लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि अंतर्मनाची शक्ती!……

Law of Attraction And Inner Power

नमस्कार मित्रांनो, आपण दिवसातला बहुतांश वेळ बोलतच असतो, जेव्हा आजुबाजुला बोलण्यायोग्य व्यक्ती असतात तेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो.

आणि जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा स्वतःशी आपली अखंड बडबड चाललेली असते!

“घ्या आता, पेट्रोल अजुन दोन रुपयांनी वाढवलंय, च्यायला, सामान्य माणसांनी जगायचं तरी कसं?”

“अरे, किती टॅक्सेस लावाल? जीव घ्या, आमचा एके दिवशी!”

“जॉब शोधा, कमवायला लागा, असं म्हणून घरचे ओरडतायेत, माझं काय होईल कुणास ठाऊक?”

“किती डोकं खातेय यार ती माझं, भंडावुन सोडलयं नुसतं, असं वाटतयं, दुर कुठतरी पळुन जावं!”

“ह्यावेळी तरी कंपनी चांगलं एप्रायजल देऊन पगारवाढ करेल ना? काय माहीत?”

“XXX हरामखोर, आज पेमेंट देतो म्हणालाय, देतो की नाही, कुणास ठाऊक?”

“काय, शो हाऊसफुल झाला?, आमचं नशीबच फुटकं, चला घरी आता!”

“ह्या डायबेटीसने, तर मला जगणं नकोसं करुन सोडलं आहे,!”

अशी आणि यासरखी वाक्य आपण कधी स्वतःशी कधी दुसर्‍यांशी सतत बोलतच असतो, आपल्याही नकळत आपले काही वाक्य, आपले काही विचार आपल्या मनात खोलवर रुजतात आणि चांगली असतील ती सुदैवाने किंवा वाईट असतील ती दुर्देवाने ती खरी होतात, बस्स!..ह्यालाच म्हणतात, ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’!..

मनाचे दोन भाग आहेत, अंतर्मन आणि बाह्यमन, बाह्यमन किंवा जागृत मनापेक्षा अंतर्मन हे नऊ पटींनी अधिक शक्तीशाली आहे, एखादी गोष्ट अंतर्मनात रुजल्यास, ती कितीही अशक्यप्राय असो, ती खरी करुन दाखवण्यासाठी अंतर्मन आकाशपाताळ एक करतं!

अंतर्मनामध्ये शक्ती अफाट आणि आश्चर्यकारक आहे……. हे मन व्यक्तीच्या शरीरावर वाट्टेल तेवढा आणि वाट्टेल तसा प्रभाव टाकु शकतं! प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात, कधी ना कधी अंतर्मनाची शक्ती आपल्यासाठी किंवा आपल्याविरुद्ध नकळत वापरत असते.

खरंतर आपण जेव्हा स्वतःशी किंवा इतरांशी बोलत असतो तेव्हा, आपलं बाह्यमन, आपल्या अंतर्मनाशी एक प्रकारचा संवाद साधत असतं, त्याला माहीती पुरवत असतं.

जो व्यक्ती आपल्या अंतर्मनाचा वापर आपल्या भल्यासाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, करुन घेण्याचं कौशल्य जिद्दीने शिकुन घेतो आणि चिकाटीने अंमलात आणतो, त्याच्या आयुष्याचं रंगरुप बदलुन जातं.

लोक थक्क आणि अवाक होतील, अशा असाधारण कामगिरी त्याच्याकडून सहजपणे साध्य केल्या जातात, असामान्य जीवन जगुन अशी व्यक्ती इतरांपुढे प्रेरणास्थान बनते.

अंतर्मनात माहीती पोहचते कशी? त्याचे दोन प्रकार सांगता येतील.

 1. आपल्या नकळत काही माहीती अंतर्मनात पोहचते.
 2. आपण मुद्दामहुन आपल्या अंतर्मनात माहीती पोहचवतो.
प्रकार पहीला – जेव्हा आपल्या अंतर्मनाला वापरलं जातं.

आपण टी.व्हीवर आकर्षक पेहराव केलेले, सुंदर सुंदर दिसणार्‍या नायक-नायिकांना पाहतो, आपल्या हातातलं काम सोडुन आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो, एक प्रकारची भुरळच पडते आपल्याला, मग नाही बघायचं असं ठरवलेलं असुन आपण तासन्तास टी. व्ही. समोरुन हलत नाही.

अगदी असंच जाहीरातींचं असतं, डीओ लावल्याने तंग कपडे घातलेली मुलगी फिदा होत नसते, हे सगळ्यांनाच माहीत असतं, पण डिओ खरेदी करताना सुवासापेक्षा, त्या जाहीरातीच्या प्रभावामुळे, त्या विशेष ब्रॅंडचा डिओ आपल्याकडुन नकळत खरेदी केला जातो.

म्हणुणच की काय, आमचं साबण वापरल्याने आपलं लग्न झालेलं कळणारच नाही, असं आपल्या मनावर बिंबवण्यात जाहीरात यशस्वी होते आणि त्यांचा माल तुफान खपतो.

एखाद्या गोर्‍यागोमट्या हिरॉईनने, चित्रविचीत्र अंगविक्षेप केलेलं, दिड मिनीटांचं गाणं, वारंवार बघितलं की तिला मन भरुन पहायला आपली पावलं चित्रपटागृहाकडे वळतात, पिक्चर बघुन ती आपल्याला मिळणार नाही हे आपल्याला माहीत असतं, पण मोह आवरत नाही, कारण अंतर्मन आपल्याला पिक्चर बघण्याचा हट्ट करतं, आणि आपल्याला त्यापुढे नाईलाजानं झुकावंच लागतं,

चिटफंडवाले, एका वर्षात पैसे दुप्पट करुन देणारे स्कीमवाले, क्रिप्टोकरन्सीवाले, चांदीचं सोनं बनवुन देणारे, पैशाचा पाऊस पाडणारे, एक कोटीचं बक्षीस लागलयं असं सांगुन दहा लाख उकळणारे, सगळे दुबळ्या अंतर्मनाच्या गिऱ्हाईकाला हेरतात आणि त्याचं काम तमाम करतात.

अशा लोकांच्या मनात कुठेतरी “वेड्या मनाची वेडी ही आशा” असते, नेमका तिचा ते फायदा उचलतात, असं वारंवार वागु लागल्यास मन दुबळं बनतं, ‘कळतयं पण वळत नाही’, अशी स्थिती होते, ज्याचा इतर चलाख लोक फायदा उचलतात आणि आपल्याकडुन हवे ते सहजपणे करुन घेतात.

मग नकळत वाईट साईट कल्पना केल्यास, स्वतःच्या भविष्याबद्द्ल शंका आणि संशय उपस्थित केल्यास, सतत अशुभ बोलत राहील्यास, अंतर्मन “जो हुक्म मेरे आका” असं म्हणुन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल, त्यात नवल ते काय?

प्रकार दुसरा – जेव्हा आपण आपल्याला जे हवं आहे, ते आपल्या अंतर्मनाकडून करवुन घेतो.

ही कॅटॅगिरी मोजक्या लोकांसाठीच आहे, इथे प्रयत्न पुर्वक सुप्त मनाला चांगल्या कल्पनांचं, उच्च ध्येयाचं, भव्य दिव्य उदात्त विचारांचं, खाद्य दिलं जातं, शंका आणि संशयाला हद्द्पार करुन अतुट विश्वास आणि संपुर्ण श्रद्धा यांना साथीदार म्हणुन निवडलं जातं, अशा वेळी इतरांना खडतर वाटणारा, यशाचा मार्ग, आपल्यासाठी सहजपणे उपलब्ध होतो, सुकर होतो.

हे लोक आपापल्या क्षेत्रात टॉपला पोहचतात, साधारण लोकांपेक्षा वेगानं प्रगती करतात, इतर लोकांचं नेतृत्व करतात.

आता ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करण्यासाठी पुढचे एकवीस दिवस, काय काय कृती करायच्या ते थोडक्यात सांगतो.

 • सकाळच्या वेळेत खुप पॉझीटीव्ह उर्जा असते, म्हणुन सकाळी लवकर, सुर्योद्याच्या वेळी, उठल्यास खुप फ्रेश वाटते, व्यायामासाठी ही वेळ सर्वोत्तम असते.
 • आता तुम्हाला आवडतो असा कोणाताही शारिरीक व्यायाम करा, चालायला जाणं, जिम एक्सरसाईज, सायकलिंग, स्विमींग, एरोबिक्स, डान्सिंग, योगासनं, सुर्यनमस्कार किंवा असं काहीही ज्याने आपला घाम निघेल, शरीर थकुन जाईल.
 • नंतर घराच्या एखाद्या शांत कोपर्‍यात, जिथं कोणी डिस्टर्ब करणार नाही, अशा ठिकाणी जसं की आपली रुम, पुजाघर, टेरेसवरची हवेशीर जागा, किंवा बागेचं किंवा मंदीराचं लॉन, असे कुठलही एक ठिकाण निश्चित करा.
 • आता पुरेसा व्यायाम करुन, दमलेल्या शरीरानं, सैल कपडे घालुन, इथे आसन घेऊन, मांडी घालुन बसा, मंद संगीताचं बॅकग्राऊंड आणि सुवासिक अगरबत्ती मनाला लवकर एकाग्र करायला मदत करेल.
 • डोळे बंद करा, शरीर शिथील सोडा,
 • एकेक अंक मोजत दिर्घश्वसन सुरु करा.
 • मन शांत शांत होईल.
 • आता मनाला रिलॅक्स करण्यासाठी सुचना द्या, उदा. माझ्या उजव्या पायाचा अंगठा शिथील होत आहे, मग सगळी बोटं, मग उजवा तळवा, उजवी पिंडरी, घोटा, गुडघा, मग संपुर्ण उजवा पाय.
 • असचं डावा पाय, जननेंद्रीय, कंबर, पोट, छाती, क्रमाक्रमाने प्रत्येक अवयवाला शिथील होण्याच्या सुचना द्या, उजवा खांदा, उजवा कोपरा, उजव्या हाताची बोटे, मग संपुर्ण उजवा हात, संपुर्ण डावा हात, मान, गळा, चेहरा, केस, त्याच्या खालची त्वचा सगळं सगळं रिलॅक्स करा.
 • संपुर्ण शरीर रिलॅक्स होईल, याला मनाची अल्फा स्टेज असे म्हणतात, जिथं आपण एक प्रकारच्या पेंगुळलेल्या अवस्थेत असलो तरी आपल्याला सगळं कळत असतं, कारण आपलं अंतर्मन जागृत असतं.
 • आता तुमची विशलिस्ट आठवा, त्यातलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द क्रमाने, आठवा, शंभर टक्के मन लावुन, ती इच्छा पुर्ण झालीय, अशी ह्रद्यपुर्वक कल्पना करा, चित्ररुपात डोळ्यासमोर आणा,
 • कमीत कमी तीन वेळा आपली इच्छा मनातल्या मनात उच्चारा, अंतर्मनाला सुचना द्या की ही घटना खरोखर घडत आहे.

हे वाक्य वर्तमानकाळात बनवायचं असतं, जसे की,

 • मला हवं असलेलं घर, मला मिळालं आहे”,
 • “३१ मार्च २०१९ पर्यंत मला एक करोड रुपये मिळालेले आहेत.”
 • “माझ्याजवळ फॉर्चुनर कार आणि थंडरबर्ड बाईक आहे.”
 • “माझं व्यक्तिमत्व खुप आकर्षक आहे.”
 • “माझ्या कुटुंबात सगळे एकमेकांवर खुप प्रेम करतात”.
 • “मी माझ्या प्रिय व्यक्तिंसोबत माझ्या फेव्हरेट ठिकाणी फिरायला गेलो आहे.”
 • मला समाजात मानसन्मान मिळतो, मी खुप लोकप्रिय आहे.

आता एकेक वाक्य मनातल्या मनात म्ह्ण्टल्यानंतर, खरोखर ती इच्छा पुर्ण झाल्यास, तुम्ही जितके आनंदी झालो असतो, तेवढे आनंदी व्हा!

बस्स! त्या विश्वात हरवुन जा!

सगळ्या इच्छांची कल्पना पुर्ण करुन झाल्यावर हळुहळु श्वासावर लक्ष केंद्रीत करा,

पाच मिनीटे शांत बसुन रहा,

आजुबाजुचे आवाज, वातावरण यांच्याप्रती सजग होत, हळहळु डोळे उघडा.

आता पुर्ण दिवस आपल्या ध्येयाप्रति समर्पित होवुन उत्साहाने कामाला लागा.

ही कृती सुर्यास्ताच्या वेळी केल्यास डबल फायदा होईल,

दिवसभर थकुन भागुन, अंथरुणावर अंग टाकल्यास, बॉडी रिलॅक्स करुन अंतर्मनाला स्वयंसुचना द्यायला अजिबात विसरु नका.

सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपेआधीची साखरझोपेची आणि पेंगुळलेली अवस्था रोजरोज आयतीच प्राप्त होत असते, तेव्हा स्वयंसुचना देण्यासाठी ह्या दोन्ही वेळेचा वापर करण्याची सुवर्णसंधी दवडु नका.

एकवीस दिवसपर्यंत ही कृती वारंवार केल्यास अंतर्मनात स्वप्नांचे, ध्येयाचे बीज रुजुन पुढचे मार्गदर्शन अंतर्मनाकडून मिळण्याची आपोआप सुरुवात होईल.

सुरुवातीला निग्रहाने करावी लागणारी कृती एकवीस दिवसांच्या सातत्याने सहज होण्याची सुरुवात होईल.

तुम्हाला आलेले लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीतचे अनुभव मला जाणुन घ्यायला आवडतील.

तुम्हा सर्वांची स्वप्ने लवकरात लवकर पुर्ण होओ, अशा शुभेच्छांसह,

धन्यवाद!

लेखक मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती विविध कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.

लॉ ऑफ अट्रॅक्शन

वाचण्यासारखे आणखी काही…..

आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण (Ways of Happier Life)
मनातलं जंगल…
उत्कृष्टतेचा ध्यास

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि अंतर्मनाची शक्ती!……”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय