हृदयविकार का जडतात? आणि हृदयविकार होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: ब्लॉकेज ची लक्षणे । ह्रदय विकार लक्षणे । हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात । रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय । हार्ट अटॅक येण्याची लक्षणे । ब्लॉक विरघळवण्यासाठी चे घरगुती उपाय | Heart Disease in Marathi

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय.

ते अविरत कार्यरत असतं म्हणून आपण जीवंत राहू शकतो.

तर मग अशा आपल्या हृदयाची काळजी घेणं आपलं प्रथम कर्तव्य आहे.

आज या लेखात आपण हृदयाची ब्लॉकेज पासून काळजी कशी घ्यायची ते जाणून घेऊ या.

हृदयामध्ये ब्लॉकेजेस होणं हा एक गंभीर आजार आहे.

ब्लॉकेजेस असतील तर हृदयाची गती खूप कमी होते.

ते हळूहळू काम करू लागते. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो.

पण मध्यमवयीन लोकांमध्ये म्हणजेच तिशीनंतर ही समस्या जास्त प्रमाणात उद्भवते.

हृदयात ब्लॉकेजेस आढळले तर स्वाभाविकपणे लोक घाबरून जातात.

परंतु ह्या आजारात घाबरून जाण्याची नव्हे तर काळजीपूर्वक योग्य तो इलाज करण्याची गरज आहे.

हृदयातील ब्लॉकेजेस बरे करण्याचे अनेक घरगुती उपाय आहेत जे अत्यंत उपयुक्त आहेत.

काही लोकांमध्ये ही समस्या जन्मतः असते, पण बहुतेक लोकांमध्ये वयानुसार ही समस्या उद्भवते.

आयुर्वेदात ह्या समस्येवर अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत.

ब्लॉकेज म्हणजे नक्की काय

हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी/खंडित होतो तेव्हा हृदयात ब्लॉकेजेस आहेत असं म्हटल जातं.

काहीवेळा ही समस्या जन्मजात असते. जन्मजात असणाऱ्या ब्लॉकेज समस्येला Congenital heart blockage म्हटले जाते.

तर वयानुसार उद्भवणाऱ्य ब्लॉकेज समस्येला Acquired heart blockage असे म्हटले जाते.

बदललेली जीवनशैली, फास्ट फूड चा अतिरेक, व्यायामाचा अभाव आणि खाण्याच्या अनियमित वेळा ह्या समस्येसाठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

कोरोनरी आर्टरी (धमनी) मध्ये अडथळा निर्माण होऊन हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा अनियमित किंवा खंडित झाला तर धमनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात आणि त्यामुळे हार्ट अटॅक (हृदय विकाराचा झटका) येतो.

heart blockage marathi information

ह्यालाच अक्यूट मायोकारडियल इन्फ्राक्शन असे म्हटले जाते.

ह्या लेखात असे ब्लॉकेजेस टाळण्यासाठीचे अनेक उपाय अगदी सोप्या भाषेत सांगितले आहेत. त्याचा पुरेपूर लाभ घ्या.

ब्लॉकेजेस होण्याची कारणे

ब्लॉकेज हे कोलेस्ट्रॉल, फॅट, फायबर टिशू आणि रक्तातील पांढऱ्या पेशी एकत्र आल्यामुळे होते.

हे मिश्रण हळूहळू रक्तवाहिन्यांच्या कडांना चिकटून साठत जाते आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करू लागते तेव्हा ब्लॉक तयार होतो.

खूप घट्ट ब्लॉक असेल तर त्यास स्टेबल ब्लॉक म्हटले जाते आणि विरघळू शकणारा ब्लॉक असेल तर त्यास अनस्टेबल ब्लॉक म्हटले जाते.

स्टेबल ब्लॉक – ह्या प्रकारचा ब्लॉक हा हळूहळू तयार होतो आणि वाढतो.

त्यामुळे एखादी रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर शरीर दुसरी रक्तवाहिनी शोधतं जी ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीला बायपास करते आणि हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत करते.

त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या हार्ट अटॅक चा धोका कमी होतो.

अश्या नव्या आर्टरी ला collateral vessel असे म्हटले जाते.

अनस्टेबल ब्लॉक – अनस्टेबल ब्लॉक मध्ये अचानक ब्लॉक फुटला तर गंभीर स्वरूपाची गुठळी तयार होते.

ह्यामुळे collateral vessel तयार होण्यास वेळच मिळत नाही.

आणि पेशींना गंभीर इजा होते. अचानक हार्ट अटॅक येतो किंवा काही वेळा कार्डियाक अरेस्ट होऊन रुग्ण दगावतो देखील.

आपल्या हृदयात ब्लॉक आहे का हे जाणून घेण्यासाठी खालील लक्षणे तपासून पहा :

हृदयविकार ओळखायचा कसा? – symptoms of heart attack

१) वारंवार होणारी डोकेदुखी

२) चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे

३) छातीमध्ये तीव्र वेदना होणे

४) दम लागणे

५) थोडक्या कामामुळे थकवा जाणवणे

६) मान, जबडा, गळा व पाठीत तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे

७) हात किंवा पायात वेदना जाणवणे

८) अशक्तपणा जाणवणे किंवा थंडी वाजणे

ब्लॉकेजच्या ह्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका कारण हयातूनच पुढे हृदय विकार उद्भवतो.

ब्लॉकेज न होण्यासाठी किंवा झालेले ब्लॉक विरघळवण्यासाठी चे घरगुती उपाय

डाळिंब – रोज एक डाळिंब किंवा एका डाळिंबाचा रस याचे सेवन केले तर हार्ट अटॅक पासून बचाव केला जाऊ शकतो कारण डाळिंबात जे फाईटोकेमीकल्स असतात त्यामुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात.

दालचीनी- दालचीनी शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते तसेच हृदय अधिक मजबूत करते.

दालचीनीचे नियमित सेवन हृदय विकाराला दूर ठेवण्यास मदत करते तसेच श्वसनाच्या आजारांवरही ते परिणामकारक आहे.

लाल मिरची – लाल रंगाच्या मिरची मध्ये असलेल्या कॅप्सेसिन मुळे शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉल (बॅड कोलेस्टेरॉल) रोखण्यास मदत होते

रक्तप्रवाह सुरळीत होतो. हार्ट अटॅक अथवा पक्षाघाताचा धोका कमी होतो.

तज्ञांच्या सल्ल्याने लाल मिरचीचे नियमित सेवन केल्यास अनेक फायदे होतात.

जवसाच्या बिया (flaxseeds)- जवसाच्या बियांमध्ये उत्तम प्रकारचे ओमेगा 3 असते जे कोलेस्ट्रॉल व पर्यायाने हृदयविकार दूर ठेवण्यास मदत करते.

एक चमचा जवसाच्या बिया पाण्याबरोबर घेतल्यास रक्तवाहिन्या शुद्ध होण्यास मदत होते.

जवस बिया इतर स्वरूपात देखील खाल्ल्या जाऊ शकतात.

लसूण- रक्तवाहिन्या रुंद करून रक्तप्रवाह सुरळीत करण्यास लसूण फार मोठा हातभार लावतो.

आहारात लसूण अवश्य असावा त्यामुळे हृदयविकार व पक्षाघाताचा धोका कमी होतो.

हळद- हळद ही अत्यंत गुणकारी आहे हे तर आपण सर्व जाणतोच.

हळद रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यास मदत करते.

गरम दुधात हळद घालून त्याचे नियमित सेवन करणे हृदय विकारासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

लिंबू- लिंबात मोठ्या प्रमाणात विटामीन ‘सी’ असते. लिंबू रक्त प्रवाह सुरळीत करण्यास तसेच रक्त वाहिन्याना आलेली सूज कमी करण्यास मदत करते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील लिंबू उपयुक्त आहे, सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून ते पाणी पिण्याचे भरपूर फायदे आहेत.

द्राक्षे- द्राक्षे स्वादिष्ट तर असतातच पण अत्यंत गुणकारी देखील आहेत.

द्राक्षातून विटामीन ‘सी’ विटामीन ‘ई’ तर मिळतेच शिवाय फायबर ही मिळते.

द्राक्ष खाण्यामुळे शरीरात नवीन पेशी तयार होण्यास मदत होते.

आलं- आल्याच्या नियमित सेवनामुळे हार्ट ब्लॉकेज रोखण्यास तसेच हृदय विकार दूर ठेवण्यास मदत होते.

प्रतिकारशक्ती वाढते.

तज्ञांच्या सल्ल्याने आल्याचे योग्य प्रमाणात सेवन जरूर करावे.

तुळस- आयुर्वेदात तुळस अत्यंत गुणकारी सांगितली आहे.

तुळशीच्या 25/30 पानांचा काढा थोडा लिंबाचा रस आणि मध घालून पिण्यास अत्यंत उपयोगी आहे.

हा हार्ट ब्लॉकेज वरचा गुणकारी सोपा उपाय आहे.

दुधी भोपळा- दुधी भोपळ्याचा रस किंवा भाजी ही हृदय विकारावर अत्यंत गुणकारी आहे.

ह्याचे नियमित सेवन हृदयाची कार्यक्षमता वाढवते, ब्लॉकेज चा धोका कमी करते.

दुधीच्या रसात थोडी पुदिना व तुळशीची पाने घालून पिणे जास्त गुणकारी आहे.

हृदय विकार दूर ठेवण्यासाठी

१) मिठाचे अतिरिक्त सेवन टाळा.

२) तेल, तूप यांचा आहारात कमीतकमी वापर करा.

३) मैदा, बेकरी प्रोडक्टस पासून दूर रहा

४) साखरेचा वापर कमीतकमी करा

आपली जीवनशैली कशी असावी

१) स्ट्रेस किंवा ताण तणाव टाळा

२) नियमित 8 तासाची झोप घ्या

३) दररोज व्यायाम करा

४) आनंदी रहा

५) धूम्रपान/मद्यपान ह्यापासून स्वतःला दूर ठेवा

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हृदय विकारापासून स्वतःचा बचाव नक्की करू शकतो.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

हृदयरोग टाळण्यासाठी झोपेचं वेळापत्रक कसं असावं?

हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी…

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “हृदयविकार का जडतात? आणि हृदयविकार होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय