‘पॅशन फ्रुट’ आरोग्यासाठी आणि व्यवसायासाठी फायदेशीर!!!
तुम्हांला माहिती आहेत का याचे फायदे?
‘पॅशन फ्रुट’ या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब आणि मूत्राशय या सारख्या विकारांसाठी हे उपयोगी ठरतं.
या फळाचा वापर ज्यूस, कॉकटेल, सिरप, स्वश जॅम्स् आणि जेली तयार करण्यासाठी होतो.
यात फॉस्फरस, प्रोटिन, आयर्न, सोडियम, तसेच व्हिटॅमिन ए, बी सी.चा समावेश असतो.
महाराष्ट्रात तुलनेने याची कमी माहिती आहे. मात्र दक्षिणी प्रदेशात या फळाचा घराघरात, आवडीने वेगवेगळ्या स्वरूपात वापर केला जातो.
व्यावसायिक दृष्टीने विचार केला तर याची लागवड बरीच फायदेशीर ठरते.
‘पॅशन फ्रुट’ हे फळ वेलीला येत असल्याने जागाही कमी लागते . गच्चीवरही ही वेल लावता येते.
जुलै ऑगस्ट महिन्यात या वेलीला फुलं येतात,
खूप सुंदर दिसणारं हे फूल आपल्याकडे कृष्णकमळ म्हणून ओळखलं जातं.
कृष्णकमळाची बरीच फुलं आपण पाहिलेली असतात. पण कधी फळ पाहिलं आहे?
कृष्ण कमळ किंवा पॅशन फ्रुट लावणा-या अनेक जणांची हीच तक्रार असते की या वेलीला कधीच फळं येत नाही.
पॅशन फ्रुटचं उत्पादन घेण्यासाठी उत्तम नियोजन आणि योग्य जातींची निवड करायला हवी.
तर मित्रांनो या पॅशन फ्रुटचं भरघोस उत्पन्न कसं घ्यायचं याची आज थोडक्यात माहिती घेऊया.
1) वेळेचं नियोजन
ऑगस्ट महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पॅशन फ्रुट लागवडीसाठी उत्तम काळ असतो.
या काळात जर पॅशन फ्रुटची लागवड केलीत तर येणारा वसंत फुलांचा बहर घेऊनच तुमच्या अंगणात विसावेल.
हा काळ प्रदीर्घ वाटेल पण इतका काळ धीर धरला त्याचं सार्थक या फुललेल्या असंख्य फुलांना बघून होतं.
2) जागेचं नियोजन
खुल्या जागेत पॅशन फ्रुटची लाडवड करणं उत्तम.
तुम्ही मोठ्या कुंड्यातूनही पॅशन फ्रुट लावू शकता.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कमीत कमी 6 ते 8 तासांचा थेट सुर्यप्रकाश पॅशन फ्रुटला मिळाला पाहिजे.
टेरेस गार्डनमध्ये पॅशन फ्रुट लावणार असाल तर कॉर्नरला त्याची जागा निश्चित करा.
कमानीवर वेल सोडून तुम्ही त्याचा डेकोरेशन साठी ही वापर करू शकता.
3) बीज प्रक्रिया
बाजारात मिळणारे पॅशन फ्रुट घेऊन हलक्या हाताने त्यातला रस काढून टाका.
उरलेला भाग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.आता जो भाग तुमच्या हातात उरला आहे तेच या पॅशन फ्रुटचं बीज आहे.
4) रोपांची लागवड
एका कुंडीत बीज अंकुरल्यानंतर पॅशन फ्रुटचं रोप तुम्ही ठरवून ठेवलेल्या जागेत लावा.
यासाठी आधी माती मोकळी करून घ्या.
त्यामध्ये एक छोटासा खड्डा करा , त्यात पाल्यापाचोळ्यापासून तयार झालेलं कंपोस्ट खत, शेणखत, कडुनिंब पावडर टाकून हलक्या हाताने रोप लावून घ्या.
कुंडीत रोप लावताना त्यात स्टँडर्ड पॉंटिंग मिक्स घालून रोपं लावा. कोकोपीठ, कंपोस्ट घाला.
6) पुर्नलागवड
१० दिवसांत पॅशन फ्रुटची रोपं तरारून येतात.
एकदा का पानांनी रोपं भरून गेली की त्यातली सुदृढ रोप बाजूला काढून स्वतंत्रपणे लावा.
यानंतर या वेलींची फार काळजी घेण्याची गरज नसते.
पॅशन फ्रुट पिकवण्यासाठी खूप कमी मेहनत लागते. त्या मानाने उत्पन्न जास्त मिळवु शकता.
पॅशन फ्रुटच्या व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न घेऊन यशस्वीपणे व्यवसाय कसा करता येईल, याची माहिती पुढील लेखात घेऊ.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.