मुंबईच्या ‘या’ उद्योगानं सोसायट्यांना वीज बिल ९५% कमी करायला मदत केली

सौर उर्जेच्या या उपक्रमात गुंतवलेली किंमत साधारणपणे पुढच्या ४ ते ५ वर्षांत वसूल केली जाते.

सौर उर्जा पँनेलचं आयुष्य २५ वर्षे आहे, त्यामुळे तुम्हाला २० वर्षे मोफत वीज मिळते

मुंबईतील समीर जहागीरदार यांचं वर्षातल्या काही महिन्यांचे वीज बिल शून्य असतं.

सौरऊर्जेवर चालणाऱ्या विजेचा पर्याय स्वीकारुन ते समाधानी आहेत.

विशेष म्हणजे, जवळपास तीन वर्षे सौरऊर्जेच्या या निर्णयावर विचार केला.

सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारून जवळपास दोन वर्षे झाली आहेत, समीरला आता वाटतं की हा निर्णय या आधीच घ्यायला हवा होता.

त्यांची एकमजली बिल्डिंग आहे आणि त्यांना वाटायचं की सौर ऊर्जा महाग आहे कारण त्यासाठी बॅटरीची आवश्यकता असते शिवाय देखभालीचा खर्चही येतो.

पण, ट्रूसन स्टार्टअपशी सल्लामसलत केल्यानंतर जेंव्हा त्यांची खात्री पटली तेंव्हा हा पर्याय त्यांनी आनंदानं स्वीकारला.

सोसायटीच्या सदस्यांनी फेब्रुवारी २०१९ च्या आसपास 11KW पायाभूत सुविधा बसवल्या.

त्यावेळी एप्रिल आणि मे महिन्याची बिले अगदी शून्यावर आली.

वीज बिलात लक्षणीय घट झाली, आणि ग्रीड विजेवर कमीत कमी अवलंबून रहावं लागल्याचं सोसायटीचे सचिव या नात्यानेही समीर यांनी स्पष्ट केलं.

समीर म्हणाले की ट्रूसनचा सल्ला घेतल्याने त्यांना अनावश्यक वीज वापर समजला आणि तो कमी करायला मदत झाली.

समीरसारख्या अनेकांनी सौरउर्जेच्या पर्याय निवडला आणि ते ट्रूसन सारख्या स्टार्टअप्सना धन्यवाद देत आहेत.

मुंबईस्थित स्टार्टअप Truesun मुंबईतल्या रहिवाशांना आणि व्यावसायिक संस्थांना त्यांचे प्रचंड वीज बिल जवळपास १०० % कमी करायला मदत करतं.

नीतू गोयल यांनी २०१८ मध्ये Truesun ची स्थापना केली.

खरंतर २००६ पासून त्या सौरऊर्जा क्षेत्रात काम करत आहेत.

पृथ्वीवरील बदल आणि सकारात्मक परिणाम पाहण्याचा त्यांचा निश्चय आहे.

सौरचूल, दिवे आणि इतर गोष्टी सुलभ करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या समुदायांसोबत काम केल्यामुळे त्यांना पर्यावरणाचा समतोल आणि आर्थिक व्यवहार्यता समजून घ्यायला मदत झाली

कोणत्याही व्यक्तीला सौरऊर्जा घेण्यासाठी पटवून देण्याची मुख्य बाब म्हणजे जागरूकता. आणि हा या क्षेत्रातला सर्वात आव्हानात्मक भाग आहे, असं नितू गोयल यांचं म्हणणं आहे.

आता परिस्थिती थोडी सुधारली आहे, जागरूकता आली आहे.

तरी बरेच समज गैरसमज आहेत.

रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि इतर इलेक्ट्रिकल उपकरणं जसे की लिफ्ट, वॉटर पंप, सौरऊर्जेचवर चालू शकतात की नाही याबाबत लोक साशंक आहेत.

म्हणूनच या सौरऊर्जेविषयी सविस्तर माहिती देऊन त्याविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो मगंच प्रकल्प उभा राहतो.

तुम्ही सौरऊर्जेचा किती वापर करू शकता हे ठरवणारे दोन मुख्य घटक आहेत. जागा, जी सहसा मोठं छप्पर असते आणि उर्जेचा वापर किंवा बिल.

सौरऊर्जेचं गणित स्पष्ट करताना तज्ञ सांगतात २०,००० रुपये वीज बिल म्हणजे मीटरमध्ये २.००० युनिट्स.

इतक्या उर्जेसाठी २,००० चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेल्या २० KWatt प्रणालीची आवश्यकता असते.

पण समजा तुमच्या कडे १, ००० स्क्वेअर फूट जागा उपलब्ध असेल तर तुम्ही सौरऊर्जा ५०% तरी नक्कीच वापरू शकता.,

त्यावेळी वीज बिलाची रक्कम एक लाख रुपये असेल, तर बिले २०,००० रुपयांपर्यंत खाली येतील.

त्यामुळे किती जागेचा वापर होऊ शकतो त्यावर आणि त्यावर निर्माण होणारी वीज यावर वीजबिल किती येईल हे अवलंबून असतं.

सुमारे एक KWatt सौर सेल दरमहा १२० युनिट्स निर्माण करतो आणि सुमारे १०० चौरस फूट जागा आवश्यक आहे.

छतावर फक्त सोलर पॅनेल लावणे आवश्यक आहे.

सोलर पॅनल एका इन्व्हर्टरला वायर्ड केले जातात जे डायरेक्ट करंट (DC) वरून अल्टरनेट करंट (AC) मध्ये रूपांतरित करतात.

त्यानंतर इन्व्हर्टर नेट मीटरशी सिंक्रोनाइझ केलं जाते जे सौर पॅनेलमधून वीज घेण्यासाठी आणि आवश्यक असल्यास उर्वरित ग्रीडमधून खेचण्यासाठी प्रोग्राम केलेलं असतं.

सरासरी १० किलोवॅटच्या प्रकल्पाच्या निर्मितीचा खर्च १२ ते १५ लाख रुपयांच्या दरम्यान असतो.

आर्थिक पैलू हे ग्राहकांच्या पसंतीच्या पॅनेल आणि उपकरणांच्या गुणवत्तेवर ही अवलंबून असतात.

ग्राहकांच्या मागणीनुसार आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातून उपकरणं खरेदी केली जातात.

एव्हढी मोठी गुंतवणुक केल्यावर परताव्याच्या खर्चाबद्दल बोलताना, नितू गोयल यांनी स्पष्ट केलं की “यात गुंतवलेली किंमत साधारणपणे पुढील चार ते पाच वर्षांत वसूल होते.”

शिवाय बिल्डिंग व्यावसायिक आहे की निवासी आहे यावर ही बरंच काही अवलंबून आहे.

व्यावसायिकांना ३ वर्षे लागू शकतात तर निवासी संस्थांना ४/५ वर्षात किंमत वसूल होईल.

या सौर पँनेलचं आयुष्य २५ वर्षे आहे म्हणजे पुढची साधारण २० वर्षे तरी वीज मोफत मिळेल.

गुंतवलेली किंमत तर तुम्हाला परत मिळतेच पण पर्यावरणासाठी तुम्ही मोठं योगदान देऊ शकता.

१० KW सोलर रूफटॉपचे पर्यावरणावर होणारे परिणाम खूप मोठे आणि चांगले आहेत.

हा सेटअप कार्बन डाय ऑक्साईडचं उत्सर्जन ३१० टनांपर्यंत कमी करू शकतो जे आयुष्यभर ४९० सागवान झाडे लावण्याइतकं आहे.

अनेक निवासी सोसायट्या खुल्या छताच्या जागेवर तडजोड करण्यास कचरतात.

पण नितू गोयल त्यांना आश्वासन देतात की सुपरस्ट्रक्चर्स ने बसवलेल्या सोलर पॅनलची उंची वाढवली तर वावरण्यासाठी मोकळी जागा मिळू शकते.

हवामानात बदल झाला तरी दररोज वीज निर्माण होते, असंही नितू यांनी स्पष्ट केलं.

गेल्या दोन वर्षांत, नितू गोयल यांच्या या कंपनीने निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांसारख्या विविध क्षेत्रांना सेवा दिली आहे.

मुंबईतील आणखी एक रहिवासी मनोहर मिरकर, सांगतात की, ‘त्यांनी १०० किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याची योजना आखली आहे ज्यामुळे वीज बिल ८०-९०% ने कमी व्हायला मदत होईल.’

मुंबईतील नालासोपारा भागातील एका सोसायटीनेही वीज बिल ४५,००० रुपयांवरून १,५०० रुपयांपर्यंत कमी झाल्याचं सांगितलं.

मनीषा शर्मा, TS विंडपॉवर डेव्हलपर्सच्या सहाय्यक व्यवस्थापक, एक अक्षय ऊर्जा संस्था, काय साध्य करू शकते याबद्दल सांगताना म्हणतात, ‘की सौर उर्जेचा वापर करण्याची क्षमता अफाट आहे, आणि तंत्रज्ञान पूर्णपणे या उर्जेच्या स्त्रोतावर अवलंबून राहू शकतं.

त्यासाठी आवश्यक मोठ्या पायाभूत सुविधांचा तेव्हढा खर्च येतो.

पण अशा पायाभूत सुविधा लोकांना जीवाश्म इंधन उर्जेवर अवलंबून राहण्यापासून दूर रहायला मदत करू शकतात.

मात्र त्यासाठी सुरुवातीचा खर्च आणि वेळेनुसार येणारा कमी देखभालीचा खर्चही सहन करायला हवा.’

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय