किडणी खराब होणे म्हणजे काय? जाणून घ्या सर्व माहिती.

आजकाल आपल्याला किडणीशी संबंधित आजार जास्त प्रमाणात दिसतात. किडणी हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आणि यात कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर गंभीर परिणाम होऊ शकतात.

मनाचेTalks या लेखातून किडणी खराब होणे म्हणजे काय आणि त्याची लक्षणे व उपचार याबाबत सविस्तर माहिती घेऊन येत आहे.

किडणी खराब होणे म्हणजे काय?

Acute Kidney Failure असे वैद्यकीय परिभाषेत या आजाराला म्हटले जाते. सामान्य भाषेत यालाच किडणी खराब होणे असे म्हणतात.

रक्तामधील अशुद्ध घटक किडणी द्वारे शोषून घेऊन फिल्टर केले जातात व नंतर बाहेर टाकले जातात. पण जर काही कारणाने ही अशुद्धी किडण्यांमधे साठून राहिली आणि फिल्टर करण्याचे काम बंद झाले तर रक्तातील अशुद्ध घटकांचे प्रमाण वाढत जाते. आणि शेवटी रक्ताचे रासायनिक संघटन बिघडते.

हा आजार तीव्र स्वरूपाचा असून काही दिवसांत गंभीर लक्षणे निर्माण होऊ शकतात.

या आजाराचा धोका जास्त असणारे रुग्ण कोणते?

आधीपासूनच किडनीशी संबंधित आजार असलेले पेशंट.

इतर गंभीर आजार होऊन हॉस्पिटलमध्ये भरती झालेले आय सी यू मधील पेशंट.

हा आजार गंभीर स्वरुपाचा असला तरीही वेळेवर उपचार मिळाल्यास किडनी पुन्हा नॉर्मल स्वरुपात काम करु शकते.

किडणी खराब होण्याचे प्रकार

१. Acute Kidney Failure ही परिस्थिती अचानक उद्भवते. आणि याकरिता तातडीने उपचार करण्याची गरज असते. ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. या लेखातून याचीच माहिती दिलेली आहे.

२. Chronic Kidney Failure या प्रकारात देखील किडणी खराब होते पण हा आजार ठराविक काळानंतर हळूहळू वाढत जातो.

किडणी खराब होण्याची लक्षणे

कधीकधी या रोगाची कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत. दुसऱ्या कोणत्याही आजारांसाठी लॅबमध्ये रक्ताची तपासणी केली असता या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते.

काही वेळा घोट्याच्या सांध्यांना, गुडघे किंवा पायांना सूज येते. या आजाराचे निदान करण्यासाठी सूज आलेल्या ठिकाणी दाब दिला असता खड्डा पडतो. म्हणून याला पिटींग एडिमा अर्थात खोलगट सूज म्हणतात. किडणी ने काम करणे बंद केले की शरीरात सोडीयम साठून राहते. त्यामुळे घोटा आणि पाय या भागावर सूज चढते. जर का तुमचे पाय सुजलेले असतील तर किडणी रोगाची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किडणी खराब होण्याची इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

 • गोंधळलेल्या अवस्थेत असणे. (Confusion)
 • उलटी येणे, मळमळ होणे.
 • चक्कर येणे किंवा कोमा ( गंभीर अवस्थेत)
 • छातीत दुखणे किंवा दबाव जाणवणे.
 • लघवीचे प्रमाण कमी होणे.
 • शरीरात द्रव पदार्थ साठून सूज येणे ( शरीराच्या खालच्या भागावर)
 • बेशुद्ध पडणे.
 • श्वास घ्यायला त्रास होणे.
 • थकवा जाणवणे.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किडणी खराब होण्याची कारणे.

 • जर कोणत्याही कारणाने किडणीला होणारा रक्तपुरवठा कमी झाला तर.
 • अपघात अथवा इतर कोणत्याही प्रकारे किडणीला मार लागला तर.
 • किडणीतून मूत्र वाहून नेणाऱ्या नळ्या म्हणजे युरेटर्स. यामधे अडथळा निर्माण होऊन मूत्र शरीरात साठून रहाते.त्यामुळे किडणी खराब होणे.

आता यातील प्रत्येक कारण विस्ताराने जाणून घेऊया.

१. किडणीला रक्तपुरवठा योग्य प्रमाणात न होणे जर कोणत्याही रोगामुळे अथवा लक्षणांमुळे किडणीला होणारा रक्तपुरवठा कमी झाला तर किडणी आपले काम व्यवस्थित पणे करु शकत नाही. खालील आजारांमध्ये किडणीचा रक्तपुरवठा कमी होतो.

 • रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी होणे
 • हायपर टेन्शन ची औषधे
 • हृदय विकाराचा झटका
 • हृदय रोग
 • लिव्हर खराब होणे
 • इन्फेक्शन
 • इतर औषधांचा साईड इफेक्ट झाल्यावर
 • तीव्र ऍलर्जी
 • गंभीर स्वरूपाचे भाजणे
 • शरीरातील पाणी कमी झाल्यास (डिहायड्रेशन)

२. अपघात किंवा इतर कारणे यामुळे किडणी खराब होते. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

 • किडणी व आसपासच्या जागेला मार लागल्याने रक्तस्राव होणे.
 • कोलेस्टेरॉल साठल्याने किडणीचा रक्तपुरवठा कमी होतो.
 • किडणी मध्ये छोटे छोटे फिल्टर असतात. त्यात अवरोध झाला तर. या अवस्थेला ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असे नाव आहे.
 • रक्तातील लाल पेशी वेळेआधीच मृत झाल्यास. याला हिमोलायटिक युरिमिक सिंड्रोम असे म्हणतात.
 • शरीरांतर्गत इन्फेक्शन
 • प्रतिकारशक्ती कमी होऊन ल्यूपस नावाचा आजार होतो. यामुळे किडणी खराब होऊ शकते.
 • किमोथेरपी, ऍंटिबायोटिक औषधी , इमेजिंग टेस्ट साठी वापरले जाणारे डाय, ऑस्टिओपोरोसिस व रक्तातील कॅल्शियमची अतिरिक्त पातळी कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधे यामुळे किडणी खराब होऊ शकते.
 • काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर
 • दुर्मिळ प्रकारचे त्वचाविकार
 • T T P ( Thrombotic Thrombocytopenic Purpura ) या रक्तविकारामधे.
 • अल्कोहोल, मेटल आणि ड्रग्स यांचे शरीरात अतिरिक्त प्रमाण.
 • रक्तवाहिन्यांना सूज येणे.

३. मूत्र शरीरात साठून रहाण्याची व त्यामुळे किडणी खराब होण्याची कारणे खालीलप्रमाणे.

 • मूत्राशय कॅन्सर
 • यूरेटर्स मधे रक्ताच्या गाठी साठणे.
 • आतड्यातील कॅन्सर
 • प्रोस्टेट ग्रंथी वाढणे.
 • मूतखडा
 • मूत्राशयाच्या नसांना इजा होऊन मूत्र नियंत्रण कमी होणे.
 • प्रोस्टेट कॅन्सर

ऍक्यूट किडणी फेल्युअरची शक्यता कधी जास्त वाढते ?

इतर कोणत्याही गंभीर आजारांमध्ये अशी लक्षणे वाढण्याचा धोका जास्त संभवतो. याला कारणीभूत ठरणारे काही घटक पाहूया.

 • वृद्धत्व
 • डायबिटीस
 • हायपर टेन्शन ( उच्च रक्तदाब)
 • हात किंवा पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा
 • किडणी चे इतर रोग
 • हृदय विकार
 • यकृत विकार

किडणी खराब होण्यापासून संरक्षण कसे करावे?

किडणी खराब झाल्याचे लवकर लक्षात येत नाही. पण किडण्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली तर हा आजार होण्याची शक्यता कमी होते. त्यासाठी खालील उपाय करावेत.

१. डायबिटीस, हायपर टेन्शन किंवा हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी. कोणतेही औषध डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावे. काही वेळा पेशंट काही किरकोळ आजारासाठी मेडिकल मधून गोळ्या घेऊन वेळ मारुन नेतात. पण अशा औषधांचा साईड इफेक्ट होऊन किडणी खराब होऊ शकते.

२. किडणीचे अन्य काही आजार किंवा इतर कोणतेही दीर्घकालीन रोग असतील तर नियमितपणे चेक अप करून घ्यावे.

किडणी खराब झाल्याचे निदान कसे करतात?

खालील काही परिक्षणांच्या आधारे हे निदान केले जाते.

 • दिवसभरात शरीरात तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण तपासणे.
 • यूरीन टेस्ट
 • रक्तातील यूरीया व क्रिएटिनीन यांचे प्रमाण वाढत असेल तर किडणी खराब होण्याची शक्यता असते.
 • इमेजिंग टेस्ट सोनोग्राफी किंवा सीटी टेस्ट द्वारे किडणी मध्ये असलेले दोष शोधून काढणे.
 • बायोप्सी. किडणी टिश्यूचा छोटासा तुकडा काढून त्याची टेस्ट केली जाते. यासाठी एक बारीक निडल (सुई) वापरली जाते.
 • किडणी खराब झाल्यास कोणते उपचार करतात?

यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. किती दिवस ऍडमिट रहावे लागेल, पूर्णपणे बरे वाटेल का हे रोग किती गंभीर आहे यावर अवलंबून असते.

ऍक्यूट किडणी फेल्युअरमधे त्याची कारणे शोधून काढणे किंवा मार लागला असेल तर त्यासाठी उपचार करणे अशाप्रकारे इलाज करतात.

इतर कोणतीही गुंतागुंत होऊ नये यासाठी डॉक्टर प्रयत्न करतात. किडणीचे काम पूर्ववत होण्यासाठी काही काळ जावा लागतो. आणि तेवढा वेळ काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते.

या काळात खालीलप्रमाणे उपचार करण्यात येतात.

१. रक्तातील प्लाझ्माचे संतुलन राखणे.

रक्तातील द्रवांश कमी असल्यास सलाईन मधून ही कमी भरून काढता येते. आणि हे प्रमाण जास्त झाल्यास सूज येते. अशावेळी मूत्रवर्धक औषधे वापरुन लघवीतून हे अतिरिक्त द्रवांश काढून टाकले जातात.

२. रक्तातील पोटॅशियम नियंत्रित करणे.

यामुळे हृदय गती अनियंत्रित होणे तसेच स्नायू कमजोर होणे असे प्रकार दिसून येतात. औषधी देऊन हे प्रमाण योग्य तेवढे राखले जाते.

३. रक्तातील कॅल्शियमची मात्रा सुधारणे.

४. डायलिसिस

याद्वारे किडणीतील अशुद्धी बाहेर काढली जाते. डायलिसिस मुळे अधिक प्रमाणात साचलेले पोटॅशियम, विषद्रव्ये बाहेर टाकता येतात. एक कृत्रिम किडणी वापरुन शरीराबाहेर रक्ताचे पंपिंग केले जाते. व शुद्ध रक्त शरीरात सोडले जाते.

किडणी खराब झाल्यास कोणती कॉम्पलिकेशन्स होऊ शकतात?

१. छातीत जास्त प्रमाणात द्रवांश निर्माण होणे. छातीत पाणी भरल्यास श्वास घेताना त्रास होतो.

२. छातीत दुखणे. हृदयाभोवती असलेल्या आवरणाला सूज आली तर छातीत वेदना होतात.

३. मसल्स कमजोर होणे. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स व द्रवांश यांचे संतुलन बिघडले तर स्नायूंना थकवा येतो. विशेषतः पोटॅशियम चे प्रमाण वाढले तर अशी लक्षणे दिसतात.

४. किडणी कायमस्वरूपी खराब होणे. अशा पेशंटना कायम डायलिसिस करावे लागते. किंवा किडनी प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया करावी लागते.

५. मृत्यू किडणी खराब होण्याची शेवटची अवस्था म्हणजे मृत्यू ओढवणे. Acute Kidney Failure मुळे पेशंट मरण पावण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की किडणीची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे. किंवा काही लक्षणे दिसताच अजिबात वेळ न काढता वैद्यकीय सल्ला घ्यावा. औषधे आणि योग्य आहार यांचे वेळापत्रक सांभाळणे खूपच गरजेचे आहे.

किडणी हा अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. किडणी बिघडल्यामुळे करावे लागणारे उपचार महागडे असून सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे हाच यावरचा प्रभावी उपचार ठरतो.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. न विसरता लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय