पिप्सी.. आठवणीतला चांदोबा

काल सौरव भावे लिखित पिप्सी (Pipsi- A Bottle full of Hope) चित्रपट बघितला. पहिल्या ५ मिनिटापासून चित्रपट आपल्या मनाचा असा ताबा घेतो की आपण पुन्हा एकदा लहान होतो. मराठीत वेगळे चित्रपट खूप येत असले तरी बालमनाचं विश्व उलगडवून त्यांना त्यात विहार करायला लावणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पण नाहीत. ते कधी येतात आणि कधी निघून जातात आपल्याला कळत ही नाहीत. पिप्सी मात्र पुन्हा एकदा आपल्याला बालपणात घेऊन जातो. निदान माझ्या पिढीने अनुभवलेल्या बालपणात तरी नक्कीच.

मला अजूनही आठवते लहानपणी मला जर कोणी स्वप्न दाखवली असतील आणि त्या स्वप्नांच्या राज्यात जर मी जगलो असेन तर त्यात सगळ्यात जास्ती वाटा हा चांदोबा मासिका चा होता. त्यात असणाऱ्या चित्र कथांनी माझ्या बालमनावर गारुड केलं होतं. गोष्ट राजाची असो वा रंकाची दोन्ही वेळेस त्या चित्रातून मी स्वतःला तिकडे बघत असे. अनेकदा झोपेच्या अधीन असणाऱ्या माझ्या बाल मनात ती चित्र एक वेगळ आयुष्य ही दाखवून जात असत. म्हणून त्या राक्षसा सारखा आपला जीव ही कुठेतरी सुरक्षित ठेवावा असं मला नेहमीच वाटायचं. आज मागे वळून बघताना हे कितीही हास्यास्पद वाटलं तरी त्या काळी ह्या बद्दल मी खूप सिरीयस होतो.

पिप्सी बघताना आज पुन्हा तो आठवणीतला चांदोबा मला आठवला. किती सुंदर क्षण होते ते. अशीच एक कथा घेऊन पिप्सी समोर येतो आणि त्यात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी ह्या दोन्ही चिमुकल्या कलाकारांच्या अभिनयाने पिप्सी पुन्हा एकदा ते क्षण भरभरून अनुभवायला देतो. स्पेशली मैथिली चा अभिनय तर अफाट. मला बघताना एक दोन वेळा तर अक्षरशः जागेवर उभ राहून टाळ्या वाजवून तिच्या अभिनयाची दाद द्यावीशी वाटली. इतका सहज सुंदर वावर ह्या दोघांचा ह्या चित्रपटात आहे. त्याला मिळालेली गाण्यांची जोड तर क्लास. एका रेल्वेच्या डब्याशी जुळलेले त्यांचे ऋणानुबंध दाखवताना मला पुन्हा एकदा बालपणातल्या माझ्या एका जीप ची आठवण झाली.

आमच्या घराच्या बाजूला हि खराब झालेली जीप ठेवलेली असायची त्यात किती तरी वेळ आम्ही पडलेलो असायचो. गाडी चालवायच वय नसताना पण गाडी चालवण्याचे सगळे अनुभव मी त्या जीपवर घेतले होते. क्लच, ब्रेक ते अगदी गियर टाकेपर्यंत. अनेक कट, कल्पना, मस्ती, राग-रुसवे, भांडण सगळच त्या जीप च्या सीट वर अनुभवलं होतं. आज पिप्सी मधला रेल्वे चा तो डबा बघताना पुन्हा सगळ आठवलं अगदी जसच्या तसं. पिप्सी नकळत त्या भावविश्वातून सामाजिक प्रश्नाशी असा काही आपल्याला जोडतो की आपण स्वतः थोड्यावेळ आपल्या बालपणाचा विचार करायला लागतो. हे सगळं करताना बालविश्वाशी असलेली पिप्सी ची नाळ कुठेच तुटत नाही. लहान करताना पिप्सी आपल्याला खूप मोठा विचार देऊन जातो.

एक अप्रतिम असा चित्रपट. लहान मुलांसाठी तर नक्की बघावा आणि दाखवावा असा. मराठीत असे खूप कमी चित्रपट येतात जे मोठे आणि लहान दोघेही अनुभवू शकतात आणि त्याची मज्जा घेऊ शकतात. मला वाटते पिप्सी मोठ्यांना लहान करतो तर लहानांना मोठं. दोन्ही गोष्टी करताना तो कथेची पकड पण सुटू देत नाही. चित्रपटातील ता, ना, पी, ही, नी, पा, जा हे गाणं तर इतक सुंदर आहे की अजूनही मी पुन्हा पुन्हा ऐकतो आहे. पिप्सी एक नितांत सुंदर आणि वेगळा अनुभव माझा आठवणीतला चांदोबा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय