पावसाळ्यात ‘कुठं-कुठं जायाचं फिरायला?’ वाचा या लेखात (भाग:१)

मित्रांनो काही लोक इतके रसिक असतात, की ते जीवनाचा जसा भरभरून उपभोग घेतात तसंच निसर्गाचा ही उत्तम आस्वाद घेतात.

मृदगंधाने भरलेल्या ओलसर वाऱ्यात भटकतात पावसाच्या थेंबांच्या तालावर, पाय थिरकवतात आणि जंगलामध्ये हरवून जातात!

मsssस्त पावसाळ्यासाठी पश्चिम घाट तुमच्या बकेट लिस्टमध्ये असेल, तर महाराष्ट्रातल्या पावसाळ्यात भेट देण्याच्या काही अप्रतिम जागा आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

या जागा प्राचीन किल्ले, विस्तीर्ण हिरवीगार झाडं आणि अनवट पायवाटांसह अनुभवण्याच्या आहेत.

खराखुरा निसर्ग अनुभवायचा तर पावसाळा हाच सर्वोत्तम काळ आहे, कारण हीच ती वेळ असतं जेंव्हा निसर्ग बहरलेला असतो ताजातवाना असतो, फुललेला असतो, मोहक दिसतो.

महाराष्ट्रात तर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे.

मग या पावसाळ्यात कुठं जायचं ते ठरवण्यासाठी हा लेख नक्की वाचा !

१) भीमाशंकर

सह्याद्रीतलं एक लोभस ठिकाण म्हणजे भीमाशंकर. सह्याद्रीच्या डोंगररांगांचा हा घाट प्रदेश.

पावसाळ्याच्या आगमनाने फुलून आलेली हिरव्या रंगाची एक सुंदर छटा इथं पहायला मिळते.

भीमाशंकरचं नाव काढलं की तिथली अफाट जैवविविधता आठवते, आणि ही जैवविविधता नक्कीच विलोभनीय आहे.

विस्तीर्ण दऱ्यांच्या मधोमध पसरलेलं हे अरण्य तुम्हांला आश्चर्याचे आणि आनंदाचे धक्के देईल.

मित्रांमंडळीसह जा किंवा कुटुंबासह सहल आयोजित करा, पण भीमाशंकरचं सौंदर्य पावसाळ्यात पहायला विसरू नका.

सह्याद्रीचं वन्यजीव अभयारण्य आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं मंदिर सुद्धा इथं पहाता येईल.

पावसाळ्यात भीमाशंकर अभयारण्यातील विपुल वनस्पती आणि प्राणी ताजेतवाने होतात आणि दुर्मिळ प्राण्यांच्या जाती पहायला मिळतात.

जर तुम्ही पावसाळ्यात पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास असाल तर हे ठिकाण अजिबात चुकवू नका.

पावसाळा आणि निसर्ग अनुभवण्यासाठी भीमाशंकर हे महाराष्ट्रातलं एक सर्वोत्तम पावसाळी ठिकाण आहे.

मुंबई ते भीमाशंकर अंतर:२२० किमी

वेळ : ५ तास

पुणे ते भीमाशंकर अंतर :११० किमी

वेळः ३ तास

महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून रस्त्याने तुम्ही भीमाशंकरला जाऊ शकता.

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुण्यातलं शिवाजी नगर स्टेशन आहे.

२) भंडारदरा, (अहमदनगर)

हे मुंबई आणि पुण्यापासून वीकेंड अनुभवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

भंडारदरा हे धबधबे, तलाव आणि विस्तीर्ण हिरवाईने नटलेले पश्चिम घाटातील एक ऑफबीट हिल-स्टेशन आहे.

भंडारदरा पावसाळ्यात भेट देण्याच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे.

जेव्हा निसर्ग आपला वैभवशाली संभार घेऊन डोलतो तेंव्हा पावसामुळे या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्यात अजूनच भर पडते.

२००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या भंडारद-याला गृपसह कॅम्पिंग करता येतं.

या ठिकाणी सुंदर कॅम्पसाइट्स देखील आहेत!

मुंबई ते भंडारदरा हे अंतर : १६४ किमी

वेळ ३.५ तास

पुणे ते भंडारदरा अंतर : १७२ किमी

वेळः ४.५ तास

भंडारदारापासून ७० किमी अंतरावर नाशिक हे सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे.

३) माळशेज घाट

पावसाळ्यात जाण्यासाठी निसर्ग प्रेमींचं आवडतं ठिकाण माळशेज घाट.

पावसाळ्यात महाराष्ट्रात भेट देण्याच्या महत्त्वाच्या १० ठिकाणांमध्ये माळशेज घाटाचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.

नयनरम्य पायवाटा आणि पावसाळ्यात उत्तम प्रकारे फुलणाऱ्या तुतीच्या बागांसाठी ओळखला जाणारा, माळशेज घाट हे साहसी पर्यटकांचं लाडकं ठिकाण आहे.

आजोबा टेकडी हा किल्ला साहसी लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण ठरलंय, त्याचबरोबर नारकोबा शिखर, जीवधन चावंड किल्ला आणि नाणे घाट या लोकप्रिय अवघड पायवाटा आहेत, ज्या पर्यटकांना शोधण्याचा साहसाचा अनुभव देतात.

१४०० मीटरवरचा हरिश्चंद्रगड किल्ल्याचा ट्रेक हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

६ व्या शतकातला हा किल्ला प्रवाशांसाठी एक रोमांचक देखावा म्हणून आजही दिमाखात उभा आहे.

माळशेजपासून ४० किमी अंतरावर, छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला आहे.

मुंबई ते माळशेज अंतर:१२७ किमी

वेळः ३ तास १० मिनिटं

पुणे ते माळशेज अंतर:१२० किमी

वेळः 3 तास

महाराष्ट्रातील कोणत्याही गावातून तुम्ही माळशेज घाटात जाण्याचा प्लँन आखू शकता.

रेल्वेनेही माळशेज घाटापर्यंत पोचू शकता.

कल्याण रेल्वे स्टेशन माळशेजपासून जवळपास ८५ किमी अंतरावर आहे.

४) माथेरान

माथेरान म्हणजे हिरव्या वनश्रीने नटलेला निसर्ग!

पावसाळा येतो आणि इथल्या वनश्रीत भरच घालतो.

महाराष्ट्रात पावसाळ्यात भेट देण्यासाठी जी ठिकाणं आहेत त्यापैकी पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण आहे.

माथेरान सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं, इथलं विहंगम दृश्य तुमचं मन मोहून घेईल.

महाराष्ट्रातल्या या सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनला लुईसा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, मंकी पॉइंट, पोर्क्युपिन पॉइंट, इको पॉइंट आणि प्रबल फोर्ट या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्गाचं भन्नाट रंगढंग पहायला मिळतात

काय मग कधी करताय माथेरानचा प्लॅन?

लवकरात लवकर नियोजन करा आणि माथेरानचं सौंदर्य अनुभवा!

मुंबई ते माथेरान अंतर :८० किमी

वेळः २ तास

पुणे ते माथेरानचे अंतर :१२५ किमी

वेळः २.५तास

नेरळ जंक्शन हे माथेरानसाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे.

तुम्ही ट्रेननं माथेरानला जाऊ शकता. जंक्शनपासून, एक टॉय ट्रेन माथेरानपर्यंत धावते, जी २ तासांत जवळपास २१ किमी अंतर कापते.

त्या टॉय ट्रेनचा ही एक वेगळा अनुभव तुम्ही घेऊ शकाल.

५) अलिबाग.

रायगडची किनारपट्टी अनोखं आर्किटेक्चर, प्राचीन समुद्रकिनारे आणि निसर्गसौंदर्य यामुळे पर्यटकांकडून अलिबागची गणना पावसाळ्यात मुंबईजवळ भेट देण्याच्या प्रमुख ठिकाणांमध्ये केली जाते.

कुलाबा किल्ला, उंदेरी किल्ला, आणि मुरुड-जंजिरा हे किल्ले वास्तुकलेसाठी ओळखले जातात.

नागाव बीच, अलिबाग बीच आणि वरसोली बीच हे रम्य किनारे मंत्रमुग्ध करणाऱ्या सूर्यास्तामुळे ओळखले जातात.

अलिबागचा हा नयनरम्य किनारा दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतो.

अलिबागमध्ये करण्यासारख्या अनेक मनोरंजक गोष्टीं आहेत, त्यात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता.

अलिबागमधल्या समुद्रकिनारी प्रदेशात मान्सूनची सर्वाधिक प्रतीक्षा असते.

निळंशार पाणी आणि हिरवीगार हिरवळ यामुळे महाराष्ट्रात भेट देण्याचे आणखी एक रोमांचक ठिकाण बनले आहे.

मुंबई ते अलिबाग अंतर : ९८ किमी

वेळः २ तास ४२ मीटर

पुणे ते अलिबाग अंतर: १४१ किमी

वेळः ३ तास ११मिनिटं

पेण रेल्वे स्टेशन हे अलिबागपासून ३० किमी अंतरावर असलेले सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे .

तिथून तुम्ही मुंबई सेंट्रलला थेट ट्रेन घेऊ शकता.

६) कर्नाळा

रेनफॉरेस्टचा सुंदर देखावा दाखवणारा कर्नाळा किल्ला जमिनीपासून ४५० मीटर वर आहे.

पर्जन्य वन क्षेत्रामध्ये उरलेल्या सर्वात प्राचीन इमारतींपैकी हा एक आहे.

एखाद्या चिंब पावसाळी, अंधुक दिवशी किल्ल्यापर्यंतचा ट्रेक हा अफाट अनुभव असतो.

समुद्रकिनारा आणि समोरच्या सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य हे एक अप्रतिम दृश्य इथं पहायला मिळतं

त्यामुळंच हे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनलं आहे.

पावसाळ्यात किल्ल्याभोवतीचं शेवाळ आणि किल्ल्याभोवतीचे गूढ वातावरण ही एक वेगळी अनुभूती आहे.

इथला प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरतो.

कर्नाळा पक्षी अभयारण्य हे १५० पेक्षा जास्त प्रजातीच्या पक्ष्यांचं घर आहे.

पावसाळ्यात जेंव्हा पक्षी पावसाचा आनंद साजरा करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे खूप आनंददायी ठरतं.

मुंबई ते कर्नाळा अंतर:५० किमी

वेळः १ तास १७ मिनिटं

पुणे ते कर्नाळा अंतर:१२१ किमी

वेळः २ तास ११ मि

पनवेल हे सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे जिथं मुंबई सेंट्रल आणि VT इथून सहज जाता येतं. .

७) कोलाड

तुमची पावसाळी सहल मजेदार आणि साहसी बनवायला तुम्ही उत्सुक आहात का?

मग कोलाड हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण!

महाराष्ट्रातील सुंदर वीकेंड डेस्टिनेशन विस्तीर्ण कॅम्पसाइट्स, परिपूर्ण होमस्टे आणि साहसी उत्साही लोकांसाठी कोलाड एक उत्तम ठिकाण आहे.

इथं तुम्ही व्हाईटवॉटर राफ्टिंग करू शकता.

ट्रेकिंग, झिप लाइनिंग आणि कॅनोइंग या धाडसी गोष्टी ही इथं अनुभवायची संधी मिळते.

कोलाड जवळची काही प्रमुख आकर्षणं म्हणजे कुडा लेणी, ताम्हिणी धबधबा आणि भिरा धरण.

या सगळ्या जागा पावसाळ्यात आवर्जून भेट देण्यासारख्या आहेत.

मुंबई ते कोलाड अंतर :१२२ किमी

वेळः२ तास २२ मीटर

पुणे ते कोलाड अंतर:१४४ किमी

वेळः २ ता ४६ मिनिटं

कोलाड रेल्वे स्टेशन आहेच, आणि डांबरी रस्त्यानं ही इथं सहज पोचता येतं.

८) हरिहरेश्वर

हाऊस ऑफ गॉड, “देवाचं घर” म्हणून प्रसिद्ध असलेलं, हरिहरेश्वर हे पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशातील एक अद्भुत नंदनवन आहे .

पावसाळ्यात भेट देण्यासाठी ते लोकप्रिय ठरलं नसतं तरच नवल ल!

भगवान हरिहरेश्वर, ब्रह्माद्री, पुष्पाद्री आणि हर्षिनाचल या पर्वतांनी वेढलेले, लोकप्रिय समुद्रकिनारा असणारं हरीहरेश्वर.

तिथं राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मते इथे काही जादुई उपचार शक्ती आहेत.

पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.

कारण आजूबाजूचा परिसर नेहमीपेक्षा उजळ आणि सुंदर असतो आणि जवळपासच्या पर्वतांचं निसर्गरम्य दृश्ये इथं पहायला मिळतं.

मुंबई ते हरिहरेश्वर अंतर : २०० किमी

वेळः ४ तास १६ मिनिटं

पुणे ते हरिहरेश्वर अंतर: १७० किमी

वेळः ४ तास २० मिनिटं

माणगाव रेल्वे स्टेशन हे हरिहरेश्वरसाठी सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे जे ५९ किमी अंतरावर आहे .

९) श्रीवर्धन

मनाला मोहून टाकणारी रचना आणि सुंदर समुद्रकिनारा आणि आशीर्वाद लाभलेली भूमी म्हणजे, श्रीवर्धन

पांढर्‍या वाळूचे किनारे, प्रचंड आकाश आणि अस्पर्शित, अस्पष्ट वातावरण यामुळेच श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक ठरतं.

लक्ष्मीनारायण मंदिर, सुंदर समुद्रकिनारे, पेशवे स्मारक आणि दिवेआगर, आणि हरिहरेश्वर यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांना अवश्य भेट द्या.

मुंबई ते श्रीवर्धन अंतर :१८७ किमी

वेळः ४ तास

पुणे ते श्रीवर्धन अंतर:157 किमी

वेळः ४तास १० मिनिटं

३७४ किमी अंतरावर, सावंतवाडी हे श्रीवर्धनसाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे,

१०) लोहगड

लोहगड हे दक्षिण महाराष्ट्रातील एक लोकप्रिय ठिकाण.

पावसाळ्यात भेट द्यायलाच हवी अशा प्रमुख ठिकाणांपैकी एक.

सातवाहनांपासून मुघल आणि मराठ्यांपर्यंत अनेक शतकांपासून राज्यकारभारासाठी हा एक मोक्याचा किल्ला आहे.

मान्सूनने या ठिकाणी आपली जादू पसरवली आहे आणि केवळ किल्ल्याचा परिसरच नाही तर त्याच्या परिसरातील पवना धरण, लोणावळा, कामशेत, खंडाळा आणि कर्जत ही लोहगडाच्या आसपासची आकर्षक ठिकाणं आहेत.

पावसाळ्यात ल़ोहगडला भेट देणं म्हणजे तुमचा वीकेंड सार्थकी लावणं.

मुंबई ते लोहगड अंतर:९९ किमी

वेळः २ तास

पुणे ते लोहगडचे अंतर:६२ किमी

वेळ १ तास ३४ मिनिटं

लोहागडपासून 16 किमी, वर लोणावळा हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

११) इगतपुरी, नाशिक

पावसाचा उत्तम आनंद घेण्याचे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ, इगतपुरी हे पावसाळ्यात जास्त मोहक बनते.

आजूबाजूला भरपूर धबधबा वाहताना तुम्ही पावसाचा एक वेगळा अंदाज अनभवू शकता.

भातसा रिव्हर व्हॅली आणि त्याच मार्गावर असणारी कॅमल व्हॅली ही दोन ठिकाणे इगतपुरीमध्ये पहाता येतील.

कँमल व्हॅलीमधील पाच धबधब्यांचं जादूचे दृश्य आणि वाहून जाणारं पाणी हे पावसाळ्याच्या महिन्यात एक भव्य देखावा बनून समोर येते.

मित्रांनो निसर्गाचा हा भव्य देखावा तुमची वाट पाहत आहे!

मुंबई ते इगतपुरी पर्यंत अंतर:१२० किमी

वेळः२ तास १० मिनिटं

पुणे ते इगतपुरी अंतर : २३८ किमी

वेँळ्ः ४तास ३८ मिनिटं

इगतपुरी इथं रेल्वे स्टेशन आहे.

पावसाळ्यात ‘कुठं-कुठं जायाचं फिरायला?’ वाचा या लेखात (भाग:२)

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय