सुकन्या समृद्धी योजना: तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या तरतुदीसाठी उत्तम गुंतवणूक योजना

तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला ६५ लाख रुपये जमा करायचे आहेत का? तसे असेल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे.

जाणून घ्या अशी कोणती योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक केली असता ६५ लाख रुपये जमा होऊ शकतात.

हल्लीच्या काळात अपत्यांमध्ये मुलगा/ मुलगी असा भेद सहसा केला जात नाही. हल्लीचे सजग पालक मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा तितकीच आर्थिक तरतूद करतात जितकी मुलांच्या शिक्षणासाठी.

त्याशिवाय मुलगा असो किंवा मुलगी हल्ली त्यांच्या लग्नासाठी येणाऱ्या खर्चात सुद्धा खूपच वाढ झाली आहे.

त्यामुळे अपत्याच्या जन्मापासूनच पालक त्याच्या भविष्यासाठी तरतूद करू लागतात. तसेही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करू तितका जास्त उत्तम परतावा त्या गुंतवणुकीवर मिळू शकतो.

आपले सरकार सुद्धा ह्या बाबतीत मुलींच्या पालकांना सर्वतोपरी मदत करत आहे. मुलीच्या जन्माचे ओझे न वाटता उलट आनंद वाटावा अशी मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी पालकांना चांगला परतावा देणारी गुंतवणूक योजना भारत सरकारने आणली आहे.

अगदी लहान रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत गुंतवणूक शक्य असणाऱ्या ह्या योजनेत सध्या सर्वाधिक व्याजदर मिळतो आहे.

अशा या केवळ मुलींसाठी बनल्या गेलेल्या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना.

आपल्याला मुलगी झाली याचे दुःख किंवा ओझे न वाटता पालक या योजनेत गुंतवणूक करून आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करू शकतील अशी ही योजना आहे.

नेमकी कशी सुरू करता येते ही योजना? काय आहेत ह्या योजनेचे नियम?

आज आपण ह्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये मुलींसाठी अगदी लहान रकमेपासून गुंतवणूक करता येते.

ही योजना केंद्र सरकारने ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ ‘ ह्या स्कीमद्वारे लॉंच केली आहे. छोट्या रकेमच्या गुंतवणूक योजनांपैकी सुकन्या समृद्धी योजना ही सर्वाधिक व्याजदर देणारी योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचे अकाऊंट कसे उघडावे?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते ती १० वर्षांची होईपर्यंत तिच्या नावाने अकाऊंट उघडता येते. हे अकाऊंट कोणत्याही राष्ट्रीय अथवा खाजगी बँकेत तसेच पोस्ट ऑफिस येथे उघडता येते.

हे अकाऊंट मुलीच्या नावाने उघडले जाते आणि त्याचा locking period मुलीच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत असतो. तसेच मुलीच्या वयाच्या २१ व्या वर्षी हे अकाऊंट mature होते.

सुकन्या समृद्धी योजनेद्वारा कमीतकमी २५० रुपये इतकी छोटी रक्कम गुंतवून अकाऊंट उघडता येते. या योजनेद्वारे गुंतवणूक करण्याची जास्तीत जास्त रक्कम दर वर्षी रुपये १.५ लाख इतकी आहे. म्हणजेच कमीतकमी २५० रुपयांपासून ते जास्तीतजास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक ह्या अकाऊंटमध्ये करता येते.

सध्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर ७.६% ह्या दराने व्याज दिले जाते. प्रत्येक तिमाही मध्ये भारत सरकारकडून हा व्याजदर बदलला जाऊ शकतो. सध्याच्या अशा प्रकारच्या गुंतवणूक योजनांपैकी हा व्याजदर सर्वात जास्त आहे.

सदर योजनेत मुलीच्या वयाच्या २१ वर्षापर्यंत पैसे गुंतवता येतात. त्यानंतर ते पैसे मुलीच्या नावावर ट्रान्सफर होतात.

त्याचप्रमाणे मुलीच्या वयाच्या १८ वर्षापासून हे पैसे तिच्या शिक्षण अथवा लग्नासाठी आवश्यकतेनुसार काढता येऊ शकतात. याचाच अर्थ मुलीच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या प्रत्येक आर्थिक गरजेच्यावेळी हे पैसे उपलब्ध होऊ शकतात.

कोणताही भारतीय नागरिक आपल्या किमान २ मुलींसाठी ह्या योजनेत गुंतवणूक करू शकतो. सदर योजनेत २ पेक्षा जास्त मुलींसाठी गुंतवणूक करण्यास परवानगी नाही.

सुकन्या समृद्धी योजनेत नेमकी कशा प्रकारे गुंतवणूक केली असता मोठी रक्कम उभी राहू शकते?

जर एखाद्या व्यक्तीने ह्या योजनेमध्ये दररोज फक्त १०० रुपये म्हणजेच दरमहा रु.३०००/- इतकी गुंतवणूक केली तर १४ वर्षांनी ७.६ % प्रतिवार्षिक ह्या व्याजदराने सदर व्यक्तीस रु. ९,११,५७४ मिळू शकतात. तसेच मुलीच्या वयाच्या २१ वर्षांपर्यंत ही रक्कम जवळजवळ रु. १५ लाख इतकी होऊ शकते.

ह्या स्कीममध्ये साधारण ९ वर्षात गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊ शकते. ह्या योजनेनुसार जर एखाद्या व्यक्तीने दररोज सुमारे ५०० रुपये गुंतवले तर मुदतीअखेर सदर व्यक्ती आपल्या मुलीसाठी ६५ लाख रुपये इतकी मोठी रक्कम जमा करू शकतो.

तर मित्रांनो, अशी ही सर्व अर्थाने सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारी सुकन्या समृद्धी योजना.

आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत तिच्या नावाने ह्या उत्तम परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करून करा आणि तिचे भविष्य सुरक्षित करा. ह्या बाबतीतले तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.

ह्या योजनेची माहिती आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह सर्वांना समजावी म्हणून हा लेख नक्की शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय