खीर खा, फिटनेस वाढवा : खिरींचे पौष्टिक आणि स्वादिष्ट असे सात प्रकार रेसिपीसहीत

सणावाराला, पाहुणे आले तर चटकन बनणारा आणि लहानथोरांना आवडणारा प्रकार म्हणजे खीर!!!

भारतीय संस्कृतीत खीर हा पदार्थ अगदी पुराणकाळापासून वर्णन केलेला आहे.

खिरीचे संस्कृत भाषेतील नाव आहे क्षीर, पायस. क्षीर म्हणजे दूध. या शब्दाचा अपभ्रंश होऊन खीर हे नाव निर्माण झाले असावे.

पयस म्हणजे दूध आणि दुधापासून बनवलेले ते पायस. खीर बनवताना मुख्य घटक दूध असल्याने ही नावे दिली गेली असावीत.

खिरीचा संदर्भ रामायणातही आलेला आहे. दशरथ राजाने केलेल्या यज्ञाच्या वेळी ‘यज्ञ पुरूष’ प्रसाद म्हणून पायस घेऊन प्रकटला अशी कथा आपण ऐकलेली आहे.

तर अशी ही आरोग्यदायक, पौष्टिक खीर.

या लेखातून आम्ही खास तुमच्यासाठी रोजच्या पेक्षा हटके आणि पोषणमूल्य भरपूर असणारे असे खीरीचे प्रकार घेऊन आलो आहोत.

पाहूया मधुर, रुचकर अशा खिरींचे सहा प्रकार

1) भोपळ्याची झटपट खीर

लाल भोपळा स्वच्छ धुवून साल आणि बिया काढून टाकाव्यात.

भोपळा किसून घ्यावा. जाड बुडाच्या पातेल्यात तुपावर हा भोपळ्याचा कीस वाफवून घ्यावा.

भोपळा लवकर शिजतो. मग काजू आणि बदाम काप घालून परतून घ्यावे.

नंतर यात तापवलेले दूध घालावे आणि मंद आचेवर सतत ढवळत रहावे. दुधाला उकळी आल्यावर त्यात खडीसाखर घालावी व विरघळेपर्यंत ढवळत रहावे.

वेलची पावडर घालून चांगली उकळी आली की उतरावे. ही खीर अगदी झटपट होते.

भोपळ्यामध्ये फायबर, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, ॲंटीऑक्सीडंट्स असतात. त्यामुळे पचन सुधारते. डोळ्यांना फायदा होतो. प्रतिकारशक्ती वाढते.

2) बदाम खसखस पौष्टिक खीर

प्रथम तवा गरम करून त्यावर खसखस भाजून बदामी रंगावर परतून घ्यावे.

बदाम आणि खसखस हे उष्ण गुणाचे असतात त्यामुळे ते पाण्यात भिजवून घेणे आवश्यक आहे.

बदाम ८,१० आणि दोन चमचे खसखस गरम पाण्यात वेगवेगळे भिजवून ठेवावे. साधारण पाच तास भिजले की बदामाची साल काढून टाकावी. खसखस मधील जास्तीचे पाणी काढून थोड्या पाण्यात बदाम व खसखस मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे. मोठे दोन कप दूध गरम करत ठेवावे.

त्यात चवीनुसार खडीसाखर, वेलची पूड व किसलेले जायफळ घालून दुधाला उकळी येऊ द्यावी. यानंतर वाटलेले मिश्रण मिक्स करून मंद आचेवर सतत हलवत रहावे.

थोडे घट्टसर झाले की उतरावे. ही खीर विशेषतः प्रसूती झालेल्या स्त्रियांसाठी खूपच उपयुक्त आहे.

बदामामधे ओमेगा 3 आणि खसखस हे ओमेगा 6 युक्त आहे त्यामुळे या खिरीने भरपूर पोषण मिळते.

बदाम हाडांना मजबूत बनवतात. खसखस केसांचे आरोग्य सुधारते. शरीराची झीज भरून निघते.

खसखसमुळे झोप छान लागते. वाढीच्या वयातील मुलांना ही खीर जरुर द्यावी.

3) ओट्स वेटलॉस खीर

एका पॅन मध्ये पाव वाटी ओट्स गुलाबी रंगावर भाजून घ्यावे.

चार, पाच खजूर गरम पाण्यात भिजवून बिया काढून टाकाव्यात आणि ते कुस्करून घ्यावे.

यानंतर मंद आचेवर ओट्स मध्ये दोन कप टोण्ड दूध घालावे व उकळी आल्यावर त्यात खजूर, केशर, वेलची पूड घालावी.

सतत ढवळत रहावे. घट्टसर झाले की उतरुन त्यावर बदामाचे काप घालून सजवावे. वेटलॉस डाएट मध्ये तुम्ही ही खीर खाऊ शकता कारण यात साखर किंवा गूळ नाही.

खजूरामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर तसेच ओट्स मध्ये भरपूर फायबर आहे. त्यामुळे डायबिटीस, कोलेस्टेरॉल असलेल्या व्यक्तींनी ही खीर खावी.

ओट्स हे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले संपूर्ण धान्य आहे. हे शरीरातील अनावश्यक फॅटस् दूर करते. ओट्स मुळे खूप वेळ पोट भरलेले रहात असल्याने वारंवार खाण्याची इच्छा होत नाही.

4) बहुगुणी नाचणी खीर

दोन मोठे चमचे भरुन नाचणी स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात सात तास भिजवत ठेवावी. नंतर निथळून घेऊन मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्यावी. पातेल्यात चार कप दूध उकळत ठेवावे.

चांगले उकळल्यावर नाचणी पेस्ट मिक्स करून सतत ढवळत रहावे.

अर्धा तास शिजल्यावर यात चवीनुसार खडीसाखर घालून ती विरघळेपर्यंत ढवळावे.

वेलची पावडर, काजू, बदाम काप घालून थोडावेळ उकळू द्यावे.

नंतर गरम किंवा थंड झाल्यावर खाऊ शकता. नाचणी हा कॅल्शियमचा उत्कृष्ट स्त्रोत आहे.

हाडांना मजबूत बनवते. यात फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ती सर्व ही खीर खाऊ शकतात.

5) औषधी सब्जा खीर

दोन चमचे सब्जा बिया वाटीभर पाण्यात पाच तास भिजवून घ्याव्यात. चार कप दूध उकळत ठेवावे.

नंतर त्यात छोटा दालचिनी तुकडा आणि केशर घालावे. पंधरा, वीस मिनिटे उकळून घ्यावे व नंतर त्यात खडीसाखर घालून ती विरघळू द्यावी. हे दूध थंड करत ठेवावे. सब्जा मधील पाणी गाळणीतून पूर्ण गाळून घ्यावे व थंड झालेल्या दुधात ते मिसळावे. चांगले ढवळून घ्यावे. थंडगार सब्जा खीर तयार!!!

उन्हाळ्यात युरीन इन्फेक्शन, जळजळ, तहानेने घसा कोरडा पडणे, अंगाचा दाह, बद्धकोष्ठता यात ही खीर उपयोगी आहे.

औषधी गुणधर्म असलेली ही खीर अतिशय चवदार लागते. पित्त विकारांवर गुणकारी आहे.

6) मॅजिकल मखाणा खीर

एका कढईत एक वाटी मखाणे थोडे कडक व गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावे.

यात तीन कप दूध घालून मंद आचेवर शिजवावे. वेलची पावडर, केशर व खडीसाखर घालावी.

साखर विरघळेपर्यंत ढवळावे व मनुका, बदाम, काकडी व खरबूजाच्या बिया घालून सजवावे. मखाण्यामधे भरपूर फायबर, कॅल्शियम, ॲंटीऑक्सीडंट्स असतात.

त्यामुळे केस, त्वचा चमकदार होते. पचन सुधारते. दात व हाडे यांचे आरोग्य सुधारते. मखाणे शरीराचा मेटॅबॉलिझम सुधारतात म्हणजे शरीरात फॅट निर्माण होत नाही.

त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही खीर जरुर खावी. काकडी व खरबूजाच्या बिया त्वचा मुलायम ठेवतात.

केस चमकदार होतात. मखाणे पचायला हलके असतात त्यामुळे उपवासाला ही खीर खाल्ली जाते.

कशा वाटल्या तुम्हाला या खिरींच्या स्पेशल रेसिपीज? यात साखरेऐवजी खडीसाखर वापरली आहे.

साखरे ऐवजी खडीसाखर खाणे उपयुक्त का आहे?

कारण ती औषधी गुणयुक्त आहे. तुम्ही नाश्ता, जेवण किंवा कोणत्याही विशेष पार्टी साठी अगदी कमी वेळात यापैकी कोणतीही खीर बनवू शकता.

मग वाट कसली बघताय? चला पटकन बनवा आणि कमेंट करुन सांगा. लाईक व शेअर करा.

पौष्टिक, रुचकर खीर खा आणि सर्वांना प्रेमाने खाऊ घाला.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय