सिस्टोसिल : बऱ्याच महिलांमध्ये आढळणारा पण दुर्लक्षित केला जाणारा आजार

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: सिस्टोसिल: बऱ्याच महिलांमध्ये आढळणारा पण दुर्लक्षित केला जाणारा आजार काय आहे । महिलांचे आजार । महिलांचे आरोग्य समस्या | महिलांना वारंवार लघवी येणे याची करणे काय असू शकतात

योनीमार्गाचा आतील भाग किंवा मूत्राशय आपल्या नॉर्मल जागेवरुन खाली येणे यालाच सिस्टोसिल असे म्हणतात. मूत्राशय व त्याच्या आसपासचे मसल्स सैल पडल्यामुळे अशी अवस्था ओढवते. किंवा कटिभागातील अवयवांवर दबाव आला तरीही सिस्टोसिलची समस्या निर्माण होते.

कटिभागात बरेच अवयव दाटीवाटीने एकत्र असलेले दिसून येतात. यात आतडी, मूत्राशय, गर्भाशय, मलाशय इत्यादी अवयवांचा समावेश होतो. यांना आपल्या जागेवर धरुन ठेवण्याचे काम हे त्यांच्याशी संलग्न असणारे स्नायू व लिगामेंट्स करतात. कोणत्याही कारणाने हे आधार देणारे लिगामेंट व मांसपेशी कमजोर झाल्या तर ते आपले काम योग्य प्रकारे करु शकत नाहीत. अशावेळी वरच्या भागातील अवयवांचा दबाव त्यांच्या खाली असलेल्या मूत्राशयावर पडतो.

या वजनामुळे मूत्राशयाचा काही भाग योनीमार्गातून बाहेर पडतो. यालाच सिस्टोसिल म्हणतात.

सिस्टोसिलची लक्षणे जाणून घेऊया.

कमी प्रमाणात सिस्टोसिलचा त्रास असेल तर कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. परंतु गंभीर स्वरूप असेल तर खालील प्रमाणे लक्षणे दिसून येतात.

 • योनीद्वारातून आतील अवयव बाहेर आलेले दिसतात. किंवा त्यांचा स्पर्श हाताला जाणवतो.
 • वारंवार ब्लॅडर भरल्यासारखे वाटणे.
 • वरच्यावर लघवीला जावे लागणे.
 • कटिभागात वेदना, जडपणा जाणवतो.
 • महिलांना खूप वेळ उभे रहाणे, पायऱ्या चढणे, वजन उचलणे या गोष्टीचा त्रास होतो.
 • योनीमार्गात टॅम्पून लावण्यास त्रास होतो.
 • ब्लॅडर पूर्णपणे रिकामे न होणे.
 • वारंवार होणारे युरीनरी इन्फेक्शन.
 • शारीरिक संबंधांच्या वेळी वेदना जाणवणे.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

सिस्टोसिलची लक्षणे बहुतेक वेळा जाणवत नाहीत. असे असले तरीही यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. यात जरी वेदना जाणवत नसली तरी सुद्धा ब्लॅडर पूर्णपणे रिकामे होत नाही.

त्यामुळे मूत्र साठून राहते आणि जंतुसंसर्ग होऊ शकतो. असे इन्फेक्शन जर सतत होत असेल तर त्यामुळे इतर अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कटिभागात जडपणा, कंबर दुखी किंवा योनीमार्गातून काही तरी बाहेर आल्याची शंका येत असेल किंवा योनीतून एखाद्या अवयवाचा स्पर्श हाताला जाणवत असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी.

सिस्टोसिलची कारणे

पेल्विस म्हणजे कटिभागाचा सर्वात खालचा स्तर. याठिकाणी अनेक मसल्स, कनेक्टिव्ह टिश्यू, लिगामेंट दाटीवाटीने एकत्र असतात.

कटिभागातील सर्व अवयवांना यांच्यामुळे भक्कम आधार मिळतो. जसजसे वय वाढत जाते तसे हे मसल्स कमजोर पडत जातात.

याशिवाय इतर कोणत्याही कारणाने पेल्विसच्या मसल्स वर ताण आला तरीही हा त्रास होतो. जन्मजात विकृती हे देखील एक कारण असू शकते. प्रसूती दरम्यान काही वेळा मसल्स वर खूप ताण आला तर सिस्टोसिलची शक्यता वाढते.

वरीलपैकी कोणत्याही कारणाने मूत्राशय आपल्या नॉर्मल जागेवरुन खाली उतरते. आणि योनीमार्गातून मूत्राशयाचा काही भाग लटकल्याप्रमाणे खालच्या दिशेला येतो.

पेल्विसच्या मांसपेशींवर दबाव येण्याची कारणे

 • गर्भावस्था
 • योनीमार्गातून होणारी नॉर्मल डिलिव्हरी
 • स्थूलता
 • सतत वजन उचलणे.
 • मलावरोध असल्याने कुंथून जोर लावावा लागणे.
 • दीर्घ काळ खोकल्याचा त्रास.
 • क्रॉनिक ब्रॉंकायटिस म्हणजे फुफ्फुसांचा आजार

याशिवाय सिस्टोसिलची इतरही काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

 • वाढते वय
 • आनुवंशिक कारणे
 • गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली असेल तर मूत्राशय खाली सरकण्याचा धोका असतो.

सिस्टोसिलचे निदान कसे करतात?

सर्वप्रथम योनीमार्गातून परीक्षण केले जाते. यावेळी शारीरिक तपासणी करुन महिलेची जनरल हेल्थ पाहिली जाते. तसेच इतर कोणते आजार आहेत का, कोणती औषधे सुरू आहेत याची माहिती डॉक्टर विचारतात.

पेशंटची संपूर्ण हिस्ट्री विचारात घेऊन त्यानुसार निदान करण्यात येते. यानंतर अधिक खात्री करण्यासाठी काही टेस्ट करण्यात येतात.

सिस्टोसिलकरीता रक्त व लघवीची तपासणी केली जाते.

मूत्राशयाची स्थिती जाणून घेण्यासाठी एक्स रे काढून पहातात.

किती प्रमाणात प्रोलॅप्स आहे म्हणजेच मूत्राशय किती खाली आले आहे हे यावरून लक्षात येते.

याशिवाय इतरही काही चाचण्या केल्या जातात.

१. यूरोडायनेमिक : मूत्राशयात जमा होणारे यूरीन व ब्लॅडरची मूत्र साठवण्याची क्षमता तसेच मूत्रविसर्जन किती प्रमाणात होते हे या परिक्षणातून समजते.

२. सिस्टोस्कोपी : मूत्रमार्गात नळी टाकून त्या भागाचे निरीक्षण केले जाते. यामुळे अवरोध, मूतखडा, ट्यूमर असे मूत्रमार्गात असणारे दोष दिसून येतात.

सिस्टोसिलवरील उपाय जाणून घेऊया.

अगदी कमी प्रमाणात असलेले सिस्टोसिल, तसेच पेशंटला कोणत्याही स्वरूपात वेदना होत नसेल तर उपचारांची गरज भासत नाही.

अशा केसेस मध्ये वजन न उचलणे तसेच जीवनशैली मधील बदल एवढेच पुरेसे असते. यामुळे त्रास जास्त वाढत नाही.

परंतु जर का वेदना होणे, इतर कोणत्याही स्वरूपात त्रास होणे, गंभीर लक्षणे असतील तर ट्रिटमेंट साठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.

१. इस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपीइस्ट्रोजेनच्या पातळीत बदल करण्यासाठी हे उपचार केले जातात.

२. वजन नियंत्रणात ठेवणे- यामुळे अवयवांवर येणारा अतिरिक्त ताण कमी होतो.

३. केगल एक्सरसाइज – योनी, गुदद्वार आणि मूत्राशयाच्या मांसपेशींना मजबूत करण्यासाठी हा व्यायाम केला जातो. विशिष्ट पद्धतीने या स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण करुन त्यांची लवचिकता वाढवता येते.

हे व्यायाम साधे सोपे असले तरी अतिशय प्रभावी आहेत. तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडून तुम्ही हे व्यायाम शिकून घेऊ शकता.

याशिवाय उपचारांसाठी ऍण्टिबायोटिक्स, ऍण्टिव्हायरल, ऍण्टिफंगल, वेदनाशामक औषधे जरुरीप्रमाणे वापरली जातात.

लक्षणांनुसार यांचा वापर केला जातो. लॅबोरेटरी टेस्ट करुन इन्फेक्शन कोणत्या प्रकारचे आहे हे समजते. त्यावरुन औषध योजना करणे सोपे जाते.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा.

लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी मनाचेTalks ला फॉलो करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय