सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले चणे फुटाणे खाण्याचे फायदे

भाजलेले चणे किंवा फुटाणे हा अगदी सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे.

सर्वसामान्यांना सहज परवडेल अशा किमतीला भाजलेले चणे किंवा फुटाणे उपलब्ध असतात.

परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की हे भाजलेले फुटाणे जर सकाळी उठून रिकाम्यापोटी खाल्ले तर त्याचे आरोग्याला खूप फायदे होतात.

सकाळी उपाशी पोटी फुटाणे खाण्याचे नेमके फायदे कोणते हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

भाजलेले फुटाणे नियमितपणे आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक त्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स, कॅल्शियम, आयर्न आणि विटामिन्स मिळतात.

बाजारात कमी किमतीला सहज उपलब्ध असणारा हा पदार्थ आपल्या इतक्या फायद्याचा आहे हे आजवर आपल्या कधी लक्षातच आले नव्हते.

चला तर मग जाणून घेऊयात फुटाणे खाण्याचे फायदे

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्यापोटी भाजलेले फुटाणे खाल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते.

हवामानात होणाऱ्या बदलांमुळे (सीजनल चेंजेस) होणारे आजार नियंत्रणात ठेवण्यास ही रोगप्रतिकारकशक्ती मदत करते. फुटाण्यांमध्ये असणाऱ्या पोषक पदार्थांमुळे शरीराची वेगवेगळ्या विषाणूंचा हल्ला परतवून लावण्याची क्षमता वाढते.

त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

२. वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

दररोज सकाळी नियमितपणे एक मूठभर फुटाणे खाल्ल्यास स्थूलता कमी होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. फुटाणे खाल्ल्यामुळे पोट भरपूर वेळ भरलेले राहते आणि आपोआप इतर गोष्टी कमी प्रमाणात खाल्ल्या जातात.

वजन कमी करायचे असेल तर आहारतज्ञ फुटाणे खाण्याचा सल्ला देतात.

३. बद्धकोष्ठता कमी होते.

बद्धकोष्टता असणाऱ्या म्हणजेच कोठा जड असणाऱ्या लोकांसाठी सकाळी रिकाम्या पोटी मुठभर चणे खाणे औषधासारखे उपयोगी पडते.

फुटाणे खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होऊन कॉन्स्टिपेशन कमी होते.

४. शरीराची पचनशक्ती वाढते.

शरीराची पचनशक्ती नैसर्गिकरीत्या वाढवण्यासाठी रिकाम्यापोटी फुटाणे खाण्याचा फायदा होताना दिसतो. फुटाणे पचवण्यासाठी नैसर्गिक रित्या शरीराची पचनशक्ती वाढते आणि त्यामुळे इतरही अन्नाचे पचन योग्यप्रकारे होते.

म्हणूनच आहार तज्ञ सकाळी नाश्ता करताना अथवा दुपारी चार वाजताच्या खाण्यासाठी फुटाणे खाण्याचा सल्ला देतात.

५. रक्ताचे शुद्धीकरण होते.

दररोज रिकाम्यापोटी फुटाणे खाल्ल्यामुळे शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर काढून टाकण्यास खूप मदत होते. असे टॉक्सिन्स बाहेर टाकले गेल्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते तसेच त्वचेचा पोत आणि आरोग्य सुधारते.

६. पुरुषांसाठी विशेष गुणकारी

भाजलेले फुटाणे खाणे पुरुषांसाठी विशेष गुणकारी आहे असे आढळून आले आहे. फुटाणे नियमित स्वरूपात खाल्ल्यास त्याचा स्पर्म काउंट वाढण्यासाठी उपयोग होतो.

त्याच प्रमाणे पुरुषांमध्ये आढळून येणाऱ्या लैंगिक समस्या दूर करण्यासाठी आहारात फुटाण्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

तर हे आहेत साध्याशा दिसणाऱ्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या फुटाण्याचे आरोग्याला होणारे फायदे.

तर मित्र मैत्रिणींनो, आपणही आपल्या आहारात नियमितपणे फुटाण्याचा समावेश करूया आणि आरोग्याला होणाऱ्या या फायद्यांचा लाभ घेऊया.

तुमचे या बाबतीतले अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले चणे फुटाणे खाण्याचे फायदे”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय