फ्रेंड्स आणि फ्रेंडशिप…. (Friendship Day Special)

Friendship Day” जवळ येत होता आणि इकडे रावी ची तयारी सुरु झाली होती. ती फार उत्सुक होती फ्रेंड्सशिप डे साजरा करण्यासाठी… हातांनी कार्ड्स आणि फ्रेंड शिप बेल्ट सुद्धा बनवणं सुरु होतं तीच. हे सगळे बघून सुजाता ला आपल्या मुलीचा फार हेवा वाटला. इतकी जय्यत तयारी बघून सुजाताला वाटले विचारावं तरी काय विचार करते तिची छकुली…… मैत्री आणि आपल्या मित्र मैत्रिणी बद्दल…

रावी ची फ्रेंड्स लिस्ट बनवून झाली होती.. ती बघत सुजाता ने तिला विचारले “मग किती फ्रेंड्स आहेत ग तुला?”

“खूप आहेत ग आई” रावी कार्ड करण्यात गुंग होती.

“अरे वा. छान. पण काय असतो हा ‘फ्रेंड्सशिप डे’ सांगशील मला?” सुजाता रावी कडे बघून म्हणाली.

“अग,फ्रेंड्शिप डे म्हणजे आपल्या फ्रेंड्स ला तू माझा फ्रेंड आहे आणि नेहमी राहशील असं सांगणे. मग त्यासाठी गिफ्ट म्हणून फ्रेंडशिप बेल्ट पण बांधायचा असतो. फ्रेंड्शिप च सेलीब्रशन म्हणजे फ्रेंड्सशिप डे” रावी म्हणाली.

“अच्छा….. बरं मग तू “फ्रेंड” म्हणजे कोणाला म्हणशील?” सुजाता चा काळजी पूर्वक प्रश्न.

“आई, फ्रेंड् म्हणजे जो आपल्याशी चांगलं बोलतो, आपल्या सोबत खेळतो, आपल्याला हेल्प करतो तो” रावी आपल्या कार्ड कडे बघूनच म्हणाली.

“मग तर तुला खूप फ्रेंड्स असतील.”

“हो मला खूप फ्रेंड्स आहेत ना. आम्ही सगळे एकमेकांसोबत नेहमी खेळत असतो.”

“छान ग. बरं मग भांडण झाल तर मग काय करता तुम्ही..?”

“आई, तीच तर मज्जा आहे आम्हा फ्रेंड्स ची. आमच भांडण झालं ना, तर अबोला होतो कधी कधी. गर्ल्स आणि बॉईज मध्ये पण भांडण होत कधी कधी. पण मग फ्रेंड्स आहोत तर हे होणारच गं, म्हणून आम्ही एकमेकांच ऐकतो, एकमेकांना सॉरी म्हणतो आणि परत आमचं खेळणं सुरु..” रावी बोलत होती,”आई तुला माहित आहे आमचा छान ग्रुप पण आहे .”

“ते मला माहित आहे गं. पण मला सांग तू कसं ओळ्खशील की ती/तो तुझा खरा मित्र किंव्वा मैत्रीण आहे म्हणून?” सुजाता नी जरा विचार करण्या सारखा प्रश्न केला रावी ला.

खरा मित्र किंव्वा मैत्रिण म्हणजे….. असे फ्रेंड्स जे मला नेहमी माझा सगळ्या गोष्टीत सपोर्ट करतात आणि मी काही चुकीचं केलं तर मला सांगतात पण. पण जे आपल्याशी खोटं बोलतात आपलं ऐकून पण घेत नाही आणि ते जे म्हणतील तेच बरोबर असे म्हणतात ना ते कधीच खरे फ्रेंड्स नसतात. ते कधीच चांगली फ्रेंडशिप करु शकत नाही.”

“अगदी बरोबर रावी. मग झाले का सगळ्या तुझा फ्रेंड्स चे कार्ड आणि फ्रेंडशीप बेल्ट बनून? तुला माझी मदत हवी असेल तर सांग बर का.”

आजच्या या जगात “खरी मैत्री” मिळणं फारच दुर्मिळ आहे. आपल्या हक्काचं आपल्याला कोणी भेटणं फारच कठीण. रावी कडे बघून सुजाता ला खूप छान वाटलं कि तिच्या रावीला बाहेरच्या जगातील माणसं ओळखण्याची पारख आहे आणि मित्र मैत्रिणीचं महत्त्व पण ती जाणते…

वाचण्यासारखे आणखी काही….

कथा
पालकत्व

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय