कमी बोलणाऱ्या लोकांची वैशिष्ठ्ये जाणून घ्या

कमी बोलणाऱ्या व्यक्तींना अबोल, गर्विष्ठ किंवा घुम्या स्वभावाचा असं म्हणतात. लोकांचे यांच्याविषयी बरेच गैरसमज असतात. म्हणूनच या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कमी बोलणाऱ्या माणसांची काही वैशिष्ट्ये!!!

मित्रांनो, कमी बोलणं ही कोणतीही कमतरता किंवा स्वभाव दोष आहे असं समजू नका. तर मोजकेच आणि मुद्देसूद बोलणे ही एक कला आहे.

आणि असे नेमके बोलणाऱ्या व्यक्तींची बुद्धिमत्ता अफाट असते. ते मोजूनमापून शब्द निवडतात आणि योग्य वेळ येताच आपले म्हणणे प्रभावीपणे मांडतात.

म्हणूनच तोंडाला येईल ते सतत बडबडत बसणाऱ्या माणसांना कोणी गांभीर्याने घेत नाही. याउलट क्वचितच बोलणाऱ्या माणसाच्या शब्दात ताकद असते. खऱ्या अर्थाने यांच्या शब्दांना “किंमत” असते.

जाणून घेऊया मितभाषी लोकांची वैशिष्ट्ये

१. कमी बोलणारे उत्तम श्रोते असतात.

कमी बोलणाऱ्या व्यक्ती नेहमी समोरच्याचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतात. त्यामुळे ही व्यक्ती आपल्याला महत्त्व देते हे इतरांना समजते.

साहजिकच अशा व्यक्ती विषयी आदर वाटतो. या जगात दुसऱ्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेणारी माणसे खूपच कमी आहेत. बहुतेक वेळा एवढा वेळ आणि संयम कोणाकडे नसतो.

त्यामुळे मध्येच आपले म्हणणे घुसडणे, दुसऱ्याला बोलूच न देणे, पूर्ण लक्ष न देणे असे प्रकार माणसे करतात आणि ती समोरच्या व्यक्तीच्या मनातून उतरतात.

याउलट कमी बोलणाऱ्या माणसांविषयी आस्था वाटते. इतरांच्या भावनांना महत्त्व देणे हा गुण यांच्यात प्रकर्षाने आढळतो.

२. कमी बोलणारे जास्त बुद्धिमान असतात

कमी बोलणाऱ्या माणसांना एकाच वाक्यात आपले विचार मांडता येतात. अगदी कमी शब्दांत ते आपल्या मनातील विचार स्पष्टपणे सांगू शकतात. यालाच म्हणतात मार्मिक बोलणं. फापटपसारा अजिबात नाही !!!

यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का ?

कमी बोलणारी माणसे बुद्धीमान असतात. त्यांचे विचार, मुद्दे त्यांच्या मनात अगदी स्पष्ट असतात.

कोणताही वैचारिक गोंधळ नसतो. त्यामुळेच कमीत कमी शब्दांत ते जे काही सांगायचे आहे ते सांगून मोकळे होतात.

मग कमी बोलणारी माणसे म्हणजे कमी हुशार, कमी समज असणारी असं वाटत असेल तर तुमची चूक वेळीच सुधारा!!!

३. कमी बोलणाऱ्या व्यक्ती हे चांगले मित्र म्हणून ओळखले जातात

आश्चर्य वाटलं ना? तुम्हाला वाटेल की कमी बोललं तर मुळात मैत्री होईलच कशी? पण असं काहीच नाहीय.

ज्या व्यक्तींना मोजके बोलायची सवय असते त्या दुसऱ्यांना बोलताना लक्षपूर्वक ऐकतात. त्यांना आपले मन मोकळे करु देतात.

अनावश्यक सल्ला देत नाहीत. कमी बोलणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणे जमते.
भावनांविषयी असे म्हणतात की त्या तीव्र स्वरूपाच्या असतात. आणि या भावनांचे प्रगटीकरण करण्यासाठी आपण जे माध्यम वापरतो ते म्हणजे शब्द !!!

आपण जेवढे जास्त शब्द वापरु तेवढी भावनांची धार किंवा तीव्रता कमी होत जाते. म्हणून पाल्हाळ लावत बोलणाऱ्या माणसाच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.

शब्दांच्या जंजाळात त्या हरवून जातात. कमी बोलणारी माणसे भावना पटकन ओळखतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे यांना लवकर समजते. आणि आपले मन जाणून घेणारी व्यक्ती कोणालाही नेहमीच जवळची वाटते. त्यामुळे ही कमी बोलणारी, पण शांतपणे समजून घेणारी माणसे उत्तम मित्र होऊ शकतात.

४. कमी बोलणाऱ्या व्यक्ती अधिक यशस्वी होतात

काय कारण असेल बरं याच्यामागे? अगदी सोपं आहे. या व्यक्ती वायफळ बडबड करण्यात आपला वेळ वाया घालवत नाहीत. उगाच गॉसिपिंग, निरर्थक चर्चा, वादविवाद, फुकटचे सल्ले अशा भानगडीत हे पडतच नाहीत.

त्याऐवजी आपलं पॅशन, ध्येय यावर यांचं पूर्ण लक्ष असतं. एकतर हे हुषार असतात, विचार स्पष्ट असतात आणि काम करण्यासाठी यांच्याकडे वेळ पण भरपूर असतो. मग यशस्वी होण्यासाठी अजून काय लागतं?

५. कमी बोलणारी माणसे अधिक विश्वासार्ह असतात

समजा तुम्ही आपलं एखादं गुपित एखाद्या व्यक्तीला सांगितलं. ते कोणालाही समजू नये अशी तुमची स्वाभाविक इच्छा असते.

पण जर का समोरच्या व्यक्तीच्या पोटात कोणतीही गोष्ट रहातच नसेल तर? कधी एकदा हे जाऊन सगळ्यांना सांगतोय असंच त्याला वाटेल.

जीभेवर तीळही न भिजणारी माणसे असं यांना म्हणतात. म्हणजे सतत बोलत रहाणे. आणि मग बडबडण्याच्या ओघात भान रहात नाही.

दुसऱ्याने मोठ्या विश्वासाने सांगितलेले गुपित ही माणसे उघड करतात. याऐवजी कमी बोलणारी माणसे संयमी असतात. तारतम्य बाळगून वागतात आणि बोलतात. त्यामुळे ही माणसे भरकटत जाण्याची शक्यता कमी असते. तुम्ही विश्वासाने सांगितलेले गुपित ते जपून ठेवू शकतात.

६. कमी बोलणाऱ्या व्यक्तींना आदर जास्त दिला जातो

दुसरे कोणीही तुमचा अनादर कधी करतात? जर तुम्ही त्यांच्याशी भांडण, वादावादी करत असाल तर ते तुम्हाला उलटून बोलतात. अपमान करतात.

किंवा जर विनाकारण तुम्ही इतरांची चेष्टा करत असाल तरीही तुमचा अपमान होऊ शकतो. जास्त बोलणारी माणसे इतरांशी अनावश्यक जवळीक साधतात. बोलण्याच्या ओघात नको त्या गोष्टी बोलून जातात.

ज्याचा फायदा घेऊन दुसरे कोणीही त्यांना मानसिक त्रास देऊ शकते. पण कमी बोलणाऱ्या व्यक्तींना मुळातच आपल्या व इतरांच्या मर्यादा ठाऊक असतात.

आणि त्यांचे उल्लंघन ते करत नाहीत. ज्याप्रमाणे ते स्वतःची प्रायव्हसी जपतात त्याचप्रमाणे इतरांच्या खासगी बाबतीत दखल देत नाहीत. कोणाशी भांडणतंटे करत नाहीत. साहजिकच सर्वजण यांना आदराने वागवतात.

७. कमी बोलणारी माणसे शांततापूर्ण जीवन जगतात

कमी बोलणाऱ्या माणसांवर इतरांशी भांडणे करण्याची वेळ येत नाही. बडबड करणारी माणसे दुसऱ्या व्यक्तीला खूप वचने देतात. आणि मग प्रत्यक्षात ती पूर्ण झाली नाहीत की कटुता निर्माण होते.

परस्परांविषयी द्वेष, अविश्वास अशा नकारात्मक भावनांमुळे जीवनातील शांती नाहीशी होते.

याउलट कमी बोलणारी माणसे कोणाकडून काही अपेक्षा ठेवतच नाहीत. ती स्वतःचे काम शांतपणे करत रहातात. अती बोलणे हे संकटांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. कारण मागचा पुढचा विचार न करता बोलणारी माणसे इतरांच्या भावना दुखावतात. याविरुद्ध विचारपूर्वक बोलण्यामुळे कोणीही दुखावले जात नाही.

परिणामी सर्वांशी चांगले, मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवणे शक्य होते. आणि ज्या व्यक्तीची कोणाशी दुष्मनी नाही, जिने दिलेले आश्वासन मोडले नाही किंवा कोणाला जीवाला लागणारे शब्द उच्चारले नाहीत अशा व्यक्तींना दुसरे कोणीही त्रास का देईल? त्यामुळे यांच्या आयुष्यात शांती नांदत असते.

८. कमी बोलणाऱ्या व्यक्तींना एकटेपणाची भीती वाटत नाही

या व्यक्ती सतत स्वतःशी संवाद साधत असतात. त्यामुळे इतरांशी बोलण्याची गरज त्यांना फारच कमी भासते. या व्यक्ती स्वतःमध्ये रमणाऱ्या असल्यामुळे त्यांना सोबतीची सुद्धा गरज नसते.

याच गुणामुळे सतत माणसांच्या घोळक्यात रहाणे त्यांना आवडत नाही. बहुतांश लोकांना सोबतीची गरज का वाटते ? कारण एकटेपणाची भीती!!!

अंतर्मुख लोकांचे गुण!

पण कमी बोलणारी माणसे मुळातच एकांतप्रिय असल्याने ती कधीच एकटी पडत नाहीत. एखाद्या पार्टी मध्ये जल्लोष चाललेला असला तरीही ही माणसे मात्र गर्दी पासून दूर एका निवांत कोपऱ्यात आरामात बसलेली दिसतील.

हजारो माणसांच्या घोळक्यात असली तरीही त्यांचा संवाद मात्र स्वतःशीच सुरु असतो. हा आपल्या आतला ‘स्व’ यांना जाणवलेला असतो. स्वतःशीच जोडले गेल्यामुळे इतर कोणाची सोबत असो वा नसो यांना विशेष फरक पडत नाही.

मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आले असेल की शब्द हे शस्त्र आहे. शब्दांची ताकद विलक्षण आहे. म्हणूनच नको त्या ठिकाणी आणि नको तेवढे बोलणे म्हणजे आपणहून अडचणी ओढवून घेणे.

त्यामुळे बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृतीशील रहा. म्हणजे काही बोलण्याची गरजच नाही, तुमचे कामच बोलेल.

मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे !!!’

याचाच अर्थ बोलणे महत्त्वाचे नाही तर प्रत्यक्ष जीवनात केलेले काम लाखमोलाचे आहे.

म्हणून कमी बोलण्याचे फायदे नीट समजून घ्या. जेवढी बडबड कमी तेवढे व्यक्तीमत्व मजबूत!!!

हो, हे अगदी खरं आहे. कारण सतत बोलण्यात जी ऊर्जा खर्च होते ती कमी बोलून राखून ठेवली तर वैचारीक प्रगल्भता येते. आंतरीक शक्ती वाढली की ती व्यक्ती धीरगंभीर आणि कणखर होत जाते. म्हणूनच समाजात अशा व्यक्तींना मान मिळतो. ते यशस्वी आणि आनंदी जीवन जगतात.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. कमी बोलणाऱ्या व्यक्तींची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये आमच्याशी नक्की शेअर करा. तुम्हाला यांचा कोणता गुण जास्त भावतो हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.

लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय