कलाम…सलाम..! (Missile Man – Dr. APJ. Abdul Kalam)

‘जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात’ या पु.लं.च्या वाक्याची सत्यता पटवणारे काही जे मोजके दुर्मिळ व्यक्तीमत्त्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे Dr. APJ Abdul Kalam ! स्वप्नं फक्त पाहायची नसतात तर ती उघडय़ा डोळ्यांनी कशी जगायची असतात’ हे कलाम यांनी आपल्या कार्य-कर्तृत्वातून दाखवून दिलं. विपरीत परिस्थिती असतानाही एक शास्त्रज्ञ ते देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास संपूर्ण जगासाठी प्रेणादायी आहे. भारतभूमीला खर्‍या अर्थाने विकसित देश म्हणून नावालौकिकाला आणण्याचे स्वप्न पाहून, ते सत्यात उतरविण्याचा दृष्टीकोन करोडो भारतीयांना देणाऱ्या भारतमातेच्या या महान सुपुत्राचा आज स्मृती दिन….. त्यानिमिताने या महामानवास विनम्र अभिवादन.

मानसाने आयुष्यभर काहीना काही शिकत राहिले पाहिजे असा डॉ. कलाम यांचा संकल्प होता. त्याुळेच विविध मोठं-मोठी पदे भुषवित असतांनाही त्यांनी आपल्यातील विद्यार्थी कायम जागा ठेवला. आपल्या जवळील ज्ञान जगाला मिळावे यासाठी शिक्षकाची भूमिकाही त्यांनी लिलया पार पाडली. त्यांनी आपल्या जिवनाचा शेवटचा श्वासही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांनाच घेतला याला मोठा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल.

लहानपणापासून कलाम यांचे आयुष्य संघर्षशील असेच राहीले. अत्यंत विपरीत परिस्थीतीत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले. मित्रांच्या मदतीने तर कधी पेपर विकूण त्यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च पुर्ण केला. लहान वयातच वडीलांचे छत्र गमविल्याने डॉ. कलाम यांचे बालपण अजून खडतर झाले. पण जिद्दीने आपले शिक्षण पुर्ण करून डॉ. कलाम यांनी आपले सर्व आयूष्य राष्ट्रासाठी अर्पण केले. इंदीरा गांधी पंतप्रधान असतांना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला तेव्हा पासूनच स्वेदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे विकसीत करण्याची जिद्द डॉ. कलाम यांनी मनात बाळगली आणि देशाची शक्ती वाढविण्यासाठी त्यांनी क्षेपणास्त्र निर्माण केली.

‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीूळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतूक झाले आणि ‘मिसाईलमॅन’ ही ओळख त्यांना मिळाली. भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी असे विक्रम साराभाई यांनी व्यक्त केलेली अपेक्षा डॉ. कलाम यांनी पुढे सार्थ ठरविली. त्यांची भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे ‘इस्रो’ मधील कामगिरी वाखवण्याजोगीच होती. कलाम यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या प्रक्षेकांच्या मदतीने भारताने ‘रोहीनी’ हा उपग्रह अवकाशात पाठविला. पुढील काळात या क्षेत्रात भारताने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. वैयक्तीक कामापेक्षा सांघीक कामगिरीवर त्यांचा भर असे, आपल्या सहकार्यामधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांना अवगत होती. व्यक्तीगत हीत, जात, र्धम यापेक्षा राष्ट्राचे कल्याण अधीक महत्वाचे मानणार्‍या डॉ.कलाम यांनी कमालीची धर्मनिरपेक्षता जिवनभर पाळली.

वैज्ञानीक क्षेत्रातील एवढा मोठा माणूस पण त्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. वैज्ञानिकापासून ते लहान मुलांपर्यंत ते जिव्हाळ्याचा संवाद साधू शकत होते म्हणूनच ते देशात एवढे लोकप्रीय झाले. ‘श्रेष्ठता तुमच्या कार्याने तयारे होते, ती अपघाताने येत नाही असे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या डॉ. कलाम यांच्या श्रेष्ठत्वाची जाण १९८१ मध्ये सरकारला झाली त्यांना पदमभूषण देऊन गौरविण्यात आले त्यानंतर १९९० ध्ये पदमविभूषण पुरस्कार तर १९९८ मध्ये भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार भारतरत्न देवून डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला त्यानंतरही त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

सन २००२ मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना डॉ. कलाम यांना देशाचे राष्टपती पद देण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा देशातील सर्व पक्षांनी त्याला एकजुटीने पाठींबा दिला. राष्ट्रपती पदी विराजान झाल्यावरही डॉ. कलाम यांनी आपले अध्यापन आणि मार्गदर्शनाचे काम सोडले नाही. भारताला महासत्ता बनविण्यासाठी ते सदैव कार्यरत राहीले. देशाचे सर्वात मोठे संवैधानिक पद भुषवित असतांनाही डॉ. कलाम यांचा साधेपणा कायमच होता. एक वैज्ञानिक असल्याने राजकीय अनुभव फारसा नुसनही डॉ. कलाम यांनी राष्ट्रपतीपदावर गौरवशाली कार्य केले. यापदावर असतांना त्यांचेसोर अनेकवेळा बिकट राजकीयच पेच निर्माण झाले मात्र आपला संयम डुळू न देता अत्यंत सहजतेने त्यांनी त्यातून मार्ग काढला.

‘Missile Man’ राष्ट्रपती अशी अनेक विशेषने असणारा हा माणूस हाडाचा विद्यार्थी होता डॉ. कलाम खर्‍या अर्थाने युवकांचे आयकॉन होते. ‘तुमचं स्वप्न सत्यात उतरवता येईल, यासाठी सर्वात आधी स्वप्न पहायला हवे’, असे म्हणून त्यांनी देशातील युवकांना स्वप्न पहायला व ती पुर्ण करायला शिकवली. देशाची खरी शक्ती म्हणजे युवा पिढी आहे. त्यामुळे ही पिढी घडविण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. जिवनात अनेक अडचणी येत असतात, कारण यशाचा आनंद घेण्यासाठी अडचणी सर्वात महत्वाच्या ठरतात, हा मूलमंत्र देवून डॉ.कलाम यांनी युवकांना संघर्ष करण्यासाठी सज्ज केले. शिकणे आणि शिकवणे हे डॉ. कलाम यांचे आवडते विषय होते म्हणूनच वयाच्या ८३ व्या वर्षीही ते एखाद्या युवकाप्राणे दररोज सेमिनार द्यायचे. जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल तर त्यासाठी आई, वडील, आणि शिक्षकांची मोठी भूमिका असते असं ते नेहमी म्हणत असत. युवकांनी वेगळ्या पध्दतीने विचार करण्याचे धाडस दाखवावे, नवनवीन संशोधन करावं, अनोळखी वाटा निवडाव्यात, अशक्य वाटणार्‍या गोष्टी शोधाव्यात अडचणीवर मात करावी असा संदेश डॉ. कलाम यांनी युवकांना दिला. आपला देश जगात महासत्ता बनावा असं स्वप्न डॉ. कलाम यांनी पाहीले होते. आपल्या पुस्तकांच्या रुपाने त्यांनी फार मोठा ज्ञानाचा खजीना मागे सोडला आहे त्यामुळे कलाम यांनी दाखविलेल्या मार्गाप्रमाणे जाणे हेच कलाम यांना खरे अभिवादन ठरेल…‼

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय