विक्रीकौशल्य वाढविण्यासाठी पाच टिप्स….

मी एका मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये काम करते, नोकरी आवश्यक आहे पण आताच्या ट्रेड नुसार डिपॉझीट गोळा करणे आवश्यक आहे, टारगेट कंप्लीट झाले तरच पगारात वाढ होते, पण माझा स्वभाव थोडा भिडस्त आहे, त्यामुळे कोणाला मी लवकर कन्विन्स करू शकत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या जॉब मध्ये प्रगती करायची असल्यास स्वतःला कसे Motivte करायचे, या बद्दल तुमच्याकडून मार्गदर्शन हवे आहे.

आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटीशन वाढलेली आहे, त्यामुळे ग्राहकाला अनेक पर्याय निर्माण झाले आहेत, आणि अशा वेळी ज्याची मार्केटींग उत्कृष्ट आहे असे लोकच जास्त यशस्वी होतात, असे दिसतं.

तुम्ही सेल्स रिप्रेझेंटेटीव्ह असा, किंवा मेडीकल रीप्रेझेंटेटीव्ह, तुम्ही फिल्डवर सेल्स ऑफीसर म्हणुन काम करत असाल, किंवा एखादी कुठल्या दर्जेदार प्रॉडक्टची एजन्सी लाईन चालवत असाल.

किंवा तुम्ही इन्शुरंस एजंट असाल, किंवा कुठल्याही नेटवर्क मार्केटींगच्या व्यवसायात असाल, एखाद्या आध्यात्मिक संघटनेच्या प्रसारासाठी काम करत असाल किंवा एखाद्या एनजीओ मध्ये काम करत असाल, तर भरघोस विक्री होण्यासाठी, तुमच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी, फक्त तुमचा प्रॉडक्ट चांगलं असणं, आजकाल पुरेसं नाही, त्यासोबत तुमचं व्यक्तिमत्वही तितकचं प्रभावी असणंही आवश्यक आहे.

तुमचं ठासुन बोलणं, ग्राहकाच्या आवश्यकता अधोरेखित करणं, आपलं, आपल्या प्रॉडक्ट किंवा सेवेचं महत्व पटवुन देणं, ग्राहकाचा फायदा त्याच्या लक्षात आणुन देणं, योग्य तितकं नेमकं बोलणं, आणि त्याच्या मनात स्थान निर्माण करणं, हेच तर विक्री कौशल्य आहे.

आपला प्रॉडक्ट जास्तीत जास्त कसा विक्री होईल, यासाठी काही टिप्स देत आहे.

1) आपल्याला ग्राहकाची गरज नाही, ग्राहकाला आपली गरज आहे.

विक्री क्षेत्रात एटीट्युडची भरभरुन आवश्यकता आहे. जेव्हा आपण कोणाकडे मार्केटींगला जातो तेव्हा मनातला थोडाबहुत संकोच असणारच, ही लाज, भीडभाड आपल्याला पुर्णपणे शंभर टक्के व्यक्त होण्यापासुन रोखते.

जेव्हा आपण कोणाकडे काही मागायला जातो, तेव्हा लाज, संकोच वाटणं साहजिक आहे, जेव्हा आपण एखादी खोटी आणि चुकीची माहिती देतो, तेव्हा आपलं मन आपल्याला अपराधभावाची जाणीव करुन देतं, पण जर तुमची सेवा प्रामाणिक असेल, तुमचा स्वतःवर आणि प्रॉडक्टवर विश्वास असेल, तुम्ही कोणाला फसवत नाही, तर त्याच्या भल्यासाठी त्याच्याकडे जात आहात तर मात्र, तुम्ही ताठ मानेने, तडफदारपणे, आणि सळसळत्या उत्साहाने ग्राहकाकडे जायला हवे.

2) तुम्ही फक्त प्रॉडक्ट नाही, तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वालाही विकता.

आपला आत्मविश्वास कधी वाढतो माहीतीये? चांगले कपडे घातले, सुवासिक दरवळ पसरवणारे सेंट वापरले, की व्यक्तिमत्व अधिकाधिक खुलतं, प्रसन्न आणि रुबाबदार बनतं. आपल्याला असं वाटतं की संभाव्य ग्राहक आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, पण तुमच्या नकळत तो तुम्हाला बारकाईने, नखशिखान्त न्याहळत असतो.

तुमचे कपडे, तुमचे केस, तुमचे शुज, तुमचा चष्मा, तुमचा चेहरा, तुमचा सुगंध प्रत्येक गोष्ट त्याच्यावर आधी त्याच्या मनावर छाप पाडतात, आणि नंतर तुमचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचतात.

चेहर्यावर हास्य आणलं, की न बोलुनही,“तु मला आवडतोस,” असा संदेश ग्राहकापर्यंत पोहचवला की प्रत्युतरादाखल हसुन आपलंही छान स्वागत होतं. भेटल्याबरोबर आपल्या चाणाक्ष नजरेनं अशी कोणतीही गोष्ट शोधुन काढावी, व दिलखुलास स्तुती करावी.

“तुमचे व्हॉट्सएपचे मॅसेज फारच सुरेख असतात, मी आवर्जुन वाचतो.”
“मागच्या आठवड्यात तुमचे धबधब्यावरचे फोटो काय भारी होते!”
“तुमच्या ऑफीसचं फर्निचर फारच छान आहे हो!”

जाण्याआधी समोरच्या व्यक्तीचा थोडा अभ्यास केल्यास आईसब्रेकिंग खुप सहज होते, त्याला कशात रस आहे, त्याची नेमकी नाडी ओळखली की तो मनाचे दरवाजे खुले करतो.

खोटी, बळेबळे केलेली स्तुती चटकन लक्षात येते, लोकांवर अंतःकरणातुन प्रेम केल्यास त्यांना आपलंसं करण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत.

ह्या माणसाला मी कशी मदत करु शकतो? प्रत्येक वेळी, हा प्रश्ण स्वतःला विचारावा आणि शक्य ती प्रत्येक मदत प्रत्येकाला करायचा स्वतःचा स्वभाव घडवावा. चांगली कर्म कधीच वाया जात नाही.

लोकांना, आठवणीने बर्थडे, एनिव्हर्सरी विश करण्याची सवय लावुन घेतल्यास, प्रसंगी पुष्पगुच्छ, छोटीसी भेटवस्तु दिल्यास त्यांच्या चेहर्यावर आपल्यामुळे अनोखी स्माईल येते. प्रेम करा, यश मिळेल, इतका साधासोपा फॉर्मुला आहे हा!

इतरांना आनंद देण्याच्या संध्या शोधा! त्यांच्या अडचणीत समरस व्हा, आपल्या विनोदी वृतीने त्यांना हसवा, काही क्षणांसाठी दुःखं आणि चिंतापासुन त्यांना वेगळं करा, मग बघा, आपोआप तुम्ही लोकांना हवेहवेसे वाटु लागता.

अशाने पहिल्यांदा आपल्याला टाळु पाहणारे लोक, आपले चाहते होतात, याचा मी कित्येकदा अनुभव घेतला आहे.
चांगलं वाचावं, ऐकावं, नर्मविनोदी शैलीत मांडावं, हलक्याफुलक्या शब्दांनी समोरच्याला खळखळुन हसवलं की अर्धी लढाई जिंकल्या जाते.

3) विक्री अखंड बडबडण्यात कधीच होत नाही, मधल्या पॉज मध्ये विक्रीचा क्षण जन्म घेतो

आपल्या प्रॉडक्ट बद्द्ल भरभरुन बोलत रहावं वाटणं, साहजिक आहे, पण दोन मिनीटे बोलुन समोरच्या व्यक्तीच्या चेहर्यावरचे भाव वाचावेत. त्याला बोलण्याची संधी द्यावी. त्याची बाजु ऐकुन घ्यावी, त्याच्याशी सहमती व्यक्त करावी. तुम्हाला नको म्हणण्यासाठी तो शक्य ती सारी कारण देईल, वेळप्रसंगी तुमच्या सेवेला नावेही ठेवेल, अशा वेळी उत्तेजित होवुन तावातावात अजिबात येऊ नये.

त्याची दखल घेतली आहे असे त्याला कळवावे, आणि सौम्य शब्दांत आपली बाजु मांडावी. आवश्यक तेवढेच बोलावे, जास्तीत जास्त समोरच्याला बोलतं करावे. अगदीच थंड प्रतिसाद असल्यास अर्धी, तुटक वाक्ये बोलावी, पुर्ण करण्याची त्याला संधी द्यावी.

दोन वाक्याच्या मध्ये घेतलेला, काही सेकंदाचा पॉज आपले विचार समोरच्याच्या मेंदुत प्रवाहित करतोय, हे नेहमी लक्षात ठेवावे.

तुम्ही हा प्रॉडक्ट नाही घेतला तरी मला कसलाही प्रॉब्लेम नाही, असेही अवश्य भासवावे. गरज दोघांची असल्यासच कुठलाही व्यवहार यशस्वी होतो.
मागे लागणारे, फोर्स करुन गळ्यात पडणारे लोक कोणालाही आवडत नाहीत, अगदी आपल्यालाही आवडत नाहीत.

4) नकार पचवायची शक्ती आत्मसात करावी.

प्रत्येक नकार तुम्हाला अधिकाधिक सशक्त बनवतोय. आपल्यात सुधारणा करण्यास वाव देतोय. तसंही तीनास एक किंवा चारास एक हा मार्केटींगचा सक्सेस रेशो असतो, म्हणजे तुम्ही चार कॉल केले तर एक ग्राहक निर्माण होतो, हेही नेहमी लक्षात ठेवावे, आणि नकार देणार्यांचेही मनापासुन आभार मानावे, हसत ह्सत पुढच्या मोहिमेवर निघावे.

एखादे अपयश फार मनाला लावुन घेऊ नये. ८०;२० रुल सांगतो, की शेतकर्याने पेरलेल्या एकुण बियांपैकी फक्त वीस टक्के रोपं त्याला भरघोस पिक देतात. हा निसर्गाचा नियम आपणही समजुन घेतला तर अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलुन जाईल.

5) आनंदी रहावे, निर्व्यसनी रहावे, प्रामाणिक वागावे आणि अपडेट राहावे.

मार्केटींगच्या धंद्यातले बहुतांश लोक टारगेटच्या टांगत्या तलवारीखाली असतात, बर्याच जणांना सतत प्रवासही करावा लागतो, शरीर आणि मन थकतं, मग विरंगुळा म्हणुन व्यसनेही जडतात.

वेळप्रसंगी खोटेनाटे प्रॉमिस करुन धंदा उकळला जातो. कधी तोंडदेखलं बोलुन, वेळ मारुन नेली जाते. कधी चुक नसतानाही अपमान होतात, हे सगळे डंख मनाला त्रास देतात. ह्या सापळ्यापासुन जपुन राहावे, नियमित व्यायाम, योगासने, सुदर्शनक्रिया आणि ध्यान शरीराला आणि मनाला ताजेतवाने ठेवते. कधी मध्ये सुट्टी काढुन अवश्य निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जावे.

स्वतःबद्द्ल, स्वतःच्या कामाबद्द्ला हीन भाव न बाळगता अभिमान बाळगावा. चुकुनही आपल्या कामाला तुच्छतेचे बोल लावु नयेत, प्रगती होत नाहीत. शक्य तेवढे आभार मानावेत कारण त्यामुळेच आपल्या घरी भाकर बनते.

मार्केटचे अद्यायावत ज्ञान घेत राहावे, थांबला तो संपला, ह्या न्यायाने जगावे. आपापल्या क्षेत्रात तज्ञ बनुन जगावे. न सांगता जबाबदाऱ्या उचलाव्यात. लोकांच्या अडीअडचणीला न बोलवता धावुन जावे. मला काय मिळेल हा विचारही आपल्या प्रगतीमध्ये बाधा ठरतो.

आपला वापर करुन घेतला जात आहे, अशी भावना झाल्यासच थांबावे. तोपर्यत मोकळेपणाने मदत करावी. मित्र जोडावे, कमाई आपोआप वाढते.

प्रत्येक नौकरी व्यवसायाच्या अडचणी आणि व्यथा थोड्याफार सारख्याच आहेत, सेल्स बद्द्लचे तुमचे अनुभव काय आहेत, आणि तुम्हाला इतर कोणत्या अडथळे आहेत, हे कमेंटबॉक्समध्ये अवश्य लिहुन कळवा.

तुमच्या प्रॉफेशनल आयुष्यात तुम्हाला भरभरुन यश मिळावे ह्या ह्रद्यपुर्वक प्रार्थनेसह….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “विक्रीकौशल्य वाढविण्यासाठी पाच टिप्स….”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय