मंगळावर पाणी….. असू शकेल का जीवन मंगळावर?

युरोपियन स्पेस एजन्सी अर्थात इ.एस.ए. ने गेल्या आठवड्यात एका संशोधनाची पुष्टी केली. ह्या बातमीने पुन्हा एकदा वैज्ञानिक जगतात आनंदाची लहर आली. ही बातमी होती मंगळावर पाणी सापडल्याची. चंद्रानंतर मंगळावर पाणी असल्याची पुष्टी झाल्याने एलॉन मस्क ह्यांच्या मंगळावर माणसांची वस्ती बनवण्याच्या संकल्पनेला ह्यामुळे जोरदार बळ मिळालं. पण मंगळावर पाणी सापडलं म्हणजे आता मनुष्य वस्ती होईल का? तिकडे एक नवीन जीवन सुरु होईल का? हे पाणी शोधलं कसं?….. ते आता आपल्याला दुसरं घर मिळालं का? अश्या अनेक प्रश्नांची सरबत्ती सामान्य माणसाच्या मनात होणं स्वाभाविक आहे. पाणी म्हणजे जीवन हे मंगळावर खरं होईल का? ह्यासाठी आपल्याला वरच्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण गरजेचं ठरते.

मंगळ हा ग्रह सूर्यापासून २२७.९ मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. आपली पृथ्वी साधारण १४९.६ मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. ह्यामुळे मंगळावर सूर्याची उष्णता कमी पोहचते. अवकाशात पृथ्वी निळ्या रंगाची दिसते हा रंग पृथ्वी ला मिळतो तो पाण्यामुळे. त्याचवेळेस मंगळ तांबूस दिसतो तो त्यावर असलेल्या माती, खडकांच्या शुष्क रंगामुळे. पृथ्वी वर साधारण २१% ऑक्सिजन आहे तर त्याचवेळेस मंगळवार साधारण ०.१३% ऑक्सिजन आहे. मंगळावर ९५.३ % कार्बन डायऑक्साईड आहे. जे घटक कोणत्याही सजीव सृष्टीसाठी लागतात ते मंगळावर असले तरी त्यांचं प्रमाण पृथ्वी आणि मंगळात खूप फरक आणते. मंगळवार विरळ वातावरणामुळे तापमान खूप कमी असून शुन्याच्या खाली साधारण उणे -९० डिग्री सेंटीग्रेड पर्यंत सरासरी असते. त्याचवेळी मंगळाच्या वातावरणात पाणी हे प्रवाही स्वरूपात नसून बर्फाच्या स्वरूपात असते. जर कोणतीही सजीव वस्तू इकडे तग धरून रहायची असेल तर आधी मंगळाचं वातावरण घट्ट करता यायला हवं म्हणजे त्यात अजून खूप मोठ्या प्रमाणात ग्रीन हाउस गॅसेस मिसळायला हवेत. त्यामुळे पूर्ण ग्रहाचं तपमान वाढण्यास मदत होईल. ग्रीन हाउस गॅसेस ग्रहाच्या पृष्ठभागापासून परावर्तीत होणाऱ्या उष्णतेला रोखून धरतात त्यामुळे एकूणच ग्रहाचं तापमान वाढते. पृथ्वीवर आपण सध्या जी ओरड चालू आहे ग्लोबल वार्मिंग ची तो हाच प्रकार आहे. सतत ह्या वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वी गरम होते आहे. त्याचे परिणाम आपण बघत आहोत.

मंगळावर ह्या ग्लोबल वार्मिंग ची गरज आहे ज्यामुळे ग्रहाचं तापमान वाढेल आणि त्यायोगे बर्फाचं पाणी होण्यास मदत होईल त्याच सोबत ऑक्सिजनचं प्रमाण हि वाढवाव लागेल. त्यामुळे ओझोन ची लेयर तयार होऊन मंगळवार अवकाश विकीरणापासून सजीवांच रक्षण होईल. आता ह्या झाल्या जर तर च्या संकल्पना पण गेल्या आठवड्यात आलेल्या बातमीमुळे वैज्ञानिक आनंदित झाले आहेत. मंगळावर पाणी प्रवाही स्वरूपात आढळून आलं आहे. जमिनीला भेदून लहरी पाठवणाऱ्या रडार ने मंगळाच्या पृष्ठभागाचं संशोधन सुरु असताना मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर साधारण २० किमी च्या पट्ट्यात जमिनीखाली १.५ किलोमीटर वर पाणी असल्याचं आढळून आलं आहे. रडार जमिनीवर पल्सेस पाठवून त्यावरून रिफ्लेक्ट होणाऱ्या लहरींचा अभ्यास करत असतं. जमिनीखाली असलेले बदल जसे बदललेले दगड, अथवा बर्फ, पाणी, पोकळी, गॅसेस ह्यामुळे त्यावरून परावर्तीत होणाऱ्या लहरींमध्ये बदल दिसून येतो. नेमक्या ह्याच बदलांचा अभ्यास युरोपियन स्पेस एजन्सी २०१२ ते २०१५ करत होती. त्यावर पूर्ण अभ्यास केल्यावर मंगळावर त्या भागात लिक्विड स्वरुपात पाणी असल्याची पुष्टी झाली आहे.

तापमान इतके थंड असताना मंगळाच्या त्या भागात पाणी कसं? ह्याचं उत्तर देतांना वैज्ञानिकांच्या मते मंगळवारच्या जमिनीत असलेल्या मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियम सॉल्ट वितळून ब्राईन तयार झाले असू शकते. वर असलेल्या बर्फाच्या आणि जमिनीच्या दाबामुळे अजूनही ते लिक्विड स्वरूपात राहिलं असावं असा अंदाज आहे. आता पाणी मिळालं म्हणून लगेच तिकडे जिवसृष्टी अस्तित्वात असेल असं शक्य नाही किंवा निदान आत्ता सांगणं कठीण आहे. कारण त्यात मिसळलेल्या ह्या सॉल्ट च्या प्रमाणामुळे त्यात कोणत्याही प्रकारचे सजीव अगदी मायक्रोबॅक्टेरिया वगैरे अस्तित्वात असण्याची शक्यता खूप धूसर आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाने मंगळावर जमिनीत ड्रिलिंग करून १.५ किलोमीटर खाली असलेल्या ह्या पाण्याचे नुमने तपासणे अशक्य आहे. तसेच मंगळाच वातावरण लक्षात घेता इकडे जीवसृष्टीचा उगम होण्यासाठी अथवा विकसित करण्यासाठी मानवाला अजून अनेक वर्ष जातील असा कयास आहे.

गेल्या आठवड्यातील शोधाने काही गोष्टी नक्कीच समोर आणल्या आहेत. एकतर आपण मंगळाच्या जमिनीचा, जमिनीवर न उतरता त्या खाली असलेल्या गोष्टींचा वेध घेऊ शकतो असं तंत्रज्ञान विकसित झालं आहे. मंगळावर लिक्विड स्वरुपात पाणी असल्याची पुष्टी झाली आहे. त्यावर अजून पुढचं संशोधन सुरु आहे. मंगळावर वस्ती करण्याच्या एलोन मस्क सारख्या माणसांच्या पंखाना अजून बळ मिळालं आहे.(याबद्दलचा लेख- Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!) मंगळाच्या जमिनीत अडकलेला कार्बन डायऑक्साईड मोकळा करून मंगळावर वस्ती करण्याचं एलोन मस्क ह्यांच्या स्पेस एक्स चा स्वप्न आहे. पण नासा ने असं होण्याच्या शक्यतेला तूर्तास नकार दिला आहे. नासा च्या मते मंगळावर पाणी मिळालं म्हणून मंगळावर सजीव अस्तित्व असणं अथवा तयार करणं तितक सोप्प नाही. तरीपण स्पेस एक्स ने आपल्या स्वप्नांची घोडदौड सुरु ठेवली आहे तर नासा अजून पर्यायांवर विचार करत आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात तूर्तास ह्या संशोधनाने कोणता फरक पडत नसला तरी मंगळावरचं पाणी येत्या काही काळात आपल्या आयुष्यातला मंगळ ढवळणार हे निश्चित आहे.

संबंधित लेख- यशस्वीपणे अपयश पचवण्याची कला- Elon Musk


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय