ऑफीसमधील स्ट्रेस आणि दुखणं यावरचा उपाय: ॲक्युपंक्चर

ॲक्युपंक्चर ही चीनमधील पारंपारिक उपचार पद्धती आहे. याचा गम हजारो वर्षांपूर्वी झाला असून या उपचार पद्धतीमागील तत्त्व समजून घेऊया.

आपले शरीर हे चेतना शक्तीवर चालणारी यंत्रणा आहे. या चेतनेच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला की शरीर रोगग्रस्त होते.

आपल्या शरीरावर काही विशिष्ट बिंदू असतात. याठिकाणी चेतनेचे केंद्र एकवटलेले असते.

ॲक्युपंक्चर पद्धतीने उपचार करताना अतिशय पातळ व बारीक अशा सुयांच्या सहाय्याने शरीरावरील या विशिष्ट बिंदूंवर टोचून चेतनेच्या मार्गातील अडसर दूर केला जातो.

यामुळे पुन्हा सुरळीतपणे शरीराचे कार्य सुरु होते. व दुखणे कमी होते.

ॲक्युपंक्चरचे फायदे खालीलप्रमाणे आहेत

  • शरीरातील एनर्जीचे संतुलन राखण्यासाठी या
  • बिघडलेला एनर्जीचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी
  • रोग बरे करण्यासाठी हिलींग म्हणून
  • बॉडी रिलॅक्सेशन

पारंपारिक चिनी वैद्यक शास्त्रानुसार शरीरावर १००० ॲक्युपंक्चरचे बिंदू आहेत.

हे सर्व बिंदू अदृश्य अशा चेतना प्रणाली वर स्थित आहेत. याला ‘मेरीडीयन’ असे म्हणतात.

प्रत्येक एनर्जी चॅनल हा वेगवेगळ्या अवयवांशी संबंधित आहे

ॲक्युपंक्चरचे कार्य कसे चालते?

याबाबत अनेक मान्यता आहेत परंतु निश्चितपणे याचे कार्य कसे चालते हे अद्याप समजलेले नाही.

यापैकी काही मान्यता आपण आता समजून घेऊया.

१. आपल्या शरीरात वेदना कमी करण्यासाठी एंडॉर्फिन्स कार्यरत असतात.

आणि ॲक्युपंक्चरचा परिणाम यांच्यावर होऊन दुखणे कमी होते.

२. शारीरीक क्रीया घडवून आणणाऱ्या स्वायत्त नाडी संस्थेवर (Autonomous Nervous System) ॲक्युपंक्चरचा प्रभाव होतो व त्यामुळे दुखणे दूर होते.

थोडक्यात काय तर या उपचार पद्धतीमुळे तुमची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिक उत्साही राहू शकता.

तसेच जर तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणाचा तुमच्यावर वाईट परिणाम होत असेल तरीही तुम्ही ॲक्युपंक्चरचा लाभ घेऊ शकता. यामुळे तुमचे भावनिक आणि शारीरिक पातळीवर हिलींग होईल.

तुमचा बराचसा वेळ ऑफिस मध्येच जातो त्यामुळे तिथले वातावरण तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे असले पाहिजे. तरच त्या ठिकाणी तुम्ही आनंदी व उत्साही रहाल. आणि परिणामी तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकाल.

इतके विविध प्रकारचे उपयोग असलेल्या या चिकित्सा पद्धतीचे अनेक प्रकार पडतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे

ॲक्युपंक्चर चे प्रकार

१. पारंपारिक चिनी ॲक्युपंक्चर पद्धती

२. ऑरिक्युलर ॲक्युपंक्चर

३. बोल्डर ॲक्युपंक्चर

४. ॲक्युप्रेशर

५. Teishein

ॲक्युपंक्चरचे फायदे

१. स्ट्रेस कमी होतो.

कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा, डेडलाईन, टार्गेट यामुळे ७७% कर्मचारी ताणतणावाखाली असतात.

ॲक्युपंक्चरमुळे ताण, चिंता, अस्वस्थता कमी होते व निवांतपणाचा अनुभव येतो. स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात व मन आनंदी होते.

२. शारीरिक दुखणे कमी होते.

ऑफीसमधे तासंतास एकाच ठिकाणी अवघडून बसल्यामुळे मान, पाठ, कंबर याठिकाणी वेदना किंवा जखडणे असे त्रास उद्भवू शकतात.

त्याचप्रमाणे सतत माऊस आणि कीबोर्ड हाताळणे, सतत मोबाईल हातात धरुन ठेवल्याने, चुकीच्या पद्धतीने बसणे, पाठीवर अवजड कॅरी बॅग, सॅक वागवणे यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

यामुळे सतत वेदना, सूज असल्याने झोपही येत नाही. आणि याचा परिणाम एकंदर कार्यक्षमतेवर होतो. ॲक्युपंक्चरमुळे सूज, वेदना कमी होतात.

३. डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी

सततच्या टेन्शनमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. किंवा मायग्रेन सारख्या आजारात तीव्र डोकेदुखी असताना ॲक्युपंक्चरचा खूपच फायदा होतो. याशिवाय यात औषधांचे दुष्परिणाम किंवा शस्त्रक्रिया असे महागडे आणि धोका असलेले उपचार टाळता येतात.

४. डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी

डोळ्यांचे अनेक आजार जसे की मोतीबिंदू, काचबिंदू, नजरेचे दोष, रंगांधळेपणा, रातांधळेपणा, धूसर दिसणे किंवा मानेच्या आजारांमुळे दृष्टी क्षीण होणे, डोळ्यांना सतत थकवा जाणवणे यावर ॲक्युपंक्चर लाभदायक आहे.

५. प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी

प्रतिकारशक्ती चांगली नसेल तर कोणत्याही आजाराला आपण लवकर बळी पडतो. साधा ऋतुमानातील बदल किंवा खाण्यातील बदलांमुळे तब्येत बिघडली की त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो.

सतत थकवा जाणवतो. यावर ॲक्युपंक्चर ही खूपच प्रभावी उपचार पद्धती आहे.

६. मानसिक शक्ती वाढवण्यासाठी

स्ट्रेस, टेन्शन यामुळे झोपेचे तीनतेरा वाजतात. आणि अपुऱ्या झोपेमुळे मानसिक थकवा, डोकेदुखी, निर्णय क्षमता कमी होणे असे कित्येक त्रास सुरू होतात.

ॲक्युपंक्चर मुळे गाढ झोप लागते व इतरही शारीरिक आणि मानसिक लक्षणे दूर होतात.

७. पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यासाठी

पचन बिघडले की शरीर अनेक रोगांचे माहेरघर बनते. ॲक्युपंक्चरद्वारे पचनाच्या अनेक समस्यांवर यशस्वी उपचार करता येतात.

८. ॲलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी

ॲलर्जीचे आजार हे ठराविक मोसमात जास्त प्रमाणात निर्माण होतात.

म्हणून प्रतिबंधक स्वरुपात अगोदरच ॲक्युपंक्चर केले तर औषधांशिवाय आराम मिळतो.

९. धूम्रपानाची सवय सोडविण्यासाठी

धूम्रपानाची सवय कमी करत असताना ॲक्युपंक्चरचा खूपच फायदा होतो.

व्यसन सोडताना होणारी चिडचिड, अस्वस्थता आणि सिगारेटची अनिवार्य तलफ रोखण्यासाठी याचा उपयोग होतो.

इतकेच नाही तर शरीरात साठलेली विषद्रव्ये कमी होतात. फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते आणि मानसिक शांतीचा अनुभव येतो.

१०. सततच्या ताणामुळे होणारे दीर्घकालीन आजार रोखण्यासाठी

सतत तणावाखाली राहिल्यास अनेक रोग उत्पन्न होतात. यामुळे कामावरून रजा घेऊन घरी बसावे लागते.याची झळ जशी त्या व्यक्तीला बसते तसेच संघटनेचे किंवा कंपनीचेही नुकसान होते.

ॲक्युपंक्चरमुळे हा सततचा ताण कमी होतो आणि आजार गंभीर होऊन भविष्यात लागणारे महागडे उपचार किंवा ऑपरेशनची शक्यता कमी होते.

तुम्हाला या लेखातील माहिती कशी वाटली ते कमेंट्स करुन आम्हाला नक्की सांगा. लाईक व शेअर करुन ही उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय