्यांना सांगा जोपर्यंत त्यांचं इतरांशी वागणं सुधारत नाही तोपर्यंत त्यांचा आवडता मोबाईल, आवडते गेम किंवा आवडते पदार्थ त्यांना अजिबात मिळणार नाहीत.

जेव्हा मुलं आपली चूक मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करतील तेव्हाच त्यांच्या या कठोर शिक्षा कमी करा

2) सूचना नाकरणे

एखादी गोष्ट पालक जर सातत्याने सांगायला लागले तर मुलांच्या मनात बदल घडत असतो.

पण आपल्या चांगल्या वागण्याने फारसा फरक पडणार नाही असं वाटून ती मुलं नीट वागायचं मनावर काही घेत नाहीत.

जाणून बुजून वाईट वागणाऱ्या किंवा इतरांना वाईट वागवणाऱ्या मुलांना दिलेली शिक्षा जेव्हा मुलं सकारात्मक प्रतिसाद येतील तेव्हाच मागे घ्या.

3) हक्क

“चीपर बाय द डझन” हे पुस्तक आहे एका जोडप्याचं ज्यांना बारा मुलं असतात.

ही मुलं स्वतःला कुटुंबातील प्रत्येकाला मिळणाऱ्या खेळापेक्षा वेगळा खेळ किंवा एखादी वेगळी वस्तू हवी असेल तर घरातली छोटी-मोठी कामं करून त्या वस्तूचे पैसे मिळवतात.

त्यातला एक छोटा मुलगा आपल्याला हव्या असणाऱ्या बुटांसाठी आपल्याच घराचं कंपाऊंड रंगवण्याचं काम स्वीकारतो.

त्याच्या वयाच्या मानानं हे काम त्याच्यासाठी अवघड ठरतं. तरीही वडिलांच्या धाकामुळे त्याला कोणीही मदत करत नाही.

मात्र हे अवघड काम पूर्ण झाल्यानंतर मिळालेले बूट त्या छोटुकल्याला आयुष्याचा धडा आणि खूप सारा आनंद दोन्ही मिळवून देतात.

यावरून हेच लक्षात घ्या की “मला आयुष्यात कुठलीच गोष्ट वेळेवर मिळाली नाही”, म्हणून मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट लगेच हजर करणं, हा त्यांचा हक्कच आहे असं मानणं ही पालकांची मोठी चूक आहे.

4) राग

नाकावरच्या रागाला औषध काय?
गालावरच्या फुग्यांचा म्हणणं तरी काय

हे बालगीत म्हणून ठीक आहे, पण एखादी गोष्ट नाकारल्यानंतर तुमचं मूल चिडतं का?

हात पाय झाडून रडतं का?

अगदी लहान वयापासून या चिडण्यावर प्रतिबंध घातला पाहिजे.

नकारामुळे मुलांचं मन दुखावलं जातं, त्यांना राग येतो.

मग एखादा खेळासाठी आपल्या वयाच्या मुलांशी मारामारी करणं, ढकलणं, किंवा मनाविरुद्ध झालं तर जमिनीवरून पडून रडणं अशा गोष्टी दोन ते पाच वर्षांपर्यंतची मुलं करायला शिकतात.

याच वयात अशा वागण्यामुळे त्यांना कुठं कसं लागू शकतं आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो हे समजवा.

एका बाजूला शांत बसवून त्यांचा राग निघून जायला त्यांना मदत करा.

एकदा का त्यांचा राग शांत झाला की त्यांच्या मनाविरुद्ध घडलेली गोष्ट सोडून देऊन दुसर्‍या चांगल्या गोष्टीकडे मन कसं वळवायचं हे त्यांना शिकवा.

राग त्यांच्यासाठी घातक आहे हे त्यांना आवर्जून शिकवाच, पण त्यातून बाहेर पडायला, भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवणं हे सुद्धा पालकांचे कर्तव्य आहे.

5) दादागिरी

अगदी लहान मुलांना नर्सरीत पाठवताना पालकांना काळजी असते आपल्या मुलीवर किंवा मुलावर कोणी दादागिरी तर करणार नाही ना?

दुसऱ्या मुलांनी आक्रमण करत खाऊ खेळणी हिसकावून घेतली तर काय करायचं?

त्यासाठी घाबरू नकोस, रडु नको टीचरना नाव सांग अशा असंख्य गोष्टी पालक शिकवत असतात.

पण समजा तुमचा मुलगाच जर दुस-यांवरती दादागिरी करत असेल तर काय करायचं?

तर मात्र लगेच आपल्या मुलांना व्यवस्थित समजावून सांगायचं!!

दुसऱ्या मुलांशी आपल्या मुलाचं आक्रस्ताळी वागणं असेल, तर मुलाला समज द्या की त्याचं हे वागणं अतिशय चुकीचं आहे, अशा वागण्याला पालकांकडून कधीही पाठिंबा मिळणार नाही.

ज्याला तू मारतो आहे त्याला तर दुखापत होईलच पण तुझी प्रतिमा बॅड बॉय किंवा गर्लची होईल हे त्यांना समजेल अशा भाषेत सांगा.

5) खोटं बोलणं

लहान मुलं खरंच निरागस असतात. त्यांची कल्पनाशक्ती अफाट असते.

त्यामुळे सुरुवातीला मुलांच्या बोलण्यात त्यांच्या कल्पना मांडलेल्या असतात.

लहान मुलांना कल्पना आणि वास्तव यांचे भान नसतं. त्यांचं जग स्वप्नासारखं असतं.

जसजशी मुलं मोठी होतात तसंतसं या कल्पना आपोआप बाजूला पडतात.

मात्र काही मुलांना खोटं बोलण्याची सवय लागू शकते. ही बाब लक्षात आल्यानंतर आधी त्यामागचं कारण शोधा.

काही वेळेला मुलं भीतीपोटी खोटे बोलत असतात काही वेळेला हा सवयीचा भाग असतो किंवा त्यामागे आणखीनही काही कारण असू शकतात.

अशा मुलांशी प्रेमानं बोला, खोटं बोलून मैत्री टिकत नाही हे त्यांना सांगा.

खोटं बोलणं हे त्यांना आयुष्यात कधीही महागातच पडू शकतं हे त्यांच्या मनावर बिंबवा.

6) फसवणूक

मुलं जेंव्हा ग्रुपमध्ये एकत्र खेळत असतात तेंव्हा जिंकण्यासाठी हलकीशी चिटिंग करतात.

मोठ्या मुलांचं नकळत अनुकरण लहान मुलांनी केलेलं असतं

त्यात एकदा यश मिळालं की दरवेळेला जिंकण्यासाठी मुलं काहीही करू शकतात.

हळूहळू फसवणुकीचा त्यांचा स्वभाव तयार होऊ शकतो.

पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की आयुष्यातल्या उत्तम तत्त्वांची त्यांना ओळख करून दिली पाहिजे.

छोटीशी का होईना पण फसवणूक करून मिळवलेले यश हे चुकीचं आहे.

स्पर्धा निकोप असली पाहिजे.

हार खुल्या मनानं स्वीकारायला हवी आणि जिंकण्यासाठी तयारी केली पाहिजे.

उत्तम प्रँक्टिस करून आपण जिंकू शकतो हे मुलांना पालकांनीच सांगायला हवं

7) चांगुलपणा मुलांना स्वतःला निवडू द्या.

चुकीचं वागणाऱ्या मुलांना हाताळताना पालकांनी अतिशय संयम बाळगला पाहिजे.

लहान असतांनाच त्यातले दोष एक एक करून हळुवारपणे बाजूला केले पाहिजेत.

जसजशी मुलं मोठी होतात तसतसा त्यांचा स्वभाव बदलणे अतिशय अवघड होतं.

समाजात वावरताना पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी समजावून दिल्या पाहिजेत.

आपल्या मुलांनी चांगलंच वागावं, चांगल्याच गोष्टी निवडाव्यात असा अट्टाहास न करता चांगल्या गोष्टी मुलांनी स्वतःहून निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना द्यावं.

कुठल्याही गोष्टीची सक्ती न करता मुलांना फुलू द्यावं.

माणुसकी , आदर आणि प्रेम या भावना त्यांनी मनापासून स्वीकाराव्यात.

पालकांनी सर्व गोष्टींच्या चांगल्या आणि वाईट बाजू मुलांना दाखवून त्यांच्यासमोर निवड करण्याचं स्वातंत्र्य ठेवावं.

आपल्या मुलांचं संतुलित परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी,त्यांची चुकीची वागणूक सुधारण्यासाठी पालकांनी मुलांना मनापासून लवकरात लवकर मदत करावी.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय